नरेंद्र मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र

Reading Time: 4 minutes

लोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे. 

लोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे.

. संकटाचं रूपांतर संधीमध्ये करणे:-

 • नरेंद्र मोदींनी अनेक संकटाना आपल्या संधीत रूपांतरित केलं. पुलवामा अटॅक, उरी अटॅक याशिवाय गुजरात दंग्यांचे त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केलेत. पण त्यांनी यातून सकारात्मक काम करत त्यातूनच आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवली.
 • उद्योजकानेही आपल्यातील नकारात्मकतेला संकटाचं रूपांतर संधीमध्ये करायचं असतं.

२. फेस व्हॅल्यू तयार करणे:-

 • भाजपाच्या तीनशेच्या वर आणि एनडीएच्या तीनशे पन्नासच्या वर सीट्स जिंकून आल्यात. पण या सगळ्या उमेदवारांचं यश हे त्यांचं नसून नरेंद्र मोदींचं आहे. कारण चेहरा नरेंद्र मोदींचा होता. लोकांनी मोदींना मत दिलं.
 • भाजपकडे नरेंद्र  मोदी हा चेहरा आहे. जो प्रचंड मेहनतीतुन बनला आहे. नरेंद्र मोदींची फेस व्हॅल्यू ही भाजपाची सगळ्यात मोठी बाजू आहे. यामुळेच भाजप सुपरहिट झाला आहे.
 • यामुळे स्टार्टअप करणाऱ्यांनी स्वतःची, किंवा ब्रँडची फेस व्हॅल्यू व नाव (Goodwill ) तयार करावे. आपलं उत्पादन आपली ओळख बनवावी.

३. बोलणाऱ्याचं सोनंही विकल्या जातं:-

 • मोदींनी जनतेशी आपल्या बोलण्यातून, भाषणातून लोकांशी सतत संपर्क ठेवला. शिवाय डेटा एन्ट्री केल्याप्रमाणे आपले सर्व यश, छोट्यातून छोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवले. यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक ‘कनेक्टिंग’ प्रतिमा निर्माण झाली. मोदींनी प्रचंड मेहनत केली आणि आपल्या सर्व कामाबद्दल ते बोलत राहिले.
 • उद्योजकानेही प्रचंड मेहनत करावी आणि आपल्या सर्व कामाबद्दल, उत्पादनाबद्दल, सेवेबद्दल लोकांना सांगावं. यामुळे ग्राहकांना आपले प्रत्येक उत्पादन व सेवेबद्दल माहिती मिळते. यातून यश प्राप्त होतं.

४. कमकुवत बाबी सशक्त करणे:-

 • बंगाल ही भारतीय जनता पार्टीची कमकुवत बाजू  होती. त्यांनी बंगालवर खूप मेहनत, लक्ष केंद्रित करून ती बाजू सशक्त केली. त्यांनी  या निवडणुकीत बंगालमध्ये मोठं यश मिळवलं.
 • उद्योजकाने आपल्या कमकुवत बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांना सशक्त बनवणं बिजनेससाठी गरजेचं असतं.

५. वैयक्तिक गरजा, हेवेदावे बाजूला ठेवावेत :-

 • मोदींनी स्वतःच्या वैयक्तिक गरजांचा विचार न करता पक्षाचा प्रथम विचार केला. देशाला आणि पार्टीला महत्व दिलं.
 • उद्योजकानेही स्वतःच्या सुखसोयी, विश्रांती यांचा विचार न करता प्रथम व्यापारावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करावं. उद्योग प्रथम स्वतःची मौज नंतर.

६. ग्राहकांची अपेक्षा समजून घ्या:-

 • मोदींनी कायम भारतीय लोकांची गरज समजून घेतली आणि त्याप्रमाणे लोकांना आपल्या कृतीने, निर्णयाने आनंद दिला.
 • उद्योजकानेही प्रथम ग्राहकाच्या गरजा समजून घ्याव्यात आणि त्या कुठल्याही तक्रारीविना पूर्ण करण्यावर भर द्यावा. सेवा प्रथम,  सोय नंतर. ग्राहकाचं समाधान हेच आपलं यश मानावं.

७. स्वतःची पक्की एक थीमलाईन तयार करा:-

 • मोदींनी राष्ट्रवादाची एक स्पष्ट थीम लाईन ठेवली.
 • उद्योजकाने आपलं उत्पादन कशा संबंधित आहे, सेवा कशाशी संबंधित आहे हे स्पष्टपणे ग्राहकांना कळू द्या. हे एकदा ग्राहकांपर्यंत पोचलं की बाकी गोष्टी सहजसाध्य होतात.

८. मार्केटिंगचं महत्व:-

 • आपल्या उत्पादनाचं, आपल्या सेवेचं योग्य मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. मोदींनी स्वतःचं आणि स्वतःच्या विचारांचं अगदी योग्य पद्धतीने मार्केटिंग केलं. यासाठी त्यांनी पैसा खर्च केला.
 • उद्योजकानेही हेच करणं गरजेचं असतं. योग्य माध्यम आणि चॅनलद्वारे आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करणं महत्वाचं असतं.

९. सोशिअल मीडियाच्या ताकदीला कमी लेखू नका:-

 • २०१४ ची निवडणूक ही सोशिअल मीडियाचं शस्त्र वापरलेली होती. नरेंद्र मोदी यांनी या शस्त्राचा संपूर्णपणे प्रभावी उपयोग केला होता. २०१९ निवडणूका तर पूर्णपणे सोशिअल मीडियाने प्रभावित होत्या. मोदींच्या कोटी समर्थकांनी मोदींची जाहिरात केली. याशिवाय भाजपा आयटी सेलनेही सतत मोदी प्रचार सुरू ठेवला.
 • उद्योजकानेही आपल्या उत्पादनाची, सेवेची जाहिरात सोशिअल मीडियाद्वारे करणं गरजेचं असतं. सोशिअल मीडियाद्वारे आपले ग्राहकसुद्धा बोटांद्वारे ‘माऊथ पब्लिसिटी’ करू शकतात. त्यामुळे ग्राहकाला योग्य सेवा देणं सगळ्यात महत्त्वाचं.

१०. आपली टीम आणि ग्राहक हेच आपली ओळख:-

 • आपली सेवा योग्य असल्यास,  ग्राहक खुश झाल्यास ग्राहकच आपल्या सेवेची जाहिरात करतात.  त्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागत नाही. मोदींनी हेच केलं.
 • अमित शाह आणि टीम ही मोदींची टीम आहे. मोदींचे कोटींमधील समर्थक, भक्त हे त्यांची सशक्त बाजू आहे. ते नरेंद्र मोदींची जाहिरात, प्रचार करत असतात. हे त्यांच्या विजयाचं प्रमुख कारण आहे.
 • उद्योजकानेही अशीच प्रभावी टीम तयार करणे आवश्यक आहे. ‘माऊथ पब्लिसिटी’ नेहमीच लाभदायक ठरते.

११. आपल्या प्रतिस्पर्धींनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती नको:-

 • युपीए सरकारने राष्ट्रवादाची कधीच कास धरली नाही. किमान असा संदेश देशाला गेला. २६/११ च्या हल्ल्याचा बदला म्हणून कोणतीही कारवाई सरकारने केली नाही. ही चूक मोदींनी केली नाही. त्यांनी उरी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून दोनदा सर्जीकल स्ट्राईक्स केलेत. यामुळे लोकांना मोदी आपले वाटू लागले. सर्वसामान्य माणसाचा मनोभाव त्यांना कळतं आणि ते त्यानुसार वागतात हे लोकांना जाणवलं.
 • उद्योजकानेही आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या काही मोठ्या चुका समजून घेऊन स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवावेत व त्या चुका टाळाव्यात.

१२. सगळ्यात महत्त्वाचं एक अमित शहा मिळवा:-

 • शोलेतल्या वीरूचं मार्केटिंग जितकं जयने केलं नसेल, राजकुमार हिराणीने संजय दत्तने प्रतिमा जितकी उजळवली नसेल, तितकं प्रचंड कार्य अमित शाहने नरेंद्र मोदींसाठी केलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेतसुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे अमित शाहने दिलेली होती. अमित शाहने मोदींना कायम सपोर्ट दिला. मोदींच्या यशात अमित शाह सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे.
 • उद्योजकाकडेही असाच एक प्रामाणिक, पूर्णपणे आपल्या उद्योगाला वाहून घेणारा मित्र, जोडीदार हवा. याशिवाय जाणकार आणि तज्ञांची मदत घ्यावी जो बिजनेसला मोठं करेल.

उद्योजकांसाठी २०१९मधील मोदींचा विजय खूप काही शिकवून जातो.

नरेंद्र मोदींना मिळालेले बहुमत हा बहुजनांचा मूक शहाणपणा?,

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?,

बँक मनी, जनधन योजना आणि भारतीय अर्थव्यवस्था,

नोटबंदीचे महत्व अधोरेखित  करणारे करसंकलनाचे आकडे,

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर  आपले नाव स्पेस (Space) गावाचं नाव लिहून Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]