Financial documents
Reading Time: 3 minutes

Financial Documents

आर्थिक कागदपत्रे (Financial Documents) हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग आहे. आपण आपलं उत्पन्न, बचत व गुंतवणूक याबद्दलची सर्व माहिती या कागदपत्रांच्या रूपाने जतन करत असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला या कागदपत्रांबद्दल माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर संबंधित आर्थिक बाबींची इत्यंभूत माहिती असणारे सल्लागार यांच्याबद्दलही जोडीदाराला माहिती असणं आवश्यक आहे.

आजच्या धावपळीच्या जगात आपली ‘सुरक्षितता’ हा कळीचा मुद्दा होत आहे. स्पर्धेचं जग, कामाचा ताण, प्रचंड वाढलेली वाहतूक यामुळे आजकाल सकाळी घरातून निघालेली व्यक्ती ही संध्याकाळी घरी पोहचेपर्यंत घरातील व्यक्तींना एक अनाहूत चिंता सतावत असते. जशी घर सांभाळणे ही घरी असणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी असते तशी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामाबद्दल, आर्थिक नियोजनाबद्दल घरातील व्यक्तींना माहिती देऊन ठेवणे हे घरातील कर्त्या पुरुषाचं कर्तव्य असतं. “आपल्याला कधीही, कुठेही, काहीही होऊ शकतं”, हे मान्य करून आपल्या जोडीदाराला आपण सर्व  माहिती देऊन ठेवली पाहिजे. 

हे नक्की वाचा: मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे? 

Financial Documents: महत्वाची आर्थिक कागदपत्रे 

१. इच्छापत्र: 

  • प्रत्येक व्यक्तीने ठराविक वयात आपल्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाला दिली जावी याचं एक इच्छापत्र वकिलांच्या सहाय्याने तयार करून घेणं आवश्यक आहे. 
  • जसा प्रत्येक कुटुंबाचा एक ‘फॅमिली डॉक्टर’ असतो, तसा आपल्या कुटुंबाचा वकील कोण आहे, ही माहिती आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना देणं आवश्यक आहे. 

२. आर्थिक गुंतवणूक -चार्टर्ड अकाऊंटंट/ कर सल्लागार: 

  • तुमच्या आर्थिक गुंतवणुकीची पूर्ण माहिती असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कर सल्लागार कोण आहेत, हे तुमच्या निकटवर्तीय व्यक्तींना खास करून जोडीदाराला माहिती असलं पाहिजे.
  • तुमच्या पश्चात तुमचे थकबाकी असलेले कर्ज, कर ही माहिती अचानकपणे येऊन धडकण्यापेक्षा तुम्हीच देऊन ठेवली पाहिजे. 

३. आर्थिक नियोजन -आर्थिक सल्लागार: 

  • प्रत्येक कुटुंबाला एक आर्थिक सल्लागार असतो किंवा असायला पाहिजे. 
  • तुमच्या पहिल्या विमापासून म्युचल फंड, शेअर्स हे निर्णय, प्रक्रिया या लोकांना माहीत असते. तुमच्या माघारी तुमचे सर्व आर्थिक व्यवहार हे आर्थिक सल्लागार कमी वेळात करू शकतात. 
  • तुमच्या कुटुंबाला तुमच्या आर्थिक सल्लागाराची ओळख करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे.

४. विमा पॉलिसीज – विमा प्रतिनिधी: 

  • तुमच्या आरोग्य विमा, अपघात विमा, जीवन विमा या सर्वांच्या प्रतिनिधींचे फोन नंबर्स तुमच्या जोडीदाराच्या फोनमध्ये सुद्धा जतन करून ठेवले असावेत. 
  • तुम्ही ज्या  कंपनीचा आरोग्य विमा घेतला आहे त्याचा विमा क्रमांक,  त्या कंपनीच्या ग्राहकसेवा प्रतिनिधी क्रमांक हे तुमच्या पश्चात लगेच सापडतील ही सोय करून ठेवली पाहिजे.

५. म्युच्युअल फंड/ शेअर्स गुंतवणूक- स्टॉक ब्रोकर: 

  • तुमच्या आर्थिक सल्लागाराप्रमाणेच तुमच्या स्टॉक ब्रोकरची माहिती एखाद्या डायरीत लिहून ठेवणं आवश्यक आहे. 
  • हे तेच लोक असतात ज्यांच्यामुळे तुमच्या शेअर्सची माहिती, त्यांची विक्री करण्याची पद्धत ही तुमच्या जोडीदाराला कमी वेळात कळू शकते. 

महत्वाचा लेख: Nomination: नॉमिनेशन म्हणजे काय असतं रे भाऊ? 

६. कायदेशीर कागदपत्रे-वकील : 

  • तुमच्यावर एखादी न्यायालयीन कारवाई सुरू असेल तर ते सुद्धा तुम्ही मोकळेपणाने घरी सांगितलं पाहिजे. 
  • जमिनी सारखे काही प्रलंबित प्रकरणं ही तुमच्या पश्चात घरी एखाद्या कायदेशीर सुचनापत्राच्या स्वरूपात घरी येऊन धडकू शकतात. 
  • तेव्हाची परिस्थितीचा अंदाज घेऊन आजच अशा प्रकरणांची माहिती घरी सांगून ठेवा. 

७. पासपोर्ट, वाहन परवाना: 

  • तुमचा पासपोर्ट, वाहन परवाना हे तुम्ही घरात कुठे ठेवलं आहे?  हे घरातील कोणत्याही एका सांगून ठेवलं पाहिजे.

८. पॅन कार्ड, आधार कार्ड: 

  • तुमच्या जोडीदाराकडे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड देऊन ठेवणं हे तुमच्या पश्चात कोणताही व्यवहार करता यावा यासाठी आवश्यक आहे. 
  • तुमचा कोणता फोन नंबर या सर्व सेवांना जोडण्यात आला आहे हे सुद्धा तुमच्या घरी माहीत असलं पाहिजे.

९. क्रेडिट कार्ड , एटीएम कार्ड: 

  • तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्ड, एटीएम कार्डची एक यादी तयार करा. त्यांचे पिन नंबर्स हे तुमच्या जोडीदाराला अंतिम समयी तरी सांगून ठेवले पाहिजेत. 
  • क्रेडिट कार्ड बंद करणे, बँकेतील पैसे वापरता येणे यासाठी ही माहिती आजकाल प्रत्येक बँक विचारतच असते. 

विशेष लेख: आर्थिक नियोजनासाठी सल्लागाराची खरंच गरज असते का? 

एक काळ होता जेव्हा घरातील स्त्रीला सर्व आर्थिक व्यवहारंपासून दूर ठेवलं जायचं, ज्याचा त्रास तिला आजन्म व्हायचा. तंत्रज्ञानामुळे आज गोष्टी शिकवणं हे सोपं झालं आहे, गरज आहे ते मनावर घेऊन कृती करण्याची. आपण नसताना सुद्धा तिची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.