Arthasakshar Protect Yourself from UPI Fraud in Marathi
https://bit.ly/2NLCaax
Reading Time: 2 minutes

युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान… 

युपीआय (UPI) च्या कार्यपद्धतीमध्ये काहीही त्रुटी नसल्या तरीही याचा वापर करताना फसवाफसवीच्या घटना समोर येत आहेत. त्याला आपला बेसावधपणा जास्त कारणीभूत आहे. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे अथवा एखाद्या बनावट  मेसेज किंवा ई-मेल ला ‘आपण’ रिप्लाय दिला, तर आपण त्यांनी आपल्यासाठी रचलेल्या सापळ्यामध्ये अडकतो आणि मग आपल्या खात्यातून हे चोर आपल्या पैसे चोरू शकतात.

तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?…

फिशिंग (Phishing) आणि रिमोट स्क्रीन मिररिंग (Remote screen mirroring) या दोन माध्यमातून अशा प्रकारच्या घटना घडतात ते आपण या आधीच्या लेखामध्ये पाहिले. आजच्या लेखामध्ये आपण अजून काही प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे आपण सावध होऊन आवश्यक ती दक्षता घेऊ शकू आणि अशा घटनांना बळी पडणार नाही 

युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान……भाग १

१. भरीस पाडणारे युपीआय (UPI) हॅन्डल्स: 

  • एखाद्या युपीआय (UPI) सोशल मीडियाच्या पेजवर NPCI, BHIM किंवा एखाद्या बँकेचे नाव किंवा एखाद्या सरकारी संस्थेचे नाव असेल तर याचा अर्थ असा होत नाही की हे प्रमाणित आहे. 
  • ग्राहकांना फसवण्याच्या अथवा गोंधळात टाकण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची नावे तयार केली जातात जी खऱ्या नावांच्या थोडीफार एकसारखी असतात. 
  • याचा उद्देश म्हणजे बनावट युपीआय च्या माध्यमातून तुमच्याकडून तुमच्या बँक खात्याची माहिती काढून घेणे आणि नंतर त्याचा दुरुपयोग करणे असा असतो.

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स…

२. तुमचा ओटीपी अथवा युपीआय पिनचा गैरवापर: 

  • यासंदर्भातील नुकत्याच आलेल्या माहितीनुसार हे गुन्हेगार लोकांना “तुम्हाला ठराविक रक्कम मिळत आहे” अशा प्रकारचे मेसेजेस पाठवतात आणि त्यासोबत एक लिंक पाठवतात.  
  • त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही त्या व्यवहाराला मान्यता दिली, तर तुमच्या खात्यामधून तेवढी रक्कम वजा होते म्हणजेच चोरी होते.
  • यामध्ये आणखी एक प्रकार म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही वापरात असलेल्या युपीआय प्लिकेशनमधून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा युपीआय पिन अथवा ओटीपी द्यावा लागतो. 
  • युपीआय पिन तुम्ही स्वतः निश्चित करता, तर ओटीपी क्रमांक बँकेद्वारे तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येतो. हा सामान्यतः जास्तीत  जास्त मिनिटांसाठी valid असतो.
  • यामध्ये होणार फसवाफसवीचा प्रकार म्हणजे तुम्हाला एक बनावट कॉल येतो आणि फोनवरील व्यक्ती तुम्हाला तुमचा युपीआय पिन अथवा आलेला ओटीपी देणे सुरक्षित आहे हे पटवून देतात आणि एकदा ही माहिती तुमच्याकडून त्यांना मिळाली की ते तुमच्या खात्यातून पैशांची चोरी अगदी सहज करतात. 
  • यासाठी काहीही झाले तरी कधीही तुमची गोपनीय माहिती, युपीआय पिन, ओटीपी अशी महत्वाची माहिती फोनवर कोणालाही देऊ नये. बँक कधीही तुमच्याकडे अशी कोणतीही माहिती मागत नाही. 

आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?…

युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना नेहमीच खात्रीशीर ॲप्लिकेशन म्हणजेच जे गूगल प्ले स्टोअर किंवा पल स्टोअर ने तपासले आहेत अशाच ॲप्लिकेशन्सचा वापर करा. 

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search : UPI wallet safety in Marathi, UPI Wallet Security in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutes तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो. 

Cyber Security – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

Reading Time: 2 minutes इंटरनेटच्या जगात आपण रोज अनेक वेग वेगळ्या वेबसाइट बघत असतो, कळत नकळत आपण अनेक ठिकाणी क्लीक करतो,  “Download” असं मोठ्या हिरव्या अक्षरात लिहिलेल्या अनेक पाट्या वेबसाईटवर दिसू लागतात, त्यापैकी एकावर आपण क्लीक करतो आणि जाळ्यात अडकतो … तेही एका चुकीच्या क्लीकमुळे. हा हल्ला करणाऱ्याकडून BeEF (बीफ) हे टूल वापरलं जातं. 

अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? काय आहे या मेसेजमागचे सत्य?

Reading Time: 3 minutes अपघाती मृत्यूला दहापट नुकसानभरपाई? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही…