Reading Time: 3 minutes

कर्ज सेटलमेंट आणि कर्ज क्लोजर या पद्धती पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. तुम्ही तुमचे मासिक हप्ते वेळेवर भरून नियोजित वेळेनुसार परतफेड पूर्ण केल्यास बँक कर्ज खाते बंद करते त्याला ‘लोन क्लोजर’ असे म्हटले जाते. 

 

कर्ज पूर्ण भरल्यामुळे क्रेडिट स्कोअरवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. कर्ज सेटलमेंट करणे हे कर्ज बंद करण्यापेक्षा पूर्णपणे  वेगळे आहे. 

 

कर्ज सेटलमेंट म्हणजे काय? 

 • कर्ज सेटलमेंटचा अर्थ बँकेकडून  कर्ज घेतलेल्या परिस्थितीसह स्पष्ट केला आहे. आजारपण, नोकरी गमावणे आणि अपंगत्व येणाऱ्या दुखापतीमुळे पैसे भरण्यास तुम्ही सक्षम नसता. अशावेळी बँकेला तुम्ही माहिती देता की कर्जफेड करण्याची तुमची सध्या परिस्थिती नाही. 

 

 • तुम्हाला परतफेड करण्यासाठी बँकेकडून वेळ मागवून घेता. त्यानंतर बँक तुम्हाला सेटलमेंट पर्याय देऊ शकतो. 

 

 • तुम्ही थोड्या कालावधीने एकदम सर्व कर्जाची पूर्तता करून टाकायला हवी. ज्या वेळेस या सर्व कर्जाची एकदम पूर्तता केली जाते तेव्हा क्रेडिट अहवालात त्याची नोंद केली जाते. 

 

कर्ज सेटलमेंटची प्रक्रिया 

 • जर कर्ज देणाऱ्याला तुमचे खरे कारण पटले तर तो ६ महिन्यांचा परतफेड न करण्याचा कालावधी देतो. जर तुम्ही सहा महिन्यानंतर कर्ज एकदम भरायला तयार असाल तर हा पर्याय दिला जातो. 

 

 • कर्ज देणारी बँक एक रक्कम लिहून देईल. त्यामुळे कर्ज फेडणाऱ्याला ती रक्कम देणे सोपे जाते. कर्जदाराने जर पूर्ण कर्ज भरले तर त्याची कर्जस्थिती बंद म्हणून नोंदवण्यात येते. 

 

कर्ज सेटलमेंटमुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम 

 • जेव्हा एखादी बँक कर्ज माफ करण्याचा निर्णय देते तेव्हा ते सिबिल आणि इतर रेटिंग एजन्सीना याबद्दलची माहिती देतो. सेटलमेंट या शब्दाचा अर्थ बंद असा होत नाही. 

 

 • सेटल म्हणून चिन्हांकित केलेले असल्यास बँक त्यास नकारात्मक क्रेडिट वर्तन म्हणून पाहतात. क्रेडिट स्कोअर कमी झाल्यामुळे भविष्यात तुमच्या कर्ज मिळण्याच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो. 

 

 • कर्ज सेटलमेंटची माहिती सात वर्षांपर्यंत क्रेडिट स्कोअर रिपोर्टवर असते. जेव्हा कर्जदाराला त्या सात वर्षांमध्ये कर्ज घेण्याची इच्छा होते तेव्हा त्याचा अर्ज नाकारला जाण्याची शक्यता निर्माण होते. 

महत्वाचा लेख  Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

 

कर्जसेटल झाल्यानंतर एजन्सी मार्फत केले जाणारे कार्य 

 • एजन्सी व्यवहाराला सेटल म्हणून नोंदवते तेव्हा इतर एजन्सी देखील त्याला पाहतात. कर्जदाराला क्रेडिटसाठी अयोग्य म्हणून घोषित केले जाते, त्यामुळे त्याचा क्रेडिट स्कोअर देखील कमी होतो. 

 

 • एजन्सी सात वर्षासाठी कर्जदाराची माहिती जतन करून ठेवते, त्यामुळे पुढील सात वर्षांमध्ये त्याला कर्ज मिळत नाही. कर्जदार व्यक्तीचा अर्ज नाकारला जातो कारण तो कर्ज फेडण्यासाठी असमर्थ असतो. 

 

कर्जदार अशा परिस्थितीत कसे टाळू शकतात?

 • सुरुवातीस शेवटचा पर्याय म्हणून कर्ज सेटलमेंटचा विचार करावा. शक्यतो तुमची बचत आणि गुंतवणूक पाहून कर्ज फेडता येते का याची चौकशी करावी. त्यासोबत पर्यायी व्यवस्थांचा विचार करून ठेवावा. 

 

 • कर्जाची पुनर्रचना करून ते दुसऱ्या कर्जात हस्तांतरित करता येते का त्याची चौकशी करावी. कमी व्याजावर सुरक्षित कर्ज घेण्यासाठी सोने, रिअल इस्टेट मालमत्ता गहाण ठेवावी. शेवटचा उपाय म्हणून कर्ज सेटलमेंटचा विचार करावा.

 

कर्ज सेटलमेंट करण्याची पद्धत 

 • थकीत कर्जाची रक्कम तसेच सेटलमेंट रक्कम कमी करण्यासाठी शक्य तितक्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करावा. एकदा लोन सेटल केल्यानंतर क्रेडिट कार्ड किंवा नवीन कर्जासाठी अर्ज करणे टाळावे.

 

 • नवीन ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर पुनर्संचयित होण्याची प्रतीक्षा करा. 

 

आपण हे लक्षात ठेवायला हवे. 

 • तुमच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसारच कर्ज घ्या. लोभी होऊ नका आणि जास्त कर्ज घेऊ नका. कारण परतफेड करताना ते तुम्हाला जास्त जड जाईल. 

 

 • कर्ज सेटलमेंट करण्याचा पर्याय म्हणजे कर्जदार हा कर्जाची रक्कम फेडण्यास सक्षम नाही. जेव्हा तुम्ही कर्ज सेटल कराल तेव्हा क्रेडिट स्कोअर बराच कमी होईल. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळणे कठीण होऊन जाईल. 

 

 • कर्ज सेटलमेंट करण्यापेक्षा ते बंद करण्याचे ध्येय ठेवा. 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

 

मी कर्ज फेडल्यास माझा क्रेडिट स्कोअर वाढेल का?

जेव्हा तुमच्या क्रेडिट अहवालात कर्ज सेटलमेंट अपडेट केले जाते तेव्हा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर रेकॉर्डमध्ये कमी सुधारणा होते. 

 

कर्ज सेटलमेंटनंतर मी माझा क्रेडिट स्कोअर कसा वाढवू?

 कर्ज सेटलमेंटनंतर तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुम्ही तुमची सर्व थकबाकी भरण्याची खात्री केली पाहिजे. शक्यतो क्रेडिट वापराचे प्रमाण कमी ठेवावे. कर्जाची चौकशी टाळून सुरक्षित कर्ज आणि कार्डसाठी अर्ज करावा. 

 

क्रेडिटसाठी सेटलमेंट चांगली आहे का?

तुमच्या क्रेडिटसाठी सेटलमेंट चांगली असू शकत नाही कारण ती कमी पेमेंट आणि उधारीची परतफेड करताना विलंबित समजली जाते. 

 

कर्ज सेटल केल्यानंतर तुमचा  क्रेडिट स्कोअर वाढण्यास किती वेळ लागतो?

कर्ज सेटल केल्यानंतर क्रेडिट स्कोअर वाढण्यास सहा महिने ते एक वर्ष इतका कालावधी लागू शकतो. ते तुमच्या कर्ज सेटलमेंटच्या क्रेडिट वर्तनावर आणि बँक त्याच्याकडे किती सकारात्मकपणे पाहतात यावर अवलंबून असते. 

 

कर्ज फेडणे योग्य आहे का? 

होय, कर्जाची परतफेड करणे फायदेशीर आहे. जर सर्व कर्ज थकबाकी एकाच लेनदाराकडे असेल तर तुम्ही तुमच्या कर्जाची पूर्तता करण्यासाठी कमी रकमेवर वाटाघाटी करू शकता. त्यामुळे तात्काळ आर्थिक भरातून मुक्तता मिळते. 

 

सेटलमेंटनंतर मी पुन्हा कर्ज घेऊ शकतो का?

कर्ज सेटलमेंटचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. बँकेकडून यांच्याकडून सेटलमेंटला नकारात्मक मानले जाते. त्यामुळे ते तुम्हाला कर्ज देण्यासाठी नाखूष असतील. जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोअरवर काम कराल तेव्हा दीर्घकाळासाठी कर्जाचा लाभ घेऊ शकाल.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…