sukesh chandrashekar
sukesh chandrashekar
Reading Time: 3 minutes

Conman Sukesh Chandrashekhar

वेगवेगळी आमिषं दाखवून किंवा एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करणारे आणि आपलं काम साधून घेणारे संधीसाधू आपल्या समाजात काही कमी नाहीत. अगदी बेमालूमपणे लोकांना शेंडी लावत हे वर्षानुवर्षे समाजात वावरत असतात. पण म्हणतात ना की सत्य कधीतरी बाहेर येतंच. अशाच एका सुकेश चंद्रशेखर नामक फसवणूक सम्राटाची कुकर्म गाथा इथे मांडत आहे. 

जन्म, शिक्षण आणि विवाह 

  • सुकेशचा जन्म 1989 साली बेंगळुरू येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मित्रपरिवारांत तो बालाजी या नावाने परिचित आहे. त्याचं सुरुवातीचं शिक्षण बिशप कॉटन बॉयज़ स्कूल, बेंगळुरू येथे तर पुढचं शिक्षण मदुराई विद्यापीठात झालं. 
  • लहानपणापासूनच त्याला लक्झरी कार, स्पोर्ट्स कार यांच्याकडे ओढ होती. पझांगनाथम वस्तीतील एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या चंद्रशेखरने लहानपणापासूनच गरीबीतून बाहेर पडण्याचे स्वप्न पाहिले. त्याचे कुटुंब बेंगळुरूमध्ये एक छोटासा व्यवसाय चालवत होते. लहानपणी चंद्रशेखर जुन्या शाळकरी मित्रांचा हेवा करायचा. ज्यांच्याकडे स्वतःची बाईक होती. कारण त्याला त्याचे वडील जुन्या स्कूटरवरून शाळेत सोडायला जायचे. 
  • त्याने लीना मारिया पॉल या भारतीय अभिनेत्रीशी लग्न केले. जीने ‘मद्रास कॅफे’ सह अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे. पुढे पॉल हिलाही सुकेशची सहकारी म्हणून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये साथ दिल्याबद्दल अटक करण्यात आलेली आहे. 

हेही वाचा – Barshi Stock Market Scam : बार्शी स्टॉक मार्केट स्कॅममधून घ्या ‘हा’ धडा

सुकेशची ठगलाईफ

  • वयाच्या 17 व्या वर्षी, चंद्रशेखरला पहिल्यांदा अटक झाली. त्याने आधीच शाळा सोडली होती. बेंगळुरू विकास प्राधिकरणाकडून संपादित केलेली जमीन आणि बांधकामासाठी परदेशी गुंतवणूक सुरक्षित करण्याचे आश्वासन देऊन चंद्रशेखरने आपली 1.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे त्याच्या विरुद्धच्या फिर्यादीत एकाने म्हटले आहे.
  • 18 वर्षांची वयोमर्यादा पूर्ण होण्याआधीच ड्रायविंग लायसेन्स मिळवण्यासाठी तत्कालीन पोलीस कमिशनर यांची नकली सही घेऊन त्याने एक पत्र जाहीर केलं. ज्यात तो स्वतः कर्नाटकात कुठेही कार आणि बाईक चालवण्यास पात्र आहे असं नमूद केलं होतं. 
  • 2009 मध्ये, चंद्रशेखरने कर्नाटकचे तत्कालीन महसूल मंत्री करुणाकर रेड्डी यांचा मुलगा असल्याचे दाखवून तक्रारकर्त्याला 3,72,500 रुपयांचा गंडा घातला.
  • 2010 मध्ये, चंद्रशेखरने 3,50,000 रुपयांचा एक घोटाळा केला आणि दुसर्‍या प्रकरणात, त्याने एका सिनेमाच्या व्यवस्थापकाचा गळा दाबून खून केला. जेथे चंद्रशेखरला नवीन साउंड सिस्टम स्थापित करण्यासाठी नियुक्त केले होते. चंद्रशेखर आगाऊ रक्कम घेऊन फरार झाला. काही काळाने व्यवस्थापकाने त्याला पाहिलं. त्यांच्यात हाणामारी झाली, त्यात चंद्रशेखरने व्यवस्थापकावर हल्ला केला. त्याला पकडल्यावर पोलिसांनी 21 घड्याळे, दोन मोटारगाड्या, एक लॅपटॉप आणि मोठी रक्कम जप्त केली.
  • अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्याची पत्नी पॉल ही चंद्रशेखरला त्याच्या काही लक्ष्यांशी ओळख करून द्यायची.  चंद्रशेखरच्या महत्त्वाकांक्षा आणि त्याच्या गुन्हेगारी कारवायांची व्याप्ती या दोन्ही गोष्टी उत्तरोत्तर वाढत गेल्या. 2013 मध्ये, त्याने व्हेंडिंग मशीनसाठी सरकारकडून निविदा मिळवण्याच्या बहाण्याने कर्नाटक सरकारच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची तोतयागिरी करून कॅनरा बँकेची 19 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चंद्रशेखर आणि पॉल या दोघांवर आरोप ठेवण्यात आले. आणि त्यांना अटक करण्यात आली, परंतु त्यांना जामीन मिळाला आणि नंतर ते मुंबईला गेले.
  • 2017 मध्ये चंद्रशेखरला टीटीव्ही दिनकरन यांच्या सांगण्यावरून भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना लाच दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती.  दिनकरनना अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमचे दोन पत्त्यांचे निवडणूक चिन्ह दिनकरन यांच्या काकू आणि जयललिता यांच्या सहकारी व्ही के शशिकला यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी सुरक्षित करायचे होते.
  • डिसेंबर 2021 मध्ये ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, चंद्रशेखरने सर्वोच्च सरकारी अधिकारी असल्याचे दाखवून जून 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांच्याकडून 200 कोटींहून अधिक रक्कम उकळली होती.  विशेष म्हणजे हे सर्व काही चंद्रशेखर तिहार तुरुंगात कैदी म्हणून असताना करत होता. 
  • त्याचे तुरुंगातील जीवन, सूत्रांनी वर्णन केल्याप्रमाणे, ग्लॅमरस अँटी-हिरोच्या ट्रॉप्सशी नक्कीच जुळते. ईडीच्या आरोपपत्रानुसार, चंद्रशेखरचे तिहार जेलमधील राहणीमान हे युनिटेकचे प्रवर्तक संजय आणि अजय चंद्रा आणि शिवेंद्र सिंग यांसारख्या हाय-प्रोफाइल आरोपींप्रमाणे होते. 
  • कारागृहात असताना चंद्रशेखर तिथल्या जेलर किंवा अधिकार्‍यांना लाच देऊन त्याला हव्या असलेल्या सुखसोयींचा लाभ घेत होता.  चंद्रशेखरला त्याच्या सेलमध्ये अधूनमधून पाहुणे देखील भेटायला येत होते आणि जेव्हा तो नोव्हेंबर 2020 मध्ये पॅरोलवर त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी बाहेर आला. तेव्हा पॅरोल सहा महिन्यांसाठी “गूढ पद्धतीने” वाढवण्यात आला होता.
  • बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्याशी असलेल्या नातेसंबंधांबद्दल आणि त्याने तिला भेट दिलेल्या सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या पर्शिअन मांजरी, खाजगी चार्टर्ड फ्लाइट्समधून ट्रिप्स, 52 लाख किमतीचा घोडा, डायमंड ज्वेलरी आणि अन्य महागड्या वस्तूंबद्दल ईडीने जॅकलिनची चौकशी सुरु केली आहे. अशाच रीतीने त्याने दुसरी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे अभिनेत्रींची जवळीक साधून तो लोकांना दाखवू इच्छित होता की तो किती विश्वासू आहे जेणेकरून त्याने टार्गेट केलेल्या लोकांना तो आरामात फसवू शकेल. 
  • चंद्रशेखर या इतक्याच नाही तर अन्य कितीतरी केसेस मध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला आहे. आजमितीला त्याचे वय जरी 32 असले तरी सुमारे 32 क्रिमिनल केसेस त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. 
  • चंद्रशेखरला भेटणाऱ्या लोकांना त्याची बुद्धिमत्ता, महत्त्वाकांक्षा, त्याचे आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये अस्खलित बोलणे, ब्रँडेड वस्तू आणि दागिने यांसारख्या उच्चभ्रू समृद्धीच्या गोष्टींचा वापर करणे यांमुळे भुरळ पडते. त्यामुळे सामान्य लोक त्याच्या मी अमुक-तमुक अधिकारी आहे किंवा अमक्या राजकारण्याचा नातेवाईक आहे अशा भूलथापांना बळी पडतात आणि त्याच्या जाळ्यात अडकतात. ईडीच्या तपासादरम्यान, चंद्रशेखरचे चेन्नईतील घर म्हणजे समुद्रकिनारी एक भव्य बंगला होता आणि रॉल्स रॉयस घोस्ट, लॅम्बोर्गिनी उरूस आणि बेंटले बेंटायगा यासह 16 लक्झरी कार त्याच्या मालकीच्या होत्या.

हेही वाचा – Scam 1992- द हर्षद मेहता स्टोरी

सारांश 

काही माणसांना दैवं हुशारी, बुद्धिमत्ता, महत्वाकांक्षा अशा सूप्त गुणांची देणगी बहाल करतं पण सुकेश चंद्रशेखर सारखी माणसं ते गूण सुप्रसिद्ध नव्हे तर कुप्रसिद्ध होण्यासाठी आजमावतात. सुकेशकडे असलेल्या व्यक्तिमत्वाचा, हुशारीचा तो योग्य मार्गाने वापर करू शकला असता तर आज कदाचित चांगल्या प्रकारे नावारूपाला आला असता. सुकेशच्या उदाहरणावरून आपण इतकाच बोध घेऊ शकतो की सारासार विचार केल्याशिवाय कुठल्याच विधानाला, व्यक्तीच्या वागण्याला किंवा बोलण्याला बळी पडायचे नाही आणि सचोटीने आणि सत्य मार्गाने कमावलेलंच यश आणि पैसा कायम टिकतो. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…