Arthasakshar Financial Statements फायनान्शिअल स्टेटमेंट्स
https://bit.ly/39zDBTy
Reading Time: 3 minutes

फायनान्शिअल स्टेटमेंट्स आणि त्यांचे महत्व

कोणत्याही कंपनीच्या फायनान्शिअल स्टेटमेंट्सद्वारे (Financial Statements) आपल्याला तिची स्थिति समजू शकते. ज्याप्रमाणे फायनान्शिअल स्टेटमेंट्स कंपनीचा नफा आणि कामाची व्यवस्था दर्शवतात त्याचप्रमाणे ते भविष्यातील उद्दिष्टे आणि ध्येय देखील अधोरेखित करतात. याचमुळे कंपनीच्या यशाचे प्रथम गमक त्यांची फायनान्शिअल स्टेटमेंट्स असू शकतात, म्हणूनच फायनान्शिअल स्टेटमेंट्सचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे.

शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

Financial Statements: फायनान्शिअल स्टेटमेंट्स मध्ये तीन स्टेटमेंट्स असतात-

1. बॅलेन्स शिट

2. इन्कम स्टेटमेंट

3. कॅश फ्लो स्टेटमेंट 

याशिवाय “ईक्विटी मधील बदल” आणि “अकाऊंट्स मधल्या नोंदी” हे आणखी दोन पत्रक आहेत.

आजच्या लेखात तीन पत्रके का महत्वाची आहेत हे आपण विस्ताराने पाहूया –

1.  बॅलेन्स शिट –

  • बॅलेन्स शिट वरुन त्या कंपनीची मालमत्ता आणि दायित्व (Assets & liabilities) समजते.
  • यासाठीचा एकमेव नियम आहे तो म्हणजे मालमत्ता = दायित्व.
  • मालमत्ता आणि दायित्व यांची संख्या नेहमीच जुळली पाहिजे म्हणजेच,
  • मालमत्ता (Assets) म्हणजे ज्यांच्या उपयोगाने व्यवसाय वाढीस लागून पैसा मिळतो.
  • मालमत्ता दोन प्रकारच्या असतात –
    1. निश्चित मालमत्ता (Tangibles Assets): निश्चित मालमत्तेमध्ये भौतिक स्वरुपातल्या मालमत्तेचा समावेश होतो उदा. जमीन, कारखाना, यंत्र, उपकरणे इ.
    2. अनिश्चित मालमत्ता ( Non Tangibles Assets): अनिश्चित मालमत्ता म्हणजे गुडविल, पेटंट, कॉपीराईट याशिवाय येणारी बिले, रोख रक्कम इ. या भौतिक स्वरुपात नसल्यामुळे एकतर खरेदी केल्या जातात अथवा बाजारातील परिस्थितीनुसारमूल्य निश्चित केले जाते. 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

  • दायित्व (liabilities) म्हणजेच आधीच झालेल्या व्यवहारांची देणी आणि कर्जे.
  • थोडक्यात बॅलेन्स शिट च्या दोन बाजू – मालमत्ता आणि दायित्व या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत.
  • दायित्व तीन प्रकारात विभागल्या जाते –
    • भागधारकांची ईक्विटी: भागधारकांची इक्विटी ही कंपनीची शेअर्स कॅपिटल (जेव्हा समभाग दिले जातात तेव्हा) किंवा कंपनीचा पाया घालण्यासाठी उद्योजक किंवा भागीदारांनी आणलेले भांडवल यांचे एकत्रित दायित्व म्हणजे भागधारकांची ईक्विटी. 
    • दीर्घकालीन दायित्व (Long Term Liabilities): एका वर्षाच्या कालावधीत देय नसलेले दायित्व म्हणजेच दीर्घकालीन दायित्व. यामध्ये  बँकेचे कर्ज, गहाण कर्ज इ. चा समावेश होतो.
    • चालू / सध्याचे दायित्व (Current Liabilities): एक वर्षाच्या आत देय असलेल्या दायीत्वाचा समावेश चालू दायित्व मध्ये होतो. उदा.  क्रेडिटर्स, देय बिले, इ. 
  • दैनंदिन कामकाजाची स्थिति ज्या मधून समजते त्या खेळत्या भांडवलाचाही विचार आर्थिक पत्रकांमध्ये केला गेला पाहिजे. खेळते भांडवल म्हणजेच सध्याची मालमत्ता आणि चालू दायित्व यांच्यातील फरक (Working Capital = Current Assets – Current Liabilities)

गुगल माय बिझनेस म्हणजे नेमकं काय?

2. इन्कम स्टेटमेंट –

  • कंपनीच्या इन्कम स्टेटमेंट मध्ये सामान्यतः मुख्य खर्च आणि मिळालेले उत्पन्न याचा समावेश असतो.
  • फायनान्शिअल स्टेटमेन्ट तयार करण्यासाठी अक्रुअल सिस्टीमचा (accrual system) अवलंब केल्यामुळे खर्च आणि उत्पन्नामध्ये सध्याचे आणि भविष्यातले, अशा दोन्ही रकमांचाचा समावेश होतो.
  • उत्पन्नाचे दोन प्रकार पडतात,
    1. मुख्य उत्पन्न (Gross Income): कंपनीच्या प्राथमिक कामांतून मिळवलेल्या महसुलाची नोंद याखाली करण्यात येते. हे प्राथमिक उपक्रमांमधून मिळणारे उत्पन्न  असे एक उपहेल तयार करेल.यालाच प्राथमिक कामांमधून मिळणारे उत्पन्न (Income from Primary Activities) असेही म्हणतात. 
    2. दुय्यम उत्पन्न (Income from Secondary Sources): प्राथमिक स्त्रोतांशिवाय इतर स्त्रोतांद्वारे मिळवलेल्या कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाला दुय्यम उत्पन्न समजले जाते.  उदाहरणार्थ, लाभांश, भाडे, इ. अनिश्चित उत्पन्नदेखील दुय्य्म उत्पन्नाचाच भाग आहे. अनिश्चित उत्पन्न म्हणजे नियमित स्वरुपात नसणारे उत्पन्न. उदा. एखादी मालमत्ता,शेअर्स, कारखाना, उपकरणे , इत्यादी विकून झालेला नफा.
  • उत्पन्नाच्या अगदी विरुद्ध बाजू म्हणजे अर्थातच खर्च ! उत्पन्न म्हणजे येणारा पैसा तर खर्च म्हणजे जाणारा. यामध्ये देखील प्राथमिक खर्च आणि दुय्यम खर्च असे भाग आहेत. तसेच कामासाठी लागलेला पैसा व झालेला तोटा यामध्येही याचे वर्गीकरण केले जाते. 

फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग १

3. कॅश फ्लो स्टेटमेंट –

  • कॅश फ्लो स्टेटमेंटला महत्व देण्याचे कारण म्हणजे यातील अहवालामुळेच आपल्याला रोख रक्कम कुठे, कधी आणि कशी वापरली गेली हे समजते.
  • कॅश फ्लो स्टेटमेंट तीन भागांमध्ये विभागले जाते.
    1. सध्या कार्यरत (Operating): रोजच्या कामकाजात रोकड म्हणजे कॅश जिथे जिथे लागते त्या सर्व कामांचा या भागात समावेश होतो.
    2. गुंतवणूक (Investing): यामध्ये जागा, ऑफिस, उपकरणे, यंत्रे इ. स्वरुपातील गुंतवणुकीचा समावेश होतो.
    3. वित्तपुरवठा (Financing): शेअर्स संबधित व्यवहार, लाभांश भरणे, देणे, घेणे असे सर्व वित्तीय व्यवहार वित्तपुरवठा मध्ये येतात.

फ्रेंचाइजी व्यवसायाबद्दल सर्वकाही – भाग २

आर्थिक वर्षाच्या शेवटी रोख शिल्लक शोधण्यासाठी तिन्ही प्रमुख स्टेटमेंट्सची शिल्लक रकमेची बेरीज केली जाते. अशाप्रकारे, फायनान्शिअल स्टेटमेंट्स (Financial Statements) कंपनीच्या विद्यमान स्थितीची माहिती देतात. ही स्टेटमेंट्स म्हणजे त्याच्या कामगिरीचे प्रगती पुस्तकच असते. 

– आदित्य कोंडावार 

96209 18600

(आदित्य कोंडावार हे शेअर मार्केट विश्लेषक असून गुंतवणुकीविषयी सल्ला देणारी JST Investment या फर्मचे संस्थापक आहेत. त्यांना संपर्क करण्यासाठी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधा.)

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.