Ways to save tax
Reading Time: 2 minutes

भारतात आयकर वेळेवर भरण्यापेक्षा तो वाचवता कसा येईल (Ways To Save Taxes), यावर नेहमीच चर्चा सुरू असते. कर चुकवण्यासाठी काही सेलिब्रिटी लोक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतात. राजकारणी लोक आपली मालमत्ता आपल्या नावावर न करता आपल्या नातेवाईकांच्या नावावर करत असतात. व्यवसायिक लोक आपल्या उत्पन्नाचे सर्व तपशील आयकर विभागाला देत नाहीत, अशा सर्व बातम्या आपल्या कानावर नेहमीच पडत असतात. चाकरमाने, मध्यमवर्गीय लोक हे सरकारच्या नियमात बसून आयकर भरण्यापासून कशी सूट मिळवू शकतात, याबद्दल उपलब्ध असलेले ८ मार्ग आम्ही या लेखात आपल्या समोर मांडत आहोत: 

Save taxes legally: कर वाचविण्याचे ८ सोपे आणि कायदेशीर मार्ग

१. सेक्शन ८० सी: 

‘इन्कम टॅक्स ऍक्ट ऑफ इंडिया’च्या अंतर्गत येणाऱ्या ‘सेक्शन ८० सी’चा लाभ घेऊन आपण खालील सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपर्यंतचा आयकर वाचवू शकतो: 

– एम्प्लॉयी प्रॉव्हिडेंट फंड (ईपीएफ)

– पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीएफ)

– इक्विटी लिंन्क्ड सेविंग स्कीम (ईएलएसएस)

– सुकन्या समृद्धी योजना

– टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉजीट 

– नॅशनल सेविंग सर्टिफिकेट 

– सिनियर सिटीझन सेविंग स्कीम

आपल्या आर्थिक सल्लागाराची माहिती घेऊन आपण या योजनांची माहिती घेऊन आपल्याला लागू पडणाऱ्या योजनेत गुंतवणूक करू शकतात. 

२. धर्मादाय देणगी: 

भारत सरकार हे नेहमीच गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचं लोकांना आवाहन करत असते. ‘पीएम रिलीफ फंड’, ‘स्वच्छ भारत कोष’, ‘क्लिन गंगा फंड’ आणि ‘नॅशनल फंड फॉर कंट्रोल ऑफ ड्रग अब्यूज’ या सरकारी समितींना देणगी दिल्यावर आपल्याला त्या देणगीवर ‘सेक्शन ८० जी’च्या अंतर्गत १००% कर सुटका मिळू शकते. 

३. गृहकर्ज: 

गृहकर्जावरील मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज हे नेहमीच आपल्याला कर भरण्यापासून २ लाख रुपये इतकी सूट मिळू शकते. ‘सेक्शन ८० सी’च्या अंतर्गत आपल्याला करामध्ये सूट मिळू शकते. ही सूट आपल्याला गृहकर्ज आणि त्यावरील व्याजाच्या रकमेवर सुद्धा मिळत असते. तुमच्या गृहकर्जाच्या रकमेनुसार आयकर मधील ही सूट वाढू शकते. 

४. शिक्षण घेण्यासाठी घेतलेलं कर्ज : 

शिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या कर्जावर १००% कर सूट देण्याची व्यवस्था ही भारत सरकारने करून ठेवली आहे. शिक्षणावरील कर्जाची रक्कम कितीपर्यंत असावी, याची कोणतीही मर्यादा सरकारने निर्धारित केली नाहीये. 

५. स्वरक्षणासाठी केलेला खर्च: 

आपल्या स्वतःच्या, मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चावर भारत सरकारने कर सूट दिली आहे. त्याव्यतिरिक्त, स्वतःसाठी, कुटुंबातील व्यक्तींसाठी केलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या खर्चातून सुद्धा आपण कर वाचवत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणी, उपचारावर केलेल्या खर्चाचा तपशील देऊन सुद्धा आपण करातून सूट मिळवू शकतो. 

हे नक्की वाचा: आर्थिक समृद्धीचे २०२२ च्या शुभारंभाचे २२ संकल्प ! 

६. लॉंग टर्म कॅपिटल गेन्स : 

आपण कित्येक वर्षांपासून बाळगत असलेल्या एखादी मालमत्ता जर आपण विकली आणि त्यातून आलेली रकमेची गुंतवणूक जर आपण एखादी वस्तू घेण्यात केली तर आपल्याला ‘कॅपिटल गेन टॅक्स’ मधून सूट मिळू शकते. तुमची मालमत्ता ही कमीतकमी ३ वर्ष जुनी असली पाहिजे. तुम्ही १ वर्षांपेक्षा अधिक काळ बाळगलेल्या शेअर्स, म्युचल फंडची जरी आपण विक्री केली तरीही आपण ‘कॅपिटल गेन्स टॅक्स’ मधून सूट मिळवू शकतो. 

७. पगाराची रचना तपासणे : 

नोकरीसाठी केलेले कित्येक खर्च हे करपात्र असतात. आपल्या कंपनीला विनंती करून आपण आपला प्रवास खर्च, घरभाडं, गणवेश, टेलिफोन सारखे खर्च आपण पगारात दाखवून करातून काही प्रमाणात सूट मिळवू शकतो. 

विशेष लेख: आयकर वाचविण्यासाठी ‘गिफ्ट डीड’ हा चांगला पर्याय आहे का? 

८. सुट्टीची सहल : 

जर तुमची कंपनी तुम्हाला सुट्टीमध्ये सहलीवर जाण्यासाठी एक ठराविक रक्कम देत असेल तर त्याचा  विनियोग त्याच कामासाठी करून आपण टॅक्स वाचवू शकतो. दर दोन वर्षातून एकदा आपण असा ‘सहल खर्च’ दाखवू शकतो. हा खर्च दाखवतांना एक अट असते की, तुमची सहल ही भारतातच असावी आणि तुम्ही केलेला प्रवास हा विमानातील ‘इकॉनॉमी क्लास’ मधून केलेला असावा. 

“कर वाचवणे म्हणजेच आपली कमाई वाढवणे” हे मान्य करून आपण वरील उपयांचा वापर आपण चालू आणि येत्या आर्थिक वर्षात नक्कीच केला पाहिजे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

मार्चएंड पूर्वी आयकरासंबंधित करायच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesअर्जुन: कृष्णा, हा आर्थिक वर्ष २०१७-१८ चा शेवटचा महिना चालू आहे. सगळीकडे…