franchise business
Reading Time: 3 minutes

Franchise Business

फ्रेंचाइजी व्यवसाय (Franchise Business) करताना यासंदर्भातील काही नियम व कायदे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. योग्य माहिती घेऊनच मग या व्यवसायास सुरुवात केल्यास यामधून तुम्ही निश्चितच चांगले उत्पन्न मिळवू शकता.

हे नक्की वाचा: Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसाय कसा सुरु कराल?

Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसाय सुरु करताना काही महत्वाच्या गोष्टी 

१. फ्रेंचाइजीचा समूह किंवा ब्रँड – 

  • अनेक उद्योगसमूह आहेत, जे फ्रेंचाइजी स्वरूपात त्यांचा व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करत असतात. फ्रेंचाइजी म्हणजे मूळ उद्योग समुहाचा उपसमुह. 
  • फ्रेंचाइजीचे काही प्रकार आहेत, म्हणजे घरगुती उद्योगांच्या रूपात सुद्धा फ्रेंचाइजी मिळू शकते. 
  • घरगुती फ्रेंचाइजींना जास्त ओव्हरहेडची गरज नसते आणि हे उद्योग इतर व्यवसायांच्या तुलनेत जास्त फायदेशीर असतात. इतर व्यवसायासाठी जास्त गुंतवणूकीची गरज असते, घरगुती व्यवसाय कमी गुंतवणूकीतही यशस्वी होऊ शकतात. 

२. फ्रेंचाइजीसाठी लागणारे भांडवल – 

  • फ्रेंचाइजी व्यवसायासाठी लागणारे भांडवल पुरवणारे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. 
  • जर यासाठी तुम्ही कर्ज घेतले तर व्याजदरासहित कर्जाची परतफेड होऊन, प्रत्यक्षात नफा मिळवायला बराच वेळ लागू शकतो. 
  • फ्रेंचाइजीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी, सुरुवातीची गुंतवणूक म्हणजे फ्रेंचाइजी फी, व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लागणारे भांडवल (Working Capital)  या गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश भांडवलात होतो. 
  • सुरूवातीलाच किती भांडवल लागू शकते याचा योग अंदाज घेणे महत्त्वाचे आहे. 

३. फ्रेंचाइजी कोण चालवेल?  

  • फ्रेंचाइजी कोण चालवत आहे यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण व्यवसायाच्या मालकाने चालवलेली फ्रेंचाइजी आणि मॅनेजर किंवा व्यवस्थापकाने चालवलेली फ्रेंचाइजी यात बराच फरक असतो. 
  • जर तुम्ही कंपनीच्या अधिक फायद्याचा विचार करत असाल, तर स्वत: देखरेख करणे जास्त फायद्याचे ठरते कारण मॅनेजर किंवा एचआर मुळे येणारे खर्चाचे ओझे टाळता येते. 
  • फ्रेंचाइजी घेतली की येणारे सर्व उत्पन्न आपल्याच खात्यात येणार असं नवीन व्यवसायिकांना वाटत असतं, पण हे खरं नाही. व्यवसायातील नफ्यावर, कर्ज परतफेडीवर आणि भांडवलासाठी वारंवार लागणाऱ्या कर्जावर कर लावलेले असतात, जे कर फ्रेंचाइजी मालकाने भरण्याच्या आधी तुम्हाला भरणे आवश्यक असते. 

४. Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसायाची ध्येये – 

  • चांगला नफा मिळवणे हे प्रत्येकाचेच प्राथमिक उद्दिष्ट असते. पण कोणत्याही व्यवसायात लगेच हवा तसा नफा मिळत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.
  • फ्रेंचाइजी विकायचं ठरवलं, तरच एकदम नफा मिळू शकतो, इतरवेळी मात्र त्यादृष्टीने प्रयत्न चालू ठेवावे लागतात. 
  • आपल्या फ्रेंचाइजीची बाजारात असणारी एकूण किंमत आहे यावरून आपल्याला किती फायदा मिळू शकतो हे ठरवता येते. 
  • सुरूवातीला प्रत्येक व्यवसाय ‘रेड झोन’ मध्ये असतो. अशावेळी फायदा किती होईल ते सांगणे सोपे नाही पण व्यवसाय एकदा ‘ग्रीन झोन’ मध्ये गेला, म्हणजे स्थिर झाला की फायद्याचं गणित ठरवता येते.

५. फ्रेंचायझरकडून कोणती मदत मिळू शकते? 

  • एरवी स्वत:चा व्यवसाय सुरू केला, तर त्यासाठी लागणारा कच्चा माल, भांडवल, फर्निचर या सगळ्या गोष्टी स्वत:लाच पहाव्या लागतात. फ्रेंचाइजी व्यवसायात मात्र फ्रेंचायझर ची चांगली मदत मिळते. यामुळे मोठा आधार मिळतो. 
  • व्यवसायाची दिशा चुकत असल्यास फ्रेंचायझर योग्य मार्गदर्शन करून शकतो आणि योग्य सल्लाही देतो. यामुळे ही प्रक्रिया सुलभ होण्यास मदत मिळते. 

इतर लेख:विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

६. कायदेशीर पैलू –

भारतीय उद्योग जगतातील ‘फ्रेंचाइजी’ ही अलिकडेच चालू झालेली व्यवसायाची पद्धत आहे, म्हणून फ्रेंचाइजी बाबतीत अजुनतरी कोणते विशिष्ट कायदे बनविण्यात आले नाहीत. काही कायदेशीर लोकांनी फ्रेंचाइजी व्यवसायासाठी काही नियम आखून दिले आहेत –

  • करार कायदा: फ्रेंचायझर आणि फ्रेंचाइजी घेणारा व्यवसायिक यांच्यात होणारा करार, करार अधिनियम १८७२ नुसार दर्शवण्यात येतो. 
  • ग्राहक संरक्षण कायदा:  ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना उत्पादनात काही दोष आढळून आल्यास त्या कंपनीला जबाबदार धरण्यात येते. 
  • मक्तेदारी आणि निर्बंधित व्यापार कायदा १९६९ (MRTP):  फ्रेंचाइजीच्या कराराची नोंद एमआरटीपी कायद्याअंतर्गत व्हायला हवी. यामध्ये फ्रेंचाइजी व्यवसाय उभारणीचा खर्च, पुनर्विक्रीची किंमत यासह इतर नियम अटींचा समावेश होतो. फ्रेंचाइजीचा करार हा किंमत किंवा पुरवठा यावर निर्बंध आणणारा नसावा हे लक्षात घ्यावे. 
  • स्पर्धा कायदा २००२ (Competition Act, 2002):   पारंपारिक व्यवसाय पद्धतीमध्ये ठराविक व्यवसाय मालकाकडे त्या वस्तूची किंवा उत्पादनाच्या व्यापर किंवा विक्रीची मक्तेदारी होती. त्यामुळे व्यवसायिक स्पर्धेला अनुकुल वातावरण मिळत नसे. मात्र या कायद्यामुळे मक्तेदारीवर निर्बंध आले व स्पर्धेमुळे उत्पन्नाचा दर्जा सुधारला. 
  • ट्रेडमार्क कायदा, १९९९ (Trademark Act, 1999): ट्रेडमार्क कायद्यानुसार वस्तू आणि सेवांच्या गुणांच्या नियम अटी व ट्रेडमार्कच्या नोंदणी प्रदान करण्यात येतात. 
  • कर पद्धती: जेव्हा फ्रेंचायझरला रॉयल्टी फी, फ्रेंचाइजी फी व सेवा शुल्क प्राप्त होते तेव्हा फ्रेंचायझरला तो भारतीय किंवा परदेशी जरी असला तरी प्राप्तिकर कायद्याच्या कलम ९ नुसार कर भरणे अनिवार्य असते. ठराविक उत्पन्न म्हणजे रॉयल्टी फी किंवा मिळणारे व्याज हे भारतीय उत्पन्न मानले जाते. फ्रेंचाइजी व्यवसायातील नफ्यावर ३०℅ पर्यंत कर आकारण्यात येतो. 

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊनच फ्रेंचाइजी व्यवसायात उतरायला हवे. फ्रेंचाइजी काही वर्षे चालवून आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतो. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Franchise Business in Marathi, Franchise Business  Marathi mahiti, Franchise Business Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.