Reading Time: 2 minutes

लिस्टेड कंपनी म्हणजे काय?

  • सर्व सामान्यपणे किंवा ढोबळ मानाने लिस्टेड कंपनीची व्याख्या, “ज्या कंपनीचे शेअर अधिकृतरित्या शेअर बाजारात विकले जातात, ती कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनी.” लिस्टेड कंपनी म्हणजे सुचिबद्ध कंपनी!

  • ज्या कंपनी विशिष्ट प्रकारच्या शेअर बाजारात समाविष्ट असतात, व्यापार करतात त्या म्हणजे लिस्टेड कंपनी. 

  • एखादी खाजगी कंपनी तिचे शेअर्स जेव्हा विशिष्ट वर्गासाठी राखीव न ठेवता, ते सार्वजनिक करते, तेव्हा शेअर बाजारात ती कंपनी लिस्टेड अर्थात सुचिबद्ध झाल्याची नोंद होते. 

  • या लिस्टेड कंपनीची मालकी, त्या त्या कंपनीच्या शेअर धारकांकडे असते. या प्रकारातील कंपनीसंबंधीचे निर्णय हे भागधारकांनी (शेअर्स) निवडलेल्या कमिटीचे सभासद घेतात, ज्या मध्ये कार्यकारी संचालक मंडळ याचा समावेश असतो. 

  • लिस्टेड कंपनीचे  कामकाजाबद्दलचे नियम हे फारसे कठोर नसतात. त्यामुळे या कंपनीच्या व्यवहारामध्ये लवचिकता, पारदर्शकता असते व फारशी गुंतागुंत नसते. 

कंपन्यांचे प्रकार

एखादी कंपनी लिस्टेड (सुचिबद्ध) केव्हा होते? किंवा कंपनी लिस्टेड होण्याची कारणे काय असतात?

  • बऱ्याचदा खाजगी कंपनीला- 

    • तिचा विस्तार करण्यासाठी

    • नवनवीन प्रोजेक्ट साठी,

    • कंपनीचे भांडवल वाढवण्यासाठी, आर्थिक सक्षमता मिळवण्यासाठी, 

    • कंपनीचे कर्ज चुकवण्यासाठी ई.  

  • अनेक कारणांसाठी पैशांची म्हणजे भांडवलाची गरज असते. तर, हे भांडवल किंवा आर्थिक सक्षमता मिळवण्यासाठी कंपनी लोकांचे पैसे वापरते व त्या बदल्यात त्यांना त्या कंपनीचे शेअर्स म्हणजेच भाग देऊ करते. 

  • अशाप्रकारे कंपनीचे शेअर्स सार्वजनिक झाल्याने लोक हे शेअर्स खरेदी करू शकतात व त्या त्या कंपनीवर अंशतः मालकी हक्क सांगू शकतात. 

  • सामान्य नागरिकांना चांगल्या, प्रतिष्ठित, नामवंत कंपनीचे शेअर्स खरेदी करून, त्या कंपनीत सुरक्षित गुंतवणूक करण्याचा हा एक राजमार्गच आहे. 

सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी (One Person Company)

जेव्हा कंपनी लिस्टेड अर्थात सुचिबद्ध होते, तेव्हा त्या कंपनीला कोणते व कश्या प्रकारचे फायदे मिळतात? 

१. गुंतवणूकीचा राजमार्ग- 

  • जेव्हा एखादी खाजगी कंपनी लिस्टेड होते, त्यावेळी तिला शेअर बाजारात विशेष सुरक्षा मिळते अथवा तिला सुरक्षित केलं जातं. 

  • कोणत्याही शेअर बाजारात लिस्टेड झालेल्या कंपनीला आपली सर्व माहिती गुंतवणूकदारांसाठी खुली करावी लागते. (उदा.रिलायन्स इंडस्ट्रीज ली.च्या वेबसाईटवर असणारी माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा).

  • शेअर बाजारात फक्त लिस्टेड कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीचे अंदाज बांधले जाऊ शकतात. साहजिकच याचा सकारात्मक परिणाम कंपनी व गुंतवणूकदारांवर होतो. गुंतवणूकदार केवळ याच विश्वासअर्हतेवर लिस्टेड कंपनी मध्ये गुंतवणूक करू पाहतात. 

  • त्याचबरोबर व्यवहारातील पादर्शकता, स्पर्धेतील सुरक्षितता हा ही कळीचा व महत्त्वाचा मुद्दा ठरतो. म्हणजेच कंपनी लिस्टेड होणं, हे त्या कंपनीसाठी, शेअर बाजारातील गुंतवणूकदारासाठी किफायतशीर ठरतं. सामान्य नागरिकांसाठी गुंतवणुकीचा हा एक राजमार्ग ठरतो. 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

२. भांडवल वाढवण्याची संधी-

  • खाजगी कंपनी लिस्टेड होते, तेव्हा तिला तिच्या भांडवलामध्ये वाढ करण्याची संधी मिळते. या भांडवलाचा वापर करत, कंपनी तिचा विस्तार करू शकते. 

  • कंपनीची मालकी असणाऱ्या नवीन प्रकल्पांचा खर्च करू शकते. इतर कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकते. म्हणजे थोडक्यात, बऱ्याचदा भांडवल वाढवणे हा ही कंपनी लिस्टेड करण्याचा हेतू असतो. त्यामुळे कंपनीला ही आर्थिक सुरक्षितता व सक्षमता मिळते. 

 

३. बाजारपेठेतील सुरक्षितता-

  • कंपनी लिस्टेड किंवा सुचिबद्ध झाल्यावर तिला बाजारपेठेत अनेक काळ टिकणारी सुरक्षितता मिळते. तसेच बाजारपेठेतील पत आणि महत्व प्राप्त होते. 

  • याच बळावर भाग धारकांची म्हणजेच गुंतवणूकदारांची संख्या वाढते. 

 

४. व्यापारावर नियंत्रण

  • लिस्टेड कंपनीचे सर्व व्यवहार हे नेहमी ‘bye law of exchange’ या नियमानुसार होतात.

  • स्टॉक एक्सचेंजच्या नियामक यंत्रणेमार्फत अनियंत्रित व्यापारपद्धती रोखून कंपनीच्या शेअर्स संदर्भात  सर्व व्यवहारांचे परीक्षण केले जाते. यामुळे कंपनीचे व्यापारावर नियंत्रण राहते व गुंतवणूकदाराचा विश्वास वाढीला लागून कंपनीला सुरक्षितता मिळते.

 

५. व्यवहारात पारदर्शकता

  • कंपनीच्या लिस्टिंग करारपत्रानुसार कंपनीच्या सर्व व्यवहारांची माहिती गुंतवणूकदारांना दिली जाते. उदा. गुंतवणूकदारांच्या नफ्याचा हिस्सा, बोनस व इतर भत्ते, गुंतवणूकदारांचे हक्क व संबंधित समस्या, कंपनीने वेळोवेळी केलेले व्यवहार व कंपनी संबंधीची माहिती यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती गुंतवणूकदारांना पुरवली जाऊन, पारदर्शकता ठेवली जाते. 

  • यामुळे कंपनी व गुंतवणूकदार यांच्यातील विश्वासाहर्ता वाढीला लागते. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/  
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…