LIC IPO
LIC IPO
Reading Time: 3 minutes

Warren Buffet and LIC IPO 

अगदी आत्ता, परवाच, गुंतवणूक गुरु श्री वॉरेन बफेट आणि त्यांचे सहकारी श्री चार्ली मुनगर यांनी त्यांच्या ‘बर्कशायर हॅथवे’ या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेंत आपल्या कंपनीच्या भागधारकांशी संवाद साधला. केवळ सभा नव्हे तर एक ज्ञानस्त्रोत, म्हणुन पूर्वापार प्रसिद्ध असलेल्या ह्या प्रतिवार्षिक सभेला हल्ली समाज माध्यमांकडुन अगदी ऑस्कर सोहळ्यासारखी प्रसिद्धी मिळते, आणि वॉरेन चार्ली जोडगोळीचे वाक्य-न-वाक्य गुंतवणूक जगतांत चघळले जाते.

या दोघाही महानुभावांची वये नव्वदीपार आहेत आणि याही वयांत ते ‘दीर्घकालीन गुंतवणुकीचा’ (Long Term Investing) पुरस्कार करतात, ही महत्वाची गोष्ट एव्हाना प्रसिद्धी माध्यमांनी भरपुर वेळा सांगितली आहेच. पण या महान गुंतवणुकसम्राटाच्या यशाचे विश्लेषण करताना श्री बसंत माहेश्वरी यांनी मांडलेला एक मुद्दा मला आवडला होता.

हेही वाचा – John Graham investing in India : ग्रॅहमसाहेबांना दिसल्या भारतात गुंतवणुकीच्या संधी

साठीनंतर वाढला यशाचा आलेख 

वॉरेन यशस्वी झाले, कारण त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची फळे चाखण्याइतपत प्रदीर्घ दीर्घायुष्य त्यांना लाभले. त्यांच्या संपत्तीच्या वाढीचा आलेख वेगाने वाढला, तो वयाच्या साठीनंतरच..त्यामुळे या गुरुने ‘गुंतवणूक कशी केली??’ या प्रश्नाएवढाच ‘त्यांची जीवनशैली कशी होती??’ याचा अभ्यासही केला पाहिजे, हाच तो थोडा दुर्लक्षित मुद्दा.

बफेट यांची ‘सुवचने’ हा ही तमाम गुंतवणुक जगतात सदैव चर्चिला जाणारा विषय आहे, पण या बाबतही ‘वॉरेन काय बोलतात ?? यापेक्षा ते काय करतात??.. याकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे, असे ही त्यांचे टीकाकार म्हणत असतात. वॉरेन बफेट यांनी गुंतवणुक विश्वांत लोकप्रिय केलेली काही गुंतवणुक तत्वे ते स्वत्तः मात्र प्रसंगोत्पात खुंटीला टांगतात, याचे अनेक नमुने सांगता येतील..

वाचा GEICO ची कहाणी

असेच त्यांच्या स्वतःच्याच तत्वांनाच मुरड घालत त्यांनी एका कंपनीबाबत कसे निर्णय घेतले आणि शेवटी त्या चुका सुधारुन पुढे त्याच कंपनींत केलेली गुंतवणुकच त्यांचा सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुक निर्णयांपैकी कशी ठरली?? याचा एक किस्सा त्यांनीच सांगितला आहे. बफेट विद्यार्थीदशेत असताना एका छोट्या आकाराच्या विमा कंपनीत, ‘GEICO’ तीचे नाव, बफेट यांनी स्वतःजवळील जवळपास अर्धी रक्कम गुंतविली.

एखाद्या तुलनेने अपरिचित एकाच कंपनीत अशी मोठी गुंतवणूक करणे, हे बफेट यांच्या तत्वाविरोधात होते, कदाचित याच मुळे की काय, या गुंतवणुकीवर वर्षभरातच 50% फायदा झालाय हे पाहून त्यांनी हे शेअर्स विकले ही. मात्र, नंतर घाईघाईने घेतलेल्या या विक्रीच्या निर्णयाचा वॉरेन बफेट यांना चांगलाच पश्चात्ताप झाला, कारण ह्या कंपनीचा भाव पुढे 20 वर्षांत 100 पट झाला,

“It taught me a lesson about the inadvisability of selling a stake in an identifiably wonderful company..” ह्या प्रसंगाने मला एक धडा शिकवला.. अशी कबुलीही त्यांनी नंतर एकदा दिली. पुढे दुर्दैवाने ही कंपनीच अडचणींत येऊन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. तेंव्हा, 1976 साली मात्र बफेट यांच्यातील ‘Value Investor’ जागा झाला. ‘GEICO’ उर्फ ‘Government Employees Insurance Company’ ही कंपनी सरकारी खात्यांतील बडे अधिकारी व कर्मचारीवर्गाला विमा थेट स्वरुपात एजंट्स शिवाय विकत असे. त्यामुळे कंपनीकडे नियमितपणे विम्याच्या हप्ता स्वरुपांत रक्कम जमा होत होती, याशिवाय कंपनीचे कमिशन . खर्च ही कमी होते. कंपनीची ही बलस्थाने ओळखून बफेट यांनी ही पुर्ण कंपनीच आपल्या बर्कशायर कंपनीच्या खात्यांत विकत घेतली व व्यवस्थापन हातात घेवुन काही बदलांनंतर कंपनीला गतवैभव प्राप्त करुन दिले.

हेही वाचा – Term Insurance Rejection : ‘ही’ आहेत टर्म इन्शुरन्स क्लेम नाकारला जाण्याची कारणे

GEICO कंपनी 

आजमितीस बफेट यांच्या सर्वाधिक फायदेशीर गुंतवणुकींच्या यादीत ‘कोकाकोला, वेल्स फर्गो वा ॲपल’ यांच्यापेक्षाही काकणभर सरस अशी ही ‘GEICO’ ही कंपनी मानली जाते. इतकी, की स्वतः बफेट यांच्याच शब्दांत सांगायचे तर “When I count my blessings, I count GEICO twice.” ‘GEICO’ विमा कंपनीची ही कथा सांगण्याचा द्राविडी प्राणायाम करायचा उद्देश हा, की ‘विमा कंपनी’ ही प्रत्येकाच्या फोलियोंत हवीच असे व्यक्तिशः मलाही वाटते. पण कोणती?? ते ठरविणे ही तितकेच महत्वाचे. आता ताकाला जाऊन भांडे न लपविता ‘LIC’ चा ‘IPO’ मी काय करेन??’ या माझ्या मुळ लेखाला एक शेवटचे ठिगळ जोडतो.

‘LIC’च्या उद्या सुरु होत असलेल्या ‘IPO’ ची किंमत ही मूळ लेख लिहिला तेंव्हा अपेक्षित होती, त्यापेक्षा बरीच कमी आकारण्यात आली आहे.
याशिवाय ईश्शुचा आकारही कमी केला आहे. दुसरीकडे पॉलिसी घारक व किरकोळ गुंतवणुकदार यांना दिलेली सवलत अधिक आकर्षक करण्यात आली आहे.या तिहेरी सकारात्मक प्रयत्नांचे फलित म्हणुन हा ईश्शु पूर्वीच्या तुलनेने आता निदान बाजारातील नोंदणीच्या दिवशी गुंतवणुकदारांची निराशा करणार नाही, असे वाटते.

एलआयसी आयपीओ

ह्या ईश्शुला सरकारी गोटांतूनच वरदहस्त असल्याने सरकारी बॅंका वा युनिट ट्रस्ट सारख्या वित्तीय संस्था हा ईश्शु मार्गी लावतीलच.सध्या ‘डब्बा’ (अनधिकृत) मार्केटमध्ये या ‘LIC’च्या शेअरचा भाव 1050 च्या आसपास घोटाळतो आहे, मात्र हा भावच कायम राहील (वा वाढेल) असे समजणे, म्हणजे मतमोजणीच्या 40 फेऱ्या असणाऱ्या निवडणुकीतील पहिल्या फेरीअखेर आघाडीवर असलेला उमेदवारच विजयी होईल..असे मानण्यासारखे आहे. सबब या भावावर विसंबून रहाण्यांत अर्थ नाही.

थोडक्यांत, आपणा किरकोळ गुंतवणुकदारांना (1) पॉलिसीधारक व (2) किरकोळ गुंतवणुकदार अशा दोन प्र्वर्गांतुन अर्ज करण्याची संधी आहे. मी दोन्ही प्रवर्गांतुन प्रत्येकी एका लॉट करिता अर्ज करेन आणि नोंदणीच्या दिवशी निदान माझी या ईश्शुतील भांडवली गुंतवणुक मोकळी करेन.
ज्या प्रमाणे ‘LIC’ नेहमी ‘..जीवन के बाद भी’ आम्ही असु, अशी खात्री देते, मीही खात्री देतो की ‘LIC’ चे शेअर्स घ्यायचेच असतील तर ते ही ‘लिस्टींग के बाद भी’ असतीलच..

हेही वाचा – Need of Insurance Agent : तुम्हाला आरोग्य विमा सल्लागाराची गरज का असते? 

असे मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते..
आजही माझ्या भुमिकेंत बदल झालेला नाही. – प्रसाद भागवत

महत्वाची अस्वीकृति (Disclaimer) – सदर पोस्ट्मधील मते ही माझी वैयक्तिक मते असुन केवळ सामान्य माहिती म्हणून जाहीर केली आहेत.
हे लिखाण म्हणजे कोणातेही शेअर्स घेणे, न घेणे, वा विकणे, याकरिताची शिफारस वा व्यावसायिक सल्ला नाही.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…