Reading Time: 3 minutes

अनेक प्रकारच्या कार्डनी आपले जीवन व्यापून टाकलं आहे. बऱ्याच ठिकाणी आवश्यक म्हणून पॅनकार्ड, आधारकार्ड आहे. तर वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आहे. गाडीचे नोंदणी प्रमाणपत्रही आपल्याला स्मार्टकार्डच्या स्वरूपात मिळते. 

लोकल, मेट्रो, बस यांच्या प्रवासाकरिता वेगवेगळी कार्डस आहेत. याशिवाय तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांमुळे बँकिंग व्यवहारासाठी “एटीएम कम डेबिट कार्ड” आणि आपल्याकडे एकही पैसा नसताना थेट किंवा हप्त्याने खरेदी करण्यासाठी, अडीअडचणीला पटकन रोख पैसे  काढण्यासाठी किंवा माझ्याकडे अमक्या तमक्या बँकेचे कार्ड आहे. अशा फुशारक्या मारण्यासाठी क्रेडिट कार्ड आहे. 

बरं ही कार्ड आपल्या आवश्यकते एवढी आहेत का? यातील किती कार्ड्सची आपल्याला आजिबात गरज नाही, याचा कोणी विचारही करत नाही. जास्तीत जास्त कार्ड असतील तर आपली प्रतिष्ठा वाढते अशी अनेकांची भ्रामक समजूत आहे. या कार्डांमुळे आपले जीवन खरच सुलभ झालंय का? या गोष्टींचा खरोखरच विचार करण्याची गरज आहे. असं असलं तरी प्रत्येकाची किमान ५/६ कार्डपासून तरी सुटका नाहीच.

एटीएम मधून पैसे आलेच नाहीत, पण डेबिट झाल्याचा मेसेज आला तर काय कराल?

 • कार्डांमुळे अनेक गोष्टी सुखकारक झाल्या आहेत त्यामुळे येणारी नवी पिढी, सध्या ज्यांचे वय १८ ते  ४५ च्या आसपास आहे, ते लोक आणि कोणत्याही वयाच्या “टेक्नोसेव्ही” व्यक्ती व्यवहार करण्यासाठी सध्या आणि यापुढेही याचा वापर करतीलच. 
 • जोपर्यंत ही कार्ड आपल्याकडे सुरक्षित असतात तोपर्यंत आपली खर्च करण्याची ताकद आणि आत्मविश्वास वाढलेला असतो. 
 • अनेकांना त्यांच्या जरुरीपेक्षा जास्त किंवा सर्वच कार्डस जवळ बाळगायची हौस असते. याचा सर्वात मोठा तोटा हा की पाकीट हरवल्यास एका झटक्यात सर्व कार्ड नाहीशी होतात. 
 • यातील काही कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून त्याचा प्राथमिक अहवाल घेणे, दुसरे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करणे, यासाठी प्राधान्याने वेळ काढावा लागतो. 
 • जर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर ते ताबडतोब बंद करावे लागते. ही प्रक्रिया होईपर्यंत त्यावर एखादा व्यवहार झाला तर नुकसान सहन करावे लागते. 
 • डेबिट/ क्रेडिट कार्डवरून काही ऑनलाइन व्यवहार हे त्यावरील “सीव्हीव्ही”चा वापर करून होऊ शकतात. 
 • याशिवाय जर आपण प्रवास करीत असलो किंवा अन्य शहरात असलो तर आपली फारच मोठी गैरसोय होऊ शकते. याशिवाय होणारा मनस्ताप वेगळाच.
 • बँकेचे व्यवहार करताना घ्यायची काळजी या माझ्या यापूर्वीच्या लेखात आपल्या गरजेनुसार कार्ड व्यवहारांपासून संरक्षण देणारा विमा घ्यावा असे सुचवले होते. 
 • या योजना कशासाठी? त्यांची गरज काय? या विषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. बँका, बिगर बँकिंग कंपन्या यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या सहकार्याने अशा योजना आणल्या आहेत. 
 • जर आपले डेबिट / क्रेडिट कार्ड हरवले, तर साधारणपणे व्यक्ती गोंधळून जाते आणि त्याला नेमके, प्रथम काय करायला हवे ते सुचत नाही. कार्ड ताबडतोब बंद करण्यासाठी ते देणाऱ्या संस्थेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यावरील व्यवहार थांबवायचे (Block) असतात. असे करण्यापूर्वी झालेल्या व्यवहाराची सर्व जबाबदारी ग्राहकाची असून कार्ड हरवल्याची सूचना दिल्यानंतर जर असा व्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी ग्राहकावर येत नाही. 
 • अशी अनेक कार्ड असतील, तर त्या प्रत्येक ठिकाणी अशी वेगळी सूचना देणे गरजेचे असते. यावेळी कार्ड सुरक्षा योजनेची आपल्याला मदत होऊ शकते. अशी योजना घेऊन आपण आपली सर्व कार्ड आधीच सुरक्षित करून ठेवू शकतो.
 • कार्ड सुरक्षितता योजना हा एक सर्वसाधारण विम्याचा करार असून त्यामुळे आपले क्रेडिट /डेबिट कार्ड, योजना सदस्यत्वाचे कार्ड चोरीस जाणे, हरवणे, गैरव्यवहार होणे यापासून संरक्षण मिळते. यासाठी फी म्हणून दरवर्षी निश्चित रक्कम भरावी लागते. यामुळे ही योजना घेणाऱ्यास कार्ड व्यवहारापासून संरक्षण आणि तातडीची आर्थिक मदत असा दुहेरी फायदा होतो. आपल्या गरजेनुसार अशा अनेक प्रकारच्या योजना सध्या उपलब्ध आहेत.

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

कार्ड सुरक्षा योजनांची वैशिष्ट्ये-

 • सर्व प्रकारच्या कार्डाचा समावेश: या योजनेत आपल्याकडील सर्व कार्डाचा समावेश होतो. जसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ई.
 • तुलनात्मक दृष्टीने अत्यल्प प्रिमियम: यासाठी येणाऱ्या खर्च अत्यल्प असून वार्षिक ₹ ८९९/- पासून अशा योजना उपलब्ध आहेत.
 • कार्ड व्यवहार बंद करणे सोपे: एकदा या योजनेत भाग घेऊन आपल्या सर्व कार्डाचा तपशील दिला असता, जर कार्ड हरवले चोरीस गेले, तर विमा कंपनीस कळवले की आपली जबाबदारी संपते. ही सर्व कार्ड्स आपल्या वतीने कंपनीकडून बंद केली जातात. त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी फोन करावे लागत नाहीत. 
 • कार्ड नवीन मिळवण्यासाठी मदत: बंद करण्यात आलेल्या कार्डाऐवजी दुसरे कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत विमा कंपनीकडून केली जाते.
 • कार्ड बंद करण्यापूर्वी आपण न केलेल्या व्यवहाराची भरपाई: कार्ड चोरीस जाणे, हरवणे ते ते बंद करण्याच्या कालावधीत काही गैरव्यवहार झाला असेल, तर विमा कंपनीकडून त्याची भरपाई केली जाते.
 • तात्पुरती आर्थिक मदत: आपण बाहेरगावी असताना कार्ड हरवले,  तर रोख रक्कम, प्रवास खर्चाची सोय, हॉटेल बिलची भरपाई २४ तासात केली जाते. या रकमेची पूर्तता ही मदत घेतल्यापासून २८ दिवसात करायची असून, त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही.
 • पॅनकार्ड: पॅनकार्ड हरवल्यास आपल्या वतीने अर्ज करून दुसरे पॅनकार्ड मिळविता येते यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

योजनेची रचना कमीजास्त प्रमाणात  वरीलप्रमाणे असून, आपल्याला योग्य वाटेल अशा योजनेचा अर्ज भरून देऊन अथवा ऑनलाइन भरून त्याचा प्रीमियम भरावा. आपली विनंती मान्य झाली की एका बंद पाकिटातून आपल्याला मान्यता पत्र, नियम अटी यांची माहिती येईल. 

त्याचप्रमाणे आपल्या सर्व कार्डाचा तपशील द्यावा लागेल. एकदा का हा तपशील विमा कंपनीस दिलात की आपण निर्धास्त राहू शकाल. योजनेत नमूद केलेल्या सेवा, जोखीम हमी, कमाल नुकसानभरपाई, तातडीची मदत यावर प्रिमियम रक्कम ठरत असल्याने विविध योजनांची तुलना करून आपल्या उपयोगी पडेल अशीच योजना निवडावी.

– उदय पिंगळे

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 
https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या https://arthasakshar.com/disclaimer/  
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुले आणि अर्थसाक्षरता

Reading Time: 3 minutes माझ्या माहितीत असलेल्या एका व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा मुलगा एका नामवंत…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.