quit drinking and smoking
quit drinking and smoking
Reading Time: 2 minutes

Quit Smoking and Drinking

धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन ठरू शकते आरोग्याबरोबरच आर्थिक स्थितीसाठीसुद्धा हानिकारक ! 

धूम्रपान व मद्यपान हे आरोग्यास हानिकारक आहे हे सर्वच जाणून आहेत. परंतु धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन हे फक्त आरोग्यावरच परिणाम करत नाही. तर तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करते. असा निष्कर्ष काढला जातो की, तिशीतल्या व्यक्तीच्या धूम्रपान व मद्यपान या व्यसनावरील खर्च व यामुळे भविष्यात येणारा वैद्यकीय खर्च हा त्या व्यक्तीच्या रिटायरमेंट पर्यंत लाखो रुपयांर्यंत जाऊ शकतो. यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे ठरते.

धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन आर्थिक स्थितीवर कसे परिणाम करते?

  • धूम्रपान व मद्यपान यावर होणारा खर्च – समजा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला दिवसाला ५ सिगारेट लागत असतील. सिगारेटची किंमत साधारण १० ते १५ रुपये असते.म्हणजे १५ रुपयांच्या ५ सिगारेट साठी त्या व्यक्तीला दिवसाला ७५ रुपये खर्च येत असेल व महिन्याला  साधारण २,३२५ रुपये खर्च येत असेल. याचबरोबर मद्यपानासाठी महिन्याला आणखीन २,००० रुपये खर्च येत असेल असा आपण साधारण अंदाज जरी केला तरी  त्या व्यक्तीचा हा खर्च अंदाजे काही वर्षात लाखोंच्या घरात जातो. तसेच ही किंमत काही स्थिर नाही यामध्ये दरवर्षी वाढ होण्याची शक्यता असते. परंतु यासाठी लागणाऱ्या पैशांची जर बचत केली किंवा हे पैसे गुंतवणुकीसाठी वापरले  तर  या पेक्षा जास्त पैसे मिळवता येऊ शकतात.

हेही वाचा – Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र…

  • वैद्यकीय खर्च –  धूम्रपान तसेच मद्यपान  याच्या असणाऱ्या सवयीचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. श्वसनासंबंधित काही छोटे आजार जरी असेल तरी डॉक्टरांची फी, औषधांचा खर्च या सर्व गोष्टींसाठी अंदाजे महिन्याला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत खर्च होण्याची शक्यता असते. तसेच यामध्ये कॅन्सर व हृदयविकाराचा धोका देखील असतो. हे आजार तुमची आर्थिक पूंजी संपण्यास नक्कीच कारणीभूत ठरू शकतात. धूम्रपानामुळे फक्त तुमच्याच आरोग्यावर परिणाम होत नाही तर तुमच्या परिवारातील इतर सदस्यांना विशेषतः लहान मुलांना देखील त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चांचा तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो.

  • खर्चिक विमा –  धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना विमा प्रीमियम जास्त भरावा लागतो. कारण वीमा कंपनी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हाय रिस्क म्हणून बघते. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना विम्यासाठी इतरांच्या तुलनेत जास्त खर्च येतो. जर एखादी व्यक्ती जास्त धूम्रपान करत असेल तर वीमा कंपनी त्या व्यक्तीला आरोग्य विमा देण्यास परवानगी न देण्याची शक्यता देखील आहे.

हेही वाचा – Five Hour Rule: एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया!…

या सर्व गोष्टींचा विचार करता धूम्रपान व मद्यपानाचे असणारे व्यसन सोडून यासाठी लागणाऱ्या खर्चाची भविष्यासाठी बचत होऊ शकते. किंवा हेच पैसे चांगले व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून  आर्थिक उत्पन्न देखील वाढवता येऊ शकते.  भविष्यात कोणत्याही अनपेक्षित घटनेमध्ये लागणारी आर्थिक मदत किंवा रिटायरमेंट नंतर आर्थिक बचतीसाठी याचा उपयोग होऊ शकतो. कारण आत्ता जरी ही रक्कम थोडी-थोडकीच वाटत असली तरी धूम्रपान व मद्यपानाच्या व्यसनामुळे भविष्यात मात्र ही संख्या लाखों पर्यंत जाऊ शकते. यामुळेच धूम्रपान व  मद्यपानावरील खर्च थांबवून त्या पैशांची बचत केली व व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर पुढच्या काही वर्षातच तुमचे घर घेण्याचे किंवा गाडी घेण्याचे असे एखादे किंवा अनेक स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. शेवटी आरोग्य उत्तम असेल तरच जीवनातील सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो.म्हणूनच धूम्रपान व मद्यपान हे व्यसन सोडल्यामुळे आरोग्य तर सुरक्षित राहीलच त्याचबरोबर आर्थिक स्थिती देखील सुधारण्यास मदत होईल.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…