Browsing Tag
बचत खाते
6 posts
Kids Saving Account – नियम आणि वैशिष्ट्ये
Reading Time: 2 minutesमुलांना जबाबदारी शिकवणं आणि त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजीही घेता येणं यातून आपण आपलं उत्तम पालकत्व निभावत असतो. आणि अशीच संधी आपल्याला मिळते ती या मुलांचे बचत खाते उघडून. हे खाते उघडण्याची प्रक्रिया इतर बचत खात्यांप्रमाणेच असली तरी या खात्याला मिळणाऱ्या सोई आणि सुविधा सामान्य खात्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अर्थात हे खाते लहान मुलांकडून हाताळले जाणार असल्याने काही चुका होण्याची शक्यता असते म्हणूनच बँकांनी काही मर्यादा घालून दिल्या आहेत. हे खाते उघडण्यापूर्वी पालकांनी त्या वैशिष्ट्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
सरकारी अल्प बचत योजनांचे दर १% पेक्षा अधिक खाली
Reading Time: 5 minutesकोविड-१९ आपत्तीचा सामना करण्याकरिता सरकारने आर्थिक उपाय योजना जाहीर केल्या, त्याच बरोबर आरबीआयने रेपो व्याज दर खाली आणून ४.४०% पातळीवर आणले. ह्याचा उद्देश एकच की बँकांना आणि व्यवसायांना आवश्यक निधी स्वस्तात उपलब्ध व्हावा जेणे करून आपत्तीच्या काळात त्यांच्याकडे आवश्यक तरलता राहील. आरबीआयने आपले रेपो व्याज दर कमी केल्यावर आता बँकाही आपले टर्म डिपॉजिटचे दर कमी करतील त्याच बरोबर ज्यांनी गृहकर्ज घेतले असेल त्यांचे व्याज ही कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. मात्र जे गुतंवणूकदार आतापर्यंत फक्त जोखीम नसलेल्या बँकेच्या टर्म डिपॉजिट मध्ये गुंतवणूक करीत आले त्यांना आता गुंतवणुकीचे दुसरे पर्याय पाहावे लागतील.
१ सप्टेंबर पासून बँकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वपूर्ण बदल
Reading Time: 2 minutes१ सप्टेंबर २०१९ पासून बँक व तत्सम आर्थिक घटकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आर्थिक जीवनावर होणार आहे. बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. होणाऱ्या प्रत्येक बदलामागे काहींना काही कारण असतेच. प्रत्येकानेच बदलामुळे होणाऱ्या फायदे तोट्यांना दोन्ही सामोरं जायची तयारी ठेवायला हवी.
Kids Saving Account: मुलांना आर्थिक नियोजन शिकवणारे ‘किड्स सेव्हिंग अकाउंट’
Reading Time: 3 minutesकमी वयातच मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून आपल्यापैकी कित्येकांच्या पालकांनी एक ‘खाऊच्या पैशाचा गल्ला’ आपल्या हातात आणून दिला असेल. आपणही पालक म्हणून ‘पिग्गीबँक’ मुलांना दिली असेल. या काही वर्षांमध्ये जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक साक्षरता आणि बचतीची सवय आपणही आपल्या मुलांना जमेल तितक्या लवकर शिकवली पाहिजे. आता आपल्या लहान मुलांचे बचत खाते उघडण्यासाठी त्यांच्या वयाच्या १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. आता तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांचेही बचत खाते उघडू शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती वाचा-
गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १
Reading Time: 3 minutesगुंतवणूक हा शब्द वरवर जरी खूप सोपा वाटत असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या भावी गरजांनुसार योग्य त्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केला पाहिजे. सामान्य गुंतवणूकदार सहसा योग्य नियोजन न करता काहीवेळा झटपट श्रीमंत होण्याचा हव्यासापोटी फसवणुकीच्या योजनांना बळी पडतात व आपले मुद्दलही गमावून बसतात. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडावा ह्या हेतूने आपल्याला उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय पाहूया.