car loan
courtesy – forbes.com
Reading Time: 3 minutes

Car Loan : कार लोन  घेण्यापूर्वी  या 6 गोष्टींचा करा विचार 

तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करणे आता कार लोन घेऊन सहज शक्य आहे. नवी कोरी कार घ्यायची की सेकंड हॅन्ड किंवा मग बाजारात शेकडो कार मॉडेल्स असताना त्यातून योग्य कार निवडायची हे तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकते. पण कार लोन मिळणे सध्या सहज शक्य झाले आहे. कारण आजकाल सर्व आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका अतिशय सहजपणे आणि अतिशय स्पर्धात्मक व्याजदरात कार लोन देत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने, कार पुरवणाऱ्या बँका कर्जदाराला गोंधळात टाकू शकतात. अर्थात लोन घेण्याआधी पुढील काही गोष्टी विचारात घेतल्या तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.

  1. कार लोनचे (Car Loan) व्याजदर जाणून घ्या
  • सध्या बँकांमध्ये कार लोनच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात, अशावेळी तुमच्या पर्यायांची तुलना करण्यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. 
  • कर्जाचे व्याजदर हे कारचे मॉडेल, क्रेडिट स्कोअर, कर्जाचा कालावधी इत्यादी घटकांप्रमाणे बदलू शकतात. बँक देत असलेल्या ऑफर बद्दल जाणून घ्या. 
  • तुम्ही तुमच्या प्रोफाइलच्या आधारे आणि तुमच्या कर्जाच्या अर्जात काही बदल करून व्याजदराची वाटाघाटी करू शकता. उदाहरणार्थ, कर्ज घेताना तुमच्याबरोबर  सह-अर्जदार  (Co – applicant)  असेल तर तुमची एकूण क्रेडिट पात्रता विचारात घेतली जाऊन कमी व्याजदरासाठी तुम्हाला पात्र बनता येईल.

विशेष लेख – Dream Car: “ड्रीम कार” खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी उपयुक्त ठरेल ?…

  1. कर्जाच्या रकमेची गाडीच्या किमतीच्या तुलनेत टक्केवारी जाणून घ्या 
  • तुम्ही कार लोनसाठी त्याच्या ऑन-रोड किमतीच्या 100% पर्यंत पात्र असाल, तरीही तुमच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डाउन पेमेंट करण्याचा सल्ला दिला जातो. 
  • काही बँका नवीन कार साठी 100% लोन देतात तर सेकंड हॅन्ड कारसाठी कारच्या मूल्यांकनाच्या 80% पर्यंत कर्ज मिळू शकते म्हणून नेमकं किती लोन मिळणार आहे ते आधी जाणून घ्या.
  1. फी आणि इतर शुल्क 
  • बँका कर्जदारांकडून त्यांच्या कर्ज अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी एक one-time कार कर्ज प्रक्रिया शुल्क आकारतात. प्रक्रिया शुल्काची रक्कम टक्केवारी किंवा स्लॅबवर आधारित असू शकते. 
  • या व्यतिरिक्त, तुम्ही इतर सर्व शुल्क तपासले असल्याचे आणि ते कर्जाच्या एकूण खर्चात जोडले गेले असल्याचे सुनिश्चित करा. 
  • केवळ कर्जावरील व्याजदर पाहण्याऐवजी, तुम्हाला बँकेकडून योग्य ऑफर मिळाली आहे का याचे मूल्यांकन करण्यासाठी, व्याज आणि इतर शुल्कांसह कर्ज घेण्याच्या एकूण खर्चाची गणना करा. तसेच, कर्जाच्या कालावधीत तुम्हाला लागणारे पर्यायी शुल्क तपासा, यामध्ये उशीरा पेमेंट दंड, कार कर्जाच्या प्रीपेमेंटवर शुल्क किंवा स्वॅप शुल्क समाविष्ट असू शकतात. उदाहणार्थ, कमी शिल्लक उरलेली असताना त्यावर कमी व्याज आणि कमी शुल्क लागू होणे ही चांगली स्कीम असू शकते त्यामुळे व्याजदराच्या पलीकडे, विविध कर्जाचे शुल्क काय आहेत ते सुद्धा जाणून घ्या.

 

विशेष लेख – कार लोन रिपेमेंट केल्यावर या गोष्टी विसरू नका !…

  1. आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या 
  • तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करा. 
  • बँकेच्या वेबसाइटवर तुम्हाला कागदपत्रांची यादी सहज मिळू शकते. कर्ज अर्ज प्रक्रियेसाठी उत्पन्न, पत्ता, वय, नोकरी इत्यादी पुरावे आवश्यक आहेत. 
  • उदाहरणार्थ, पगारदार व्यक्तींसाठी, पगाराच्या स्लिप्स आणि नवीनतम आयकर रिटर्न स्टेटमेंट्स आवश्यक असतात. याबाबतीत तुम्ही संबंधित कर्ज अधिकाऱ्याची मदत घेऊ शकता. 
  • तुमची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यास, तुमचा कर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या कार खरेदी करण्याच्या स्वप्नावर पाणी फिरू शकते आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो.

 

  1. कार कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट रिपोर्ट मिळवा
  • कर्जावरील व्याजदर उत्पन्नाचा स्रोत, लिंग आणि क्रेडिट स्कोअर यानुसार ठरवले जातात.
  • तुमचे उत्पन्न जास्त असल्यास पण क्रेडिट स्कोअर खराब असल्यास, तुमचा कर्जाचा दर अजूनही उच्च असू शकतो. 750 आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्यांना कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते.
  • त्यामुळे, कार लोन मिळवण्याची योजना आखणाऱ्यांनी त्यांचे कार लोन अर्ज सबमिट करण्यापूर्वी क्रेडिट ब्युरोकडून त्यांचे किमान सहा महिन्यांपासूनचे क्रेडिट रिपोर्ट आणले पाहिजेत.

 

  1. तुमची ईएमआय रक्कम तुम्हाला परवडणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त ठेऊ नका
  • तुमचे महिन्याचे अत्यावश्यक खर्च, विमा प्रीमियम,महत्त्वपूर्ण आर्थिक उद्दिष्टांसाठी मासिक गुंतवणूक, सध्या चालू असलेले EMI हे सारे मासिक उत्पन्नातून वजा करून कार लोनची  EMI रक्कम तुम्ही ठरवा. EMI रक्कम तुम्हाला परवडणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त ठेऊ नका. 
  • र्दैवाने उत्पन्नातील काही व्यत्यय किंवा इतर आर्थिक गरजांमुळे पैशांची अडचण आली तर EMI डिफॉल्ट होण्याचा धोका वाढू शकतो. 
  • अशा परतफेडीच्या चुकांमुळे बँकांकडून मोठे शुल्क आणि दंड आकारले जातात आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर म्हणजे तुमचे भविष्यातील कर्ज आणि क्रेडिट कार्ड पात्रता यावर विपरित परिणाम होऊ शकतो.तुम्हाला उधारी आणि खिशाबाहेरील खर्च यांचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे जेणेकरुन तुमचा EMI भार जास्त नसेल. 

विशेष लेख – Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे…

लक्षात ठेवा !  तुमच्या कारची किंमत कालांतराने कमी कमी होत जाते आणि म्हणूनच तुम्ही यासाठी स्वतःचे किंवा कर्जाचे पैसे किती व कसे खर्च करता यावर कडक नियंत्रण ठेवा. तुमच्या कारमधून सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा !  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…