Arthasakshar UPI Transaction
https://bit.ly/31roV5n
Reading Time: 3 minutes

UPI Transactions: युपीआयच्या लोकप्रियतेचे परिणाम 

आजकाल सगळेच युपीआय मार्फत व्यवहार (UPI Transactions) करत असतील. या लेखात युपीआय व्यवहारांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विविध घटकांवर कसे परिणाम झाले आहेत, याबद्दलची माहिती घेऊया. 

UPI : आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय वापरताय? थांबा आधी हे वाचा

युपीआय (UPI) कशा प्रकारे काम करते?

  • युपीआय म्हणजे पैशांचे व्यवहार करण्याचा अत्यंत सोपा आणि सुरक्षित मार्ग आपल्यासाठी NCPI ने आपला वेळ व कष्ट वाचवण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. 
  • युपीआय एक असे माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण थेट मोबाईलवरून पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. 
  • हे व्यवहार करण्यासाठी कोणतेही अधिकृत प्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावे लागते. 
  • यानंतर त्यामध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती म्हणजे खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, तुमच्या बँकेच्या शाखेचा IFSC क्रमांक ही सर्व माहिती अचूक द्यावी लागते. 
  • याचबरोबर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य असते. आणि एकदा तुमचा युपीआय आय डी तयार झाला की तुम्ही त्याद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता. 
  • युपीआय मुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या इतर सर्व पर्यायांवरच घाला घातला जात आहे आणि त्या सर्व पर्यायांचे यानंतरचे भवितव्य काय असेल याबाबतीत मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
  • अनेक कंपन्यांच्या भवितव्यावर आता अनपेक्षितपणे सर्व सुरळीत सुरु असताना थेट बंद करायची वेळ आली आहे. 

युपीआय (UPI) कोणासाठी उपलब्ध आहे?

  • ‘फोनपे’ (PhonePe) हे एक असे माध्यम आहे ज्यामध्ये युपीआयच्या कार्यप्रणालीचा वापर केला गेला आहे. 
  • हे फोनपे अँप्लिकेशन ‘फ्लिपकार्ट’ने खरेदी केलेले आहे, त्याचप्रमाणे ‘स्नॅपडील’चे फ्रीचार्ज (FreeCharge) नावाचे ॲप्लिकेशन आहे, तर अमेझॉनही आता यामध्ये मागे राहिलेला नाहीये. 
  • भारत सरकारने BHIM ॲप्लिकेशनचा एक अत्यंत सुरक्षित पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि  विविध बँकांनीही स्वतःचे असे युपीआय ॲप्लिकेशन्स तयार करून त्यांच्या ग्रहांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.

युपीआय व्यवहारांसाठी किती आकार पडतो?

  • रु. १००० पर्यंतच्या व्यवहारांसाठी देयकाला १० पैसे प्रति व्यवहार मोजावे लागतात, तर रु. १०००० पेक्षा अधिकच्या व्यवहारांसाठी प्रति व्यवहार साधारणतः ५० पैसे बँकेकडून आकारले जातात. 

युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान

युपीआय व्यवहारांचे परिणाम (UPI Transactions)

१. मोबाईल वॉलेट्स:

  • ‘युपीआय’च्या माध्यमातून हे व्यवहार कारण इतकं सहज शक्य झालं आहे की आता तुम्हाला तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, कॅश असे काहीही बाळगायची गरज नाही. 
  • इतकेच नाही तर आता मोबाइलला वॉलेट्स जी सर्वांची विशेषतः तरुण लोकांची गरज बनली होती. 
  • परंतु, आता युपीआय मुळे मोबाईल वॉलेट्सची आवश्यकता उरलेली नाही, तर आता या ‘मोबाइल वॉल्लेट्स’ चे काय होणार याची चिंता या क्षेत्रातील सर्व मोठमोठ्या कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यामागे तसं ठोस कारणही आहे. 
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने घालून दिलेल्या नियमांनुसार युपीआय चा वापर फक्त बँकांनाच करता येणार आहे आणि  हा बँकांना वर येण्यासाठी एक खूप मोलाचा निर्णय ठरला आहे. 
  • पेटीएम (PayTM), मोबिक्विक (mobikwik) अशा मोबाईल वॉलेट्समुळे बँक खात्यांचा वापर घटू लागला होता. 
  • या कंपन्यांमार्फत आरबीआयला परवानगी देण्याबाबत विनंती करण्यात येत आहे, पण अजूनतरी तसे घडलेले नाही. 
  • काही पेटीएम (PayTM) सारख्या मोबाईल वॉलेट्सची ग्राहकसंख्या जास्त असल्याने ठराविक प्रमाणामध्ये याचा वापर अजूनही इतर कारणांसाठी जसे की मोबाईल रिचार्ज वगैरें कामांसाठी करता येऊ शकेल.
  • त्यामुळे या कंपन्या जोपर्यंत यासाठी काही पर्यायी सुविधा घेऊन येत नाहीत तोपर्यंत यांच्यासाठीच काळ अत्यंत आव्हानात्मक असेल.

UPI – युपीआय विषयी काही महत्वाची प्रश्नोत्तरे (FAQ)

२. पेमेंट गेटवे (Payment gateway):

  • इंस्टामोजो, EBS, CCAvenue आणि यासारखे असे अनेक खाजगी ‘पेमेंट गेटवे’चे पर्याय आहेत.  या माध्यमातून आजपर्यंत अनेकजण सर्रास आर्थिक व्यवहार करत होते किंवा अजूनही करत असतील. 
  • हे पेमेंट  गेटवे वापरताना आर्थिक व्यवहार करण्याच्या विविध मार्गांचा उदा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा मोबाईल वॉलेट्स यांचा अवलंब करता येऊ शकतो.  
  • या माध्यमांतून व्यवहार करत असता त्या व्यवहारांबद्दल सर्व आवश्यक व सविस्तर माहिती केव्हाही पाहता येऊ शकते. 
  • याचाच अर्थ व्यवहार झालेल्या व्यक्तींच्या बँक खात्याची माहिती, रक्कम, व्यवहार कोणत्या कारणाने झाला इ. आणि हे व्यवहार दोन्ही बाजूच्या सोयीस्कर पर्यायांनी करता येतो. ज्याचा उपयोग पुढे ग्राहक तक्रार निवारण अशा ठिकाणी एक ठोस पुरावा म्हणून अत्यंत प्रभावी ठरतो.
  • ‘युपीआय’चा याबाबतीत विचार करता त्या व्यवहारामध्ये इतकी सविस्तर माहिती मात्र उपलब्ध नसते. त्यामध्ये फक्त पैसे देणी आणि घेणे यावर जास्त भर दिला गेला आहे. 
  • त्यामुळे पेमेंट गेटवेजकडे एक अत्यंत विश्वासार्ह मार्ग म्हणून पाहता येईल. आज युपीआय मध्ये हे नाही पण कालांतराने पुढे याचाही समावेश केला जाऊ शकतो.

युपीआय रोख रक्कमेच्या वापरास पर्याय ठरू शकते का?

  • जागतिक पातळीवर विचार करता भारतामध्ये आपल्या एकूण जीडीपी मध्ये १८% वाट हा रोख रकमेच्या व्यवहारांचा आहे. रोख रकमेने केल्या जाणाऱ्या व्यवहारांची ही जगातील सर्वांत जास्त टक्केवारी आहे. 
  • आपण आधी पाहिल्याप्रमाणे युपीआय साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधार क्रमांक आणि या व्यवहारांसाठी स्मार्टफोन असणे अनिवार्य आहे.  त्यामुळे या सर्वांच्या आकडेवारीचा ताळमेळ पाहता हे सध्या तरी कठीण दिसत आहे. 

युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान… भाग २ 

आपल्याकडे आत्ता एकूण १२३ करोड आधार कार्ड्स आहेत दर महिन्याला त्यामध्ये नवीन कार्ड्स किंवा त्यामध्ये बदलाचे साधारण १० लाख अर्ज येतात, तर एकूण ४५०-५०० मिलियन नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आहेत.  त्यापैकी साधारण २३० मिलियन लोक स्मार्टफोन वापरत आहेत. आधार कार्ड्सच्या तुलनेत याची बरोबरी करणे कठीण आहे. आणि युपीआय पेमेंट्स जर जास्तीत जास्त लोकांनी वापरावे असे वाटत असेल, तर जास्तीत जास्त लोकांना स्मार्टफोन वापरणे आवश्यक आहे. 

For suggestions and queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search:  UPI Transactions in Marathi, UPI Transactions Marathi Mahiti, Effects of UPI’s popularity Marathi Mahiti, Effects of UPI’s popularity Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.