शेअर्स खरेदी
शेअर बाजारात गुंतवणूक करायची अनेकांची इच्छा असते, पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, “शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?”
तुम्ही केव्हापासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात, हे फार महत्त्वाचे नाही. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, “मी शेअर कधी खरेदी अथवा विक्री केला पाहिजे?”
तुम्ही मार्केटमध्ये नवे असाल तेव्हा हा प्रश्न आणखी महत्त्वाचा ठरतो. बाजाराबद्दल योग्य माहिती घेतली तरच, तुम्हाला नफा होतोय की तोटा हे ओळखता येईल. आधी आपण शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी कोणत्या प्रमुख गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल माहिती घेऊया.
हे नक्की वाचा: शेअर बाजार:गुंतवणुकीस सुरवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी
शेअर्स खरेदी-विक्री करताना लक्षात ठेवा या मूलभूत गोष्टी
१. खरेदी करण्याच्या उद्देशात बदल:
- एखाद्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करत असताना त्यामागे कारण असणे आवश्यक आहे.
- उदा. एका प्रमुख बँकेचे शेअर्स खरेदी तुम्ही खरेदी केलेत कारण त्या बँकेच्या सीईओंच्या अर्थविषयक कौशल्यावर तुमचा विश्वास आहे. एकदा का ते पदावरून दूर झाले की, गुंतवणुकीसाठी कारणच उरत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की, बँक अपयशी होईल किंवा तिच्या शेअर्सची किंमत घसरेल. तरीही तुमची गुंतवणूक एका विशिष्ट घटकावर अवलंबून होती, म्हणून तुम्ही ते शेअर्स विकणेच योग्य ठरेल.
- नेहमीच गुंतवणूक करताना कारणे पहा, कारण नष्ट झाल्यावर आपण त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणेच योग्य ठरेल.
२. उद्योगातील क्रांती:
- एखादी कंपनी ज्या क्षेत्रात आहे तेथे नियामांमध्ये सुधारणा किंवा पूर्ण परिवर्तन असे रचनात्मक बदल होत असतात.
- उदा. काही वर्षांपूर्वी डीटीएच क्षेत्र बहरात होते. लोक सेट-टॉप-बॉक्स आणि डिश कनेक्शन खरेदीसाठी धाव घेत होते. अगदी सरकारनेही या गोष्टीला प्रोत्साहन दिले. पण अचानक ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रवेश झाला आणि त्यांनी ही बाजारपेठ खिशात टाकली.
- हा बदल काही एका रात्रीतून झालेला बदल नाही. पण सध्या डीटीएच क्षेत्र जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे.
- याच कारणास्तव आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, तेथील भविष्यातील तंत्रज्ञानावर लक्ष ठेवले पाहिजे.
- भूतकाळात हे क्षेत्र किती बहरात होते, याने फार फरक पडत नाही, आपण भविष्यवर लक्ष ठेवले पाहिजे आणि काही धोका दिसत असल्यास आपले स्थान तत्काळ बदलले पाहिजे.
३. मर्यादित भांडवल:
- तुम्ही कर्मचारी असाल अथवा अब्जाधीश असाल, प्रत्येकालाच भांडवलाची मर्यादा असते.
- तुम्ही तुमचे सर्व भांडवल एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले असेल आणि त्यानंतर एखादी उत्कृष्ट संधी तुम्हाला दिसली तर तुम्ही तुमच्याकडील शेअर्स विकले पाहिजेत आणि चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
४. मूलभूत तत्त्वे:
- हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. समजा, तुम्ही स्थिर कॅश फ्लो आणि कमी कर्ज असलेल्या कंपनीत शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र अलीकडेच कंपनी कर्जात बुडून वाईट प्रतिमा निर्माण करत असेल किंवा प्रमोटर्स तिच्यापासून दूर रहात असतील, शेअर्स गहाण ठेवले असतील तेव्हा हे शेअर्स तत्काळ विकणे योग्य ठरते.
- किंमत खूप वाढली असताना शेअर्स विकणेही योग्य नाही. तुम्हाला चांगला गुंतवणूकदार व्हायचं असेल किंवा शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करायची असेल, तर तुम्ही किमान १० पटींनी परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. त्यामुळे शेअर्स विक्री करण्यापूर्वी, त्यांची किंमत चांगली असेल तेव्हा थोडा वेळ वाट पहा आणि कंपनीवर विश्वास असेल तर तिला आणखी एखादी संधी द्या.
विशेष लेख: शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी आणि कशासाठी?
शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्कृष्ट वेळ कोणती?
जास्त मागणी असलेले शेअर्स टाळा:
- ‘चुकीचे शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणतीच नसते’, हे शब्द नेहमी लक्षात ठेवावेत.
- शेअर्स कधी खरेदी करावेत, यापेक्षा ते कधी खरेदी करू नयेत, हे जाणून घ्या.
- उदा. एखादा शेअर दररोज मागील ५२ आठवड्यातील उच्चांक मोडत असेल, प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल सतत चर्चा होत असेल, असंख्य लोक तो शेअर खरेदी करत असतील; तरीही लक्षात घ्या ही गर्दी ओसरणार आहे आणि शेअरचे मूल्य नक्कीच कमी होईल.
- याचाच अर्थ या हाइपमध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही भांडवलाचा एक भाग गमवाल. कदाचित तो स्टॉक लोअर स्टॉकवर जाईल तेव्हाही तुम्ही तो शेअर खरेदी करु शकणार नाहीत, अशीही शक्यता आहे.
- त्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेले व माध्यमांत झळकणारे शेअर्स टाळा.
भांडवल वाटप चक्र पूर्ण झाले:
- एखाद्या कंपनीची मागील पाच वर्षातील कामगिरी अत्यंत चांगली असेल, तिने जवळपास ५००० कोटींचा नफा जमवला असेल, आणि कंपनी ७५०० कोटी रुपये खर्च असलेला नवीन उत्पादन प्रकल्प उभारायचा निर्णय घेत असेल तर ती व्यवसायासाठी योग्य नाही.
- कागदोपत्री ती प्रचंड नफ्यात असलेली कंपनी वाटत असली तरी तिच्यावर २५०० कोटी रुपयांचे कर्ज असेल व आता त्यातून फार उत्पन्न मिळत नसेल तर तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना काळजी घ्या.
- अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन प्रकल्पाची प्रक्रिया सुरू होताच, तिची विक्री दुप्पट होऊ शकते आणि एकदा विक्री वाढली की शेअर्सच्या किंमतीही वाढतील.
उद्योगाची वृद्धी:
- आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करतो, तेथे वृद्धीची शक्यता आहे की नाही, हेही तपासून पाहिले पाहिजे.
- आपण काही वर्षांपूर्वीचाही अभ्यास केला पाहिजे, हे क्षेत्र वाढत राहणार किंवा स्थिर राहिल, हे तपासले पाहिजे. उदा. स्वत:ला एक प्रश्न विचारा की, पाच वर्षांनंतर लोक लॅपटॉप वापरणार आहेत का? उत्तर होय असेल तर त्या उद्योगात गुंतवणूक करा.
महत्वाचा लेख: BSE vs NSE- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?
आता शेअर्स कधी खरेदी करायचे आणि कधी विकायचे, याची मूलभूत तत्त्वे तुम्हाला कळाली. यात थोडी अभ्यासपूर्वक, वेळ देऊन पार्श्वभूमी अभ्यासावी लागते, त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता.
श्री प्रांजल कामरा
मुख्य कार्यकारी अधिकारी, फिनॉलॉजी
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies