https://bit.ly/35w2LlH
Reading Time: 2 minutes

मुहूर्त ट्रेडिंग

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संपूर्ण शेअर बाजार “मुहूर्त ट्रेडिंग” साजरे करतो. या वर्षी “मुहूर्त ट्रेडिंग” ची वेळ लक्ष्मी पूजनाच्या (१४ नोव्हेंबर रोजी) संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ असणार आहे. 

  • शेअर बाजार म्हणजे सगळा पैशांचा खेळ. पैसे गुंतवायचे अन त्यातून पैसे कमवायचे हा मूलभूत सिद्धांत. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे सर्वजण लक्ष्मी मातेला प्रसन्न करू बघत असतात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रार्थना करतात आणि त्या दिशेने प्रयत्न करत असतात.  
  • शेअर बाजारात दोन मुहूर्त महत्वाचे मानले जातात. एक असतो तो “अक्षय तृतीया” आणि दूसरा म्हणजे “लक्ष्मी पूजन.” 
  • अक्षय तृतीया म्हणजे चांगल्या गोष्टींचा संचय करणे, त्याचा क्षय न होऊ देणे, एखादी चांगली वस्तु आपल्याकडे अक्षयपणे राहावी अशी त्यामागची भावना. 
  • अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारा वर्ग एखादा चांगला शेअर खरेदी करून ठेवतो. तो चांगला शेअर कायम आपल्याकडे राहावा, त्यातून संपत्ती वाढत जावी अशी त्यामागची भावना. 
  • शेअर बाजारात दूसरा महत्वाचा मुहूर्त म्हणजे “लक्ष्मी पूजन.” ह्या दिवशी जगभरात दिवाळीचा उत्साह असतो. सर्वजण कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतात. फटाक्यांची आतिषबाजी सुरू असते आणि लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते. 
  • लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न रहावी यासाठी हे सगळं उत्साही वातावरण असतं. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. पण थेट पैशांशी निगडीत असलेलं हे क्षेत्र असल्याने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बंद ठेऊन कसं चालेल? लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजारात “मुहूर्त ट्रेडिंग” नावाचा एक प्रकार असतो.
  • ज्या पद्धतीने सर्वत्र लक्ष्मीपूजन सुरू असतं तसंच ते Exchanges (जिथे शेअर्सची देवाण-घेवाण होते असं आर्थिक व्यवहारचं केंद्र) येथेही लक्ष्मीपूजन होत असतं. त्यामुळेच दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी शेअर बाजार, अर्थात NSE-BSE हे साधारणपणे एक तासासाठी चालू केले जातात. 
  • या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. चांगल्या मुहूर्तावर चांगले शेअर्स आपल्या पोर्टफोलियोमध्ये जोडता येतात. 
  • त्या शेअर्सच्या माध्यमातून अर्थसमृद्धीची मुहुर्तमेढ रचता यावी अशी अपेक्षा असते. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे अनेकजण या दिवशी एखादा शेअर खरेदी करून ठेवतातच. यादिवशी Intraday Trade फारसे होत नाहीत. 
  • या मुहूर्तावर शेअरची Delivery घेण्याला महत्व असतं. कुठलातरी चांगला शेअर खरेदी करून ठेवावा जो भविष्यात किंवा पुढील पिढीला चांगला परतावा देईल अशी त्यामागची भावना असते. 
  • अनेक नवगुंतवणूकदार याच शुभ मुहूर्तावर नव्याने गुंतवणूक सुरू करत असतात. जे मोठे गुंतवणूकदार असतात ते या मुहूर्तावर नव्यानं रणनीती आखतात अन त्या दृष्टीने पाऊल टाकतात.
  • दिवसा सुट्टी असली तरी संध्याकाळी या कालावधीत शेअर बाजार सुरू असेल. समभाग शेअरमध्ये (Equity Shares) पैसे लावणार्‍यांसाठी (Investment) हा दिवस खूप महत्वाचा असतो. 
  • जी व्यक्ती या मुहूर्तावर ट्रेड करते ती दीर्घकाळ शेअर बाजारात राहते असंही काहीजण मानतात. चांगल्या शेअर्सच्या रूपाने लक्ष्मीमातेला आपण आपल्या घरात घेत असतो.
  • आजपर्यंतचा इतिहास असं सांगतो की या मुहूर्तावर शेअर बाजार सकारात्मक अर्थात पॉजिटिव्ह असतो. त्याला अपवादही आहेत. 
  • २००७ आणि २०१२ च्या मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार Negative मध्ये बंद झाला होता. योगायोग म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी शेअर बाजाराने Negative Returns दिले होते. २००८ ला तर जागतिक मंदीमुळे बाजार रसातळाला गेला होता. 

२०२० हे वर्षे जगभरातील शेअर बाजारासाठी कोरोना नामक आपत्तीमुळे खूप आव्हानात्मक होतं. रसातळाला गेलेला बाजार पुन्हा नव्याने झेप घेऊन उच्चांकी पोहोचला. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले, तर अनेकांनी भरपूर नफाही मिळवला. हाच शेअर बाजाराचा भाग आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे जायबंदी झालेली अर्थव्यवस्था अजूनही संकटातच आहे. हे संकट अजून निवळलेलं नाही असं तज्ज्ञ मानतात. परिस्थिती कशीही असली तरी शेअर बाजार विराम घेतो आणि पुन्हा एकदा चालत जातो, अगदी आपल्या आयुष्यासारखा.!

गुंतवणूक न करणे हीच मोठी जोखीम (Risk )आहे. त्यामुळे गुंतवणूक करावी, सुरुवात करावी आणि चालू ठेवावी हेच दीर्घकालीन सत्य आहे. 

या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा झळाळी यावी, सर्वांना उत्तम आरोग्य लाभवे एवढीच अपेक्षा करुयात!!!

|| सर्वांना शुभ दीपावली || 

अभिषेक बुचके 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…