क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड 
https://bit.ly/3lYtrlq
Reading Time: 2 minutes

क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड 

क्रेडिट कार्ड कर्ज लवकरात लवकर फेडून त्यामधून सुटका करून घेणे आवश्यक आहे. कारण या कर्जासाठी वारेमाप रक्कम आपण व्याजाच्या रूपाने भरत असतो. पैसे नाही म्हणून क्रेडिट कार्ड कर्ज काढलं, पैसे असते तर कर्ज घेतलंच नसतं, असा विचार करणे म्हणजे आपणच आपलं नुकसान  करून घेण्यासारखं  आहे.  तुमच्या हातात असे अनेक मार्ग आहेत, जे तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर

क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्याचे ७ मार्ग 

१. पर्यायी उत्पन्न : 

  • प्रत्येकामध्ये काहीतरी कलागुण असतातच. क्रेडिट कार्डवरील रक्कम भरण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगातील कलागुणांचा वापर करू शकता. 
  • तुमच्या अंगातील कलागुण जसे की एखादे वाद्य वाजवायला शिकवणे, वेबसाईट बनवून देणे, स्नॅक्सच्या ऑर्डर्स घेणे, कार्ड्स वगैरे तयार करून देणे, चित्र काढून देणे इत्यादींचा वापर करून तुम्ही सुट्टीच्या वेळी या माध्यमांमधून पैसे मिळवू शकता. ज्यामुळे तुमचे कर्ज कमी होण्यास फायदा होईल.

२. तुमच्या बँक खात्यातून पैसे आपोआप वळते करून घेण्याची सुविधा: 

  • नेहमी लक्षात ठेवून पैसे देणे कठीण जात असेल, तर बँकेला सूचना द्यावी की दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या खात्यामधून कर्ज फेडीसाठी घेण्यात यावी. 
  • यामुळे तुमचा हे लक्षात ठेवण्याचा त्रास वाचेल आणि शिवाय तुमच्या डोक्यावरचे हे कर्जाचे ओझेही लवकरात लवकर संपेल. 

३. वैयक्तिक कर्ज: 

  • तुलनात्मकदृष्ट्या वैयक्तिक कर्जाला क्रेडिट कार्डपेक्षा कमी व्याजदर असतो. 
  • त्यामुळे लवकरात लवकर पैसे देण्यासाठी वैयक्तिक कर्ज उपलब्ध होत असल्यास तिथून रक्कम भरून कार्डवर भरावी व त्या कर्जातून मुक्त व्हावे.

महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

४. क्रेडिट कार्ड्सच्या संख्येवर मर्यादा आणा: 

  • तुमच्याकडे जितकी जास्त क्रेडिट कार्ड्स असतील तितक्याच सहजतेने तुम्ही एक-एक करत या क्रेडिट कार्ड्सच्या जाळ्यामध्ये अडकत जाता. 
  • हे टाळण्यासाठी, ठराविक वेळी कोणती क्रेडिट कार्ड्स वापरायची हे ठरवावे. जी कार्ड्स ‘वापरायची नाही’ असे ठरवले असेल ती सोबत बाळगणेही टाळावे. 
  • यामुळे आपोआपच क्रेडिट कार्ड्सच्या अकारण वापरावर मर्यादा येतील आणि क्रेडिट कार्ड्स वरील पैसे फेडत रहायची वेळच येणार नाही.

५. अनावश्यक वस्तू विकणे: 

  • आपल्याकडे अशा अनेक वस्तू असतात ज्यांचा वापर आपण क्वचितच करत असतो. त्या वस्तू आपल्याकडे नसतील तरी आपल्याला फार काही फरक पडणार असतो. 
  • अशा वस्तू ठेवून अडगळीमधील काही जागा मोकळी केली, तर तुम्हाला त्यातून येणाऱ्या पैशांनी तुमच्या कर्जाचा भार हलका करता येईल. 
  • यासाठी तुम्ही तुमच्या आसपास जर कोणी असे रिसेल करून देणारे असतील तर त्यांच्याशी बोलू शकता किंवा आजकाल अशा वस्तू विकणाऱ्या अनेक ऑनलाईन वेबसाईट्सदेखील आहेत. 

६. ‘जास्तीचे’ खर्च कमी करणे: 

  • आपल्या सुटीच्या दिवसांमध्ये आपण अशा अनेक गोष्टी करत असतो. ज्यामुळे आपल्या खर्चामध्ये अकारण वाढ होत असते. 
  • हे खर्च म्हणजे सिनेमाला जाणे, बाहेर जेवायला जाणे, पिकनिकला जाणे वगैरे. त्यामुळे सर्व क्रेडिट कार्ड्सवरील थकबाकीची  पूर्ण परतफेड होईपर्यंत तरी असे अनावश्यक खर्च टाळावेत अथवा कमी करावेत. 
  • सर्व पैशांची परतफेड झाल्यावरही खर्च करताना अत्यावश्यक असेल आणि लवकरात लवकर वापरलेले पैसे परत भरता येणे शक्य असेल तरच क्रेडिट कार्डचा वापर करावा.

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्डवरील व्याज कसे कॅल्क्युलेट करायचे? 

७. इतर गुंतवणुकी रद्द करणे: 

  • अनेकदा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वापरलेल्या पैशांवर जितके व्याज द्यावे लागणार असते त्याच्या निम्मेच व्याज तुम्हाला तुम्ही कुठेतरी गुंतवलेल्या पैशांवर मिळत असेल, तर ती गुंतवणूक रद्द करणे आणि त्या पैशांनी क्रेडिट कार्डचे पेमेंट करणे जास्त महत्वाचे आणि फायदेशीर ठरू शकते. 
  • या कारणासाठी तुम्ही केलेली एखादी एफ डी मोडण्याबद्दल विचार करू शकता किंवा शक्य असल्यास एखादे रिकरींगचे खाते बंद करण्याबद्दल किंवा त्यातून काही रक्कम काढता येत असेल, तर त्याचा विचार करू शकता.

अशा सर्व पर्यायांचा वापर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरील कर्ज फेडण्यासाठी वापरू शकता आणि शक्य तितक्या लवकर यामधून मुक्त होऊ शकता. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून नक्कीच वाचेल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.