म्युच्युअल फंड संबंधित काही रोचक माहिती

Reading Time: 2 minutesआपण अजूनही ठराविक व्याज देणाऱ्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करता का?  मग थांबा हे वाचा, जरा विचार करा आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार हे चुकीचे आहे. म्युच्युअल फंड मध्ये तब्बल ३६ प्रकारच्या योजना असतात. त्यातील १६ योजना शेयर बाजाराशी अजिबात संबंधित नसतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य म्युच्युअल फंड योजना निवडा.आपली संपत्ती पुढील ३० वर्षात ३० पट बनवण्यासाठी आपली गुंतवणूक फक्त १२% चक्रवाढ व्याजाने वाढीची आवश्यकता आहे. हे शक्य होऊ शकते म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून.

नववर्षासाठी ५ महत्वाचे गुंतवणूक पर्याय

Reading Time: 2 minutesआज चैत्र पाडवा! हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नवीन वर्षात पंचांग पूजनासोबत आपल्या भविष्याच्या तरतुदीचाही संकल्प करा. पारंपरिक सणाच्या मुहूर्तावर गुंतवणुकीच्या आधुनिक, आवश्यक आणि स्मार्ट पर्यायांचाही विचार करा. नवीन आर्थिक वर्षात गुंतवणुकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतीलच. नववर्षात गुंतवणूक करताना खालील साध्या, सोप्या पण आवश्यक पर्यायांना प्राधान्य द्या.

जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutesआताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

Reading Time: 2 minutesतरुणांनो यशस्वी नियोजन करून ४० व्या वर्षी निवृत्त व्हा. चाळीशी ओलांडलेल्यांनी पन्नाशीत निवृत्ती घेऊन ती आनंददायी कशी करता येईल? हा विचार करा. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. चाळीशीतील गुंतवणूकदारांनी जर त्यांच्या करिअरच्या सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल तर निश्चित त्यांना ५०-५५ वर्षी निवृत्ती घेता येईल. मात्र बऱ्याच जणांच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक न होता, आपली नजीकच्या काळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची बचत झाली.

एसआयपी (SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

Reading Time: 3 minutesस्मार्टफोनच्या जमान्यात गुंतवणूकदारही गुंतवणुकीच्या स्मार्ट पर्यायांना पसंती देत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणारे लाभ व कालावधी याचा विचार करता उत्तम परतावा व वेळेची लवचिकता देणाऱ्या गुंतवणूकीच्या आधुनिक पर्यायांची लोकप्रियता सध्या वाढू लागली आहे. शेअर्स, बॉण्ड्स, स्टॉक अशा अनेक पर्यायांना मागे टाकत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणुकीला जास्त पसंती देत आहेत.