Loan कर्ज
https://bit.ly/3uKLi3n
Reading Time: 3 minutes

Loan: कर्ज घेण्यापूर्वी…

कर्ज  (Loan) घेणे ही देखील एक कला आहे. हुशारीने कर्ज घेतले तर तुमचे काम तर होईलच, पण तुमचे फायदेही होतील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार केल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाते. त्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या कर्ज घेण्यापूर्वी विचारात घेतल्या तर, तुम्हाला नक्की फायदा होईल. 

Zero cost EMI: ‘झीरो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

Loan: कर्ज घेण्यापूर्वी विचारात घ्या या ८ गोष्टी 

१. समजूतदार पणे अथवा सुज्ञपणे कर्जाची निवड करा :

 • कर्ज घेऊन आपल्या सद्य किंवा वर्तमान गरजा पूर्ण करण्यासाठी एका बाजूला मदत होते, तर दुसरीकडे करात सूट देखील मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते.
 • तथापि, आपल्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे योग्य मुल्यांकन केल्यावरच आपण कर्ज घेण्याचा पर्याय निवडावा. 
 • आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेतल्यास आपल्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 
 • आपले महिन्याचे उत्पन्न व खर्च विचारात घेऊन जे काही शिल्लक पैसे राहतील त्यानुसारच आपण कर्जाचा हफ्ता भरू शकाल हे विचारात घेऊन आपण कर्ज घेतले, तर ते आपण भरू शकू का, हे विचारात घेणे गरजेचे आहे. 

२. कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील फायदा कोणाला घेता येतो :

 • आपण पगारदार असाल आणि कार खरेदीसाठी वाहन कर्ज घेत असाल, तर आपल्याला आयकरात कोणतीही सूट मिळत नाही.
 • जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर आयटीआर दाखल करतांना तुम्ही गाडी आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजसह मूळ रकमेवर कर सूट मागू शकता.

३. गृहकर्जावरील आयकरात बचत अथवा सूट मिळवून देते :

 • गृहकर्ज घेताना तुमच्या मासिक उत्पन्नाचा एक चांगला हिस्सा मासिक हप्त्यात जातो पण दुसरीकडे तुम्हाला आयकरात सूट देखील मिळते कारण अशा कर्जाची मुद्दल रक्कम आणि व्याज रक्कम ह्या दोन्ही रकमा कर वजावटीस पात्र असतात. 
 • गृह कर्जाच्या मुद्दलावर तुम्हाला प्राप्तीकर कायदा कलम ८० सी अन्वये रु. दीड लाख पर्यंतच्या मुद्दल रकमेवर आयकर बचत होते आणि कलम २४ च्या अंतर्गत आयकरातून त्याच्या व्याजाच्या रकमेवर रु. 2 लाखापर्यंत सवलत मिळते.

महत्वाचा लेख: शैक्षणिक कर्ज घेताय? या गोष्टींचाही विचार करा

४. शिक्षण कर्जावरील कर बचत अथवा सूट मिळवून देते :

 • जेव्हा आपण एखाद्या वित्तीय संस्थेकडून अथवा राष्ट्रीयकृत बँकेतून उच्च शिक्षणासाठी कर्ज घेता तेव्हा आपण आयकर कायद्याच्या कलम ८० ई अंतर्गत त्याच्या व्याजदरावर कर सूट मागू शकता. 
 • या व्याजाच्या रकमेसाठी कोणतीही मर्यादा आयकर कायद्याने घातली नाही हे समजून घेणे महत्वाचे आहे. 
 • बारावी उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, तर शिक्षण कर्जावरील व्याजाच्या रकमेवर तुम्ही प्राप्तिकरात सूट मिळवू शकता. 
 • आपण आपल्या जोडीदाराची, मुलाची किंवा भावंडांच्या शैक्षणिक कर्जावर कर सूट मागू शकता.

५. समजुतदारपणे कर्जाचा वापर करा :

 • समजा तुम्ही ९% दराने गृह कर्ज घेऊन घर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर दीर्घ मुदतीसाठी म्हणजेच अधिक वर्षासाठी कर्ज घेतल्यामुळे ईएमआयचा भार कमी करू शकता. 
 • लार्ज कॅप म्युच्यूअल फंडामध्ये तुमची बचत ठेवून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हे आपल्याला कर्ज घेण्याच्या किंमतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. 
 • यासोबतच तुम्ही गृहकर्जाच्या व्याजदरावर आयकरात बचत देखील करू शकता.

६. कर्ज कमी खर्चीक आहे :

 • बँकांचा आणि वित्तीय संस्थांमध्ये त्यांचा बाजारातील वाटा वाढवण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे.
 • कर्ज घेण्यासाठी चार्जेस कमी ठेवणे हा अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा उत्तम मार्ग आहे. 
 • तथापि, हे पूर्णपणे वित्तीय संस्थांच्या नियंत्रणाखाली नाही.

विशेष लेख: तारण कर्ज – सुरक्षित कर्जाचा एक प्रकार

७. व्याजमुक्त कर्जाचा लाभ घ्या :

 • आज अनेक ग्राहक कर्ज 0% व्याजावर उपलब्ध आहेत. 
 • जर आपण देखील वस्तू खरेदी करत असाल आणि आपल्याला असे कर्ज मिळत असेल, तर त्वरित पैसे परत करण्याऐवजी आपण ‘नो कॉस्ट इएमआय’ द्वारे नवीन मायक्रोवेव्ह, फॅन्सी स्मार्टफोन किंवा आपल्या बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधून खरेदी करू शकतो. 
 • ग्राहक कर्ज यालाच इंग्रजीत ‘कन्झ्युमर लोन’ म्हणतात.
 • समजा आपण १५००० रु. चा मोबाईल घेत असाल, तर तो घेताना त्वरित पैसे भरून घेण्याऐवजी आपण तो ‘नो कॉस्ट इएमआय’ द्वारे 0% व्याजाने लोन करून घ्यावा व रु.१५००० ची गुंतवणूक करावी ज्यातून आपल्याला नफा अथवा उत्पन्न मिळेल.

८. पैशाचा अभाव किंवा पैशाची कमतरता कर्ज पूर्ण करते :

 • कर्ज हे एक आर्थिक साधन आहे ज्याद्वारे आपण आपल्या पैशाची कमतरता दूर करू शकतो. 
 • आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता आहे का, आपल्याला घर विकत घ्यायचे आहे किंवा आपले आवडते गॅजेट्स विकत घ्यायचे आहे, ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्ज उपयुक्त ठरू शकते. 
 • कर्ज आपल्याला आवश्यक वेळी पैसे प्रदान करते, तसेच कर वाचविण्यासाठी देखील उपयोगी ठरू शकते.

– आशिष भोजने

७०३८५७७५७७ 

करसल्लागार, पुणे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Loan in Marathi, Loan info in Marathi, Loan Marathi Mahiti, Loan information in Marathi, Loan Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…