खरेदी
https://bit.ly/38KQlZ8
Reading Time: 3 minutes

खरेदी करताय?

सणवार म्हटले की खरेदी आलीच. पण सणावाराला खरेदी करताना काही गोष्टी विचारात घेऊन वास्तवाचे  भान ठेवणे आवश्यक आहे. उगाच आवडतंय म्हणून किंवा परवडतंय म्हणून मनमानी खरेदी करण्यापेक्षा नियोजबद्ध खरेदी करावी.  आजच्या लेखात खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती घेऊया. 

आर्याच्या घरात सण-वारांसाठी खरेदीची यादी चालू होती. ज्योती ताई त्यांच्या मुलीला सांगत होत्या, “आर्या तू मागच्या वेळेस मागवलेले ड्रेस तुला घातल्यावर आवडले नाही म्हणून तसेच पडलेत. त्यामुळे आता घेताना जरा विचार करूनच घे.” तितक्यात रोहन म्हणाला, “आई यादी काय बनवते आहेस. आपण जाऊ आणि जे हवे ते घेऊन येऊ. राहिले तर ऑनलाइन मागवू. काही गरज नाही.” 

तेवढ्यात आजीचा खणखणीत आवाज आला, “यावेळेस मी सांगते तसेच करायचे.”

आपल्या आजीचे निर्णय विचारपूर्वक आणि फायद्याचे असतात हे घरात सर्वांना ठावूक होते. पण आर्या आणि रोहनची उत्सुकता चाळवली ते दोघे आजीपाशी आले आणि म्हणाले,”आजी याने काय फरक पडणार ग?”

आजीला हेच हवे होते. ती सांगायला लागली,

“पोरांनो, सण आणि उत्सव म्हंटले की एक वेगळाच उत्साह असतो. त्यात दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणारी लग्नसराई म्हणजे फराळ, खूप सारी खरेदी, नातेवाईकांच्या भेटीगाठी, भेटवस्तूंची देवाण घेवाण हे सगळे आलेच. प्रत्येक दुकानामध्ये, तुमच्या त्या ऑनलाइन शॉपिंग मध्ये खूप ऑफर लागलेल्या असतात मग काय खारची तर खरच धमाल असते तुमची. काही दिवसांनी हे सण, उत्सव, लग्नसराई सगळे संपते आणि मग खर्चाचा काही केल्या मेळ बसत नाही. यावर्षी हे टाळायचे असेल तर मी सांगते ते नियम पाळा म्हणजे आपले सण – उत्सव तर खुशीत जातीलच, नंतर कोणताही अतिरिक्त भार देखील पडणार नाही.”

हे नक्की वाचा: दिवाळी सणाकडून शिका आर्थिक नियोजनाच्या या ६ गोष्टी 

सणावाराला खरेदी करताना लक्षात ठेवा या ७ गोष्टी

१. बजेट ठरवा – 

  • आपण सणासाठी – कार्यक्रमासाठी आपले बजेट नक्की करा. 
  • आपले येणारे उत्पन्न आणि खर्च यांची नोंद करून ठेवा. 
  • आपल्याला नक्की काय काय घेण्यात खर्च करायचा आहे हे समजेल. जेणेकरून आपल्याकडून त्याशिवाय अतिरिक्त काही घेतल्या जाणार नाही आणि जास्त खर्च होणार नाही. 
  • तसेच आवडलेली प्रत्येक गोष्ट घ्यायचे टाळा. त्या आधी ही वस्तू उपयोगी आहे ना? घरी नेऊन काही दिवसांनी अडगळीत जाण्यासारखी आहे का? टिकाऊ आहे का? या सर्वांचा विचार करूनच खरेदी करा.

२. आधी ठरवून मग खरेदी करा – 

  • सर्वप्रथम गरज आणि आवड यातील फरक ओळखून घ्या म्हणजे आपोआपच आवश्यक नसलेल्या वस्तू घेतल्या जाणार नाहीत. 
  • आपल्याला या सणाला काय काय खरेदी करायची आहे हे याची आधीच यादी बनवून ठेवली तर किंवा ऑनलाइन खरेदी करायची असेल तर आपल्या कार्ट मध्ये ॲड करून ठेवले तर, आपल्याला त्या वस्तूंवर कधी सूट मिळते ते पाहून त्याप्रमाणे खरेदी करता येते.  
  • शेवटच्या मिनिटाला जर आपण खरेदी करायचे ठरवले तर गडबडी मध्ये आपल्याला आहे त्या किमतीमध्ये/महाग खरेदी करावी लागते.

३. कोणतेही कर्ज घेणे टाळा – 

  • क्रेडिट कार्डचा वापर टाळा. कोणाकडून सणासाठी पैसे घेण्यापासून देखील दूर रहा. असे केल्याने नंतर आर्थिक भार सहन करावा लागू शकतो. 
  • जर अगदीच आवश्यक असेल तर पगार ऍडव्हान्सघेण्यापेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे योग्य ठरते. 
  • क्रेडिट कार्डचे बिल/हफ्ते वेळेत भरा अन्यथा आपणास व्याज भरावे लागेल.

महत्वाचा लेख: उत्सव काळात मिळणाऱ्या कर्ज सवलती आणि वस्तुस्थिती

४. उत्तम आणि उपयोगी भेटवस्तू निवडा – 

  • भेटवस्तू देताना त्या महागाच्या, शोभेच्या देण्यापेक्षा आपल्या बजेटमध्ये येणार्‍या उपयोगी वस्तु द्याव्यात. त्यांना आपण स्वतः सुंदर पॅक करावे. 
  • आपण स्वतः कोणासाठी कष्ट घेतले, तर समोरच्याला जास्त आनंद होईल आणि आपले बजेट सुद्धा वाढणार नाही.

५. उत्तम किमतीत चांगली वस्तु घ्या – 

  • वस्तूंची खरेदी करण्याआधी त्याच्या किमती नक्की पडताळा. 
  • तुलना करताना ऑनलाइन आणि तुमचे स्थानिक मार्केट दोन्हींमधील किमती पडताळा. 
  • काही वस्तू या स्थानिक दुकानांमध्ये स्वस्त मिळतात, तर काहींवर ऑनलाइन वेबसाईट्सवर चांगल्या ऑफर असतात. 
  • शक्यतो विंडो शॉपिंग करायचे टाळाच. ऑनलाइन डिसकाऊंटला बळी पडू नका. यामुळे अनावश्यक वस्तू घेतल्या जातात. 
  • या दिवसात अनेक वस्तूंवर सवलत असते. जास्त संख्येने घेतल्यास जास्त सवलत मिळते. मात्र अशा प्रलोभनांपासून दूर राहून आवश्यक आणि प्रमाणात वस्तु खरेदी करा.

६. गुंतवणुक करा – 

  • प्रत्येक सणाला आपल्याकडून पैसे खर्च होतात. त्याऐवजी यावेळेस त्यातील थोडी रक्कम बाजूला काढून गुंतवणूकीला सुरुवात करा.
  • या पद्धतीमुळे दरवर्षी तुमच्याकडून काही ना काही गुंतवणूक होत राहील. ज्याचा पुढे तुम्हाला नक्की फायदा होईल. 

७. दान करा – 

  • मी नेहमीच म्हणते की, “आपण समजाचे काही देणं लागतो”. आपल्याला शक्य होईल त्या परीने परतफेड करत राहावी. 
  • यामुळे एक सात्विक समाधान मिळते.अगदी व्यवहारी विचार करायचा झाला तर, दान केलेली रक्कम करबचतीसाठी ग्राह्य धरली जाते.  

आजीचे सांगून झाले होते आणि तिकडे आईची यादी बनवून झाली होती. रोहन आणि आर्याच्या आजीने सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन आता बिनधास्त खरेदीला सुरुवात करा.

सण-उत्सव हे दरवर्षी येतात आणि आपण ते तितक्याच उत्साहाने साजरे करायचे असतात. पण हे सर्व करताना आपल्या बजेटला धरून खरेदी केली तर उत्साह नक्कीच द्विगुणीत होईल. तेव्हा जपून खरेदी करा, चिंतामुक्त रहा !

टीम अर्थसाक्षरतर्फे सुरक्षित दिवाळीसाठी शुभेच्छा !!

 For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –