व्यायाम आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutes

व्यायाम – आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग

व्यायाम आणि आर्थिक नियोजन? शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना?  पण पूर्ण लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की व्यायाम केवळ तुमचे शारीरिक आरोग्यच नाही तर आर्थिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही मदत करतो.

तुम्ही झटपट ‘स्लिम ट्रिम’  किंवा ‘फिट’ दिसण्यासाठी अथवा होण्यासाठी वेगवेगळी ऑरगॅनिक उत्पादने वापरली असतील. किंवा सुडौलतेच्या आकर्षणापाई जिमची मेम्बरशीप घेऊन अनेक छुपे खर्चही सहन करत असाल किंवा यांसारखे इतरही अनेक शॉर्टकट्स तुम्ही पूर्वी आजमावले असतील. 

शारीरिक आरोग्यासाठी घरातल्या घरात तुम्ही योगासने, सहज शक्य असलेले इतर व्यायाम प्रकार, प्राणायम करू शकता. शारीरिक हालचाली करू शकता. त्यासाठी असे महागडे मार्ग अवलंबण्याची गरज नाही. पण तुम्हाला कल्पना आहे का, नियमित व्यायाम केल्याने तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तचं नव्हे तर आर्थिक स्थितीनेही श्रीमंत ही होऊ शकता.

हे विधान अविश्वसनीय वाटले ना? पण होय, व्यायाम तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकतो. ते कसे, याच्या ८ क्लृप्त्या पाहुया. 

व्यायाम आणि आर्थिक नियोजन परस्परपूरक: 

१. मानसिक आरोग्य:-

 • एका संशोधनानुसार, व्यायाम केवळ शरीरासाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम असतो. जे लोक आठवड्यातून किमान तीन वेळा व्यायाम करतात, ते तंदुरुस्त व अधिक कार्यक्षम तसेच सक्रियही असतात. याचाच सकारात्मक परिणाम दैनंदिन जीवनावर होतो. म्हणजे जर तुम्ही कार्यक्षम किंवा सक्रिय असाल, तर तुम्ही तुमच्या करियरमध्ये, कार्यक्षेत्रात ही यशस्वी असणार. 
 • तसेच, संशोधन असे सांगते की, बैठ्या कर्मचाऱ्यांपेक्षा, नियमित व्यायाम करणारे कर्मचारी अधिक अर्थार्जन करतात. 
 • बऱ्याचदा लोकांना वाटते की अधिक अर्थार्जन होण्यासाठी, जास्त पैसे कमावता यावेत यासाठी  ओव्हरटाईम किंवा आणखी एखादा जॉब करावा लागतो. अशावेळी असे थकवणारे कठीण व्यायाम करण्यापेक्षा सहज शक्य असणारा आणि एक्टिव्ह बनवणारा व्यायाम करावा. 
 • व्यायाम करण्याने व्यावसायिक, कर्मचारी, विद्यार्थी अश्या अनेक वर्गांना फायदाच होतो. अधिक कार्यक्षम झाल्याने करियर, अभ्यासावर सकारात्मक परिणाम होतो. उत्तम व्यावसायिक यश मिळते. व शारीरिक तंदुरुस्त आरोग्यामुळे आजारपणांचा सामना करावा लागत नाही, त्यामुळे कामावरती लक्ष केंद्रित करता येते. म्हणजेच नियमित व्यायाम करा व अधिक धनसंपन्न व्हा. 

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

२. कार्यक्षमता:- 

 • कार्यक्षम असणारी व्यक्ती उत्साही व एनर्जेटिक असते. त्यामुळे तुम्ही कार्यक्षम असल्यावर घरातील साफसफाई, घरकाम, बागकाम यांसारखी अनेक घरगुती कामे तुम्ही स्वतः कराल. त्यासाठी वेगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याची किंवा कामांसाठी वेगळे नोकर ठेवण्याची गरज भासणार नाही. 
 • अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे बरीचशी आर्थिक बचत सुद्धा  होईल. तसेच सततच्या शारीरिक हालचालींची सवय होऊन व्यायाम हा दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग ठरेल. 

३. दिनचर्या:- 

 • व्यायाम, किंवा सहज शक्य असलेल्या शारीरिक हालचाली उदा. चालणे, सायकलिंग जमेल तेव्हा सतत कराव्यात. म्हणजे भाजी आणणे, मुलांना शाळेत सोडणे, मार्केटमध्ये चालत जाणे, जवळच्या अंतरावर जाण्यासाठी वाहनाऐवजी सायकल वापरणे किंवा पायी चालत जाणे अश्या अनेक कृतींमधून व्यायाम तर होतोच पण वाहतूक खर्च, पार्किंग फी यांचा वाढीव खर्च वाचतो व बचत होते. 
 • या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींतुनच तुम्ही उत्तम आरोग्य संपादन करू शकता. लक्षात घ्या, बैठ्या अवस्थेत सतत राहण्यापेक्षा सहज शक्य असलेल्या शारीरिक हालचाली करणं आरोग्यासाठी केव्हाही उत्तमच!!

४.आजार आणि व्यायाम:- 

 • बऱ्याचशा शारीरिक हालचालींमुळे मधुमेह, उच्च ताण(हायपरटेन्शन)  हृदयविकार, नैराश्य, भावनिक ताणतणाव यांसारखे अनेक विकार कमी करता येतात किंवा रोखता येतात. 
 • हे विकार रोखले गेल्यामुळे त्यांच्यावर होणारे महागडे औषधोपचार, वैद्यकीय चाचण्या, संबंधित वैद्यकीय उपकरणे यांवर होणारा अतिरेकी खर्च वाचतो. 
 • आजारपणात होणाऱ्या मनस्तापापासून सुटका होते व  वेळ ही वाचतो. तसेच मेडिकल इन्शुरन्स कव्हरेजमध्ये वाढ होते. लक्षात घ्या, बचत करणे म्हणजे एकप्रकारे अर्थार्जन करणेच होय!

५. दीर्घायु प्राप्ती:-

 • व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, व तंदुरुस्त शरीर अर्थार्जन करून धन संपन्न होते. हे तर माहीतच आहे; पण या शिवाय आणखी,
 • व्यायाम आजारांना दूर तर ठेवतोच, पण दीर्घायु ही बहाल करतो.म्हणजे आर्थिक स्थिती ही उत्तम, आणि याचा आनंद घ्यायला, उपभोग घ्यायला जास्तीचे आयुष्य म्हणजे बोनस. हे फक्त नियमित व्यायामामुळे शक्य आहे. 

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

६.व्यक्तिमत्त्व विकास:-

 • ‘जिम’मधल्या उपकरणांमधून तुम्हाला तात्पुरती सुडौलता मिळू शकेल. पेन किलर तात्पुरता आराम देऊ शकते, समूळ मात करू शकत नाही. 
 • जेव्हा तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही सुडौल, फिट आणि तरुण दिसायला लागत व तुमचे व्यक्तिमत्त्व सुद्धा आकर्षक बनते. 
 • या गोष्टींचा कामावर परिणाम होतो. तुमचा आत्मविश्वास वाढीला लागतो. तुमच्या देहबोलीतुन झळकणारा आत्मविश्वास व्यावसायिक, आर्थिक पातळींवर यश मिळवून देतो. 

७. उत्तम झोप – सुखी आयुष्य:-

 • एका रिसर्चनुसार, झोप उत्तम व शांत मिळाल्याने मनुष्याची कार्यक्षमता वाढते. 
 • नियमित व्यायामामुळे मनस्थिती चांगली राहते. मनावरचा ताण कमी होतो. मूड आनंदी  राहतो. त्यामुळे झोप उत्तम मिळते. 
 • शांत व पूर्ण झोप मिळाल्याने थकवा दूर होऊन शरीर ताजेतवाने होते. ऊर्जा, मूड दिवसभर टिकून राहतो. याचा वैयक्तिक कामांमध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायाला फायदा होतो. 
 • नियमित व्यायाम, योग्य व पोषक आहार इतकेच पथ्य पाळल्याने मिळणारे परिणाम अफलातून आहेत. 

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

८.  सर्जन कल्पकता:-

 • लक्षात घ्या, व्यायाम करताना, मेंदू ही श्रीमंत व समृद्ध होत जातो. व्यायामामुळे मन सर्जन व अधिक कल्पक होत जाते. 
 • तुमची समस्या सोडवण्याची क्षमता वाढीला लागते. आकलन क्षमता वाढीला लागते. अशा मानसिक स्थितीमुळे तुम्ही स्मार्ट, तरतरीत बनता.

केवळ नियमित व्यायाम करण्याने, तुम्ही असंख्य मार्गाने समृद्ध होऊ शकता. मग आता वाट कसली पाहताय? जिमची मेंबरशिप घेण्यापेक्षा बाजारातून एक “योगामॅट” खरेदी करा. आणि एक पाऊल उचला निरोगी आयुष्यासाठी. 

तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.