Reading Time: 3 minutes
नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.
वैयक्तिक आर्थिक बजेट:
- आपल्या नेट वर्थचे गणित मांडा. नेट वर्थ म्हणजे आपली स्वमालकीची खरी संपत्ती वजा आपली खरी कर्जे व देणी.
- नेट वर्थ हे आपल्या आर्थिक आरोग्याचे मोजमाप आहे कारण हे मूलत: आपण आपली सर्व देणी फेडण्यासाठी आपल्या सर्व मालमत्तांची विक्री बाजारभावानुसार केली तर शिल्लक काय असेल? हे दर्शवते.
- आपला प्रत्येक वित्तीय निर्णय (Financial decision) हा आपले नेट वर्थ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून घ्यायला हवा म्हणजे एकतर संपत्ती (Assets) वाढवणे वा देणी (Liabilities) कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
- वित्तीय व्यवस्थापनाचा पहिला टप्पा म्हणजे मासिक बजेट ठरविणे. महिन्याचं बजेट ठरवून घ्या. अनावश्यक खरेदी टाळा. एक रुपया वाचविणे म्हणजे १० रुपये कमावण्यासारखं आहे.
- आपल्या व जोडीदाराच्या मासिक उत्पन्नानुसार आपले आर्थिक बजेट तयार करा.
- यासाठी जमा- खर्चाची रोजनिशी (डायरी) बनवा व त्यामध्ये रोजचा जमा खर्च लिहीण्याची शिस्त स्वतःला व आपल्या कुटुंबियांनाही लावा.
- आपल्या खर्चाचं ऑडिट करून जास्त खर्च कुठे होतोय ते तपासा.
- आर्थिक कॅलेंडर तयार करा. व त्यामध्ये गुंतवणूक, कर्जाची परतफेड इत्यादींसारखे मुद्दयांचा आराखडा तयार करा.
- मासिक जमा खर्चानुसार योग्य फॉरमॅटमध्ये मासिक बजेट तयार करा. त्यासाठी आर्थिक विषयांवरील विविध वेबसाईट्स, ब्लॉग्ज यांचा आधार घ्या
- आपलं उत्पन्न (Income), मालमत्ता (Assets) आणि खर्च (Expenses), कर्ज या साऱ्याचा हिशोब करून आपण आर्थिकदृष्ट्या किती व कुठल्या वेगाने प्रगती करत आहोत हे तपासून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा.
- तुमच्या ह्यूमन रिसोर्स (Human Resource) डिपार्टमेन्टकडून तुमच्या नोकरीमध्ये असणारे सर्व बेनिफिट्स जाणून घ्या. खरेदी आणि खर्चाबाबतचे आर्थिक नियोजन:
- नाही’ म्हणायची सवय स्वतःला लावून घ्या. अनेकदा नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींच्या दबावामुळे मनात नसताना उगाचच जास्त खर्च करावा लागतो. तुमचा एक नकार तुमचे काही पैसे वाचवू शकतो.
- ३० दिवस किंवा एका महिन्यासाठी जास्त पैसे बचत करण्याचे आव्हान स्वीकारा.
- शॉपिंगच्या हौसेला आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे.
- महागड्या चैनीच्या वस्तू, ब्रँडेड वस्तू यांच्या खरेदीला यावर घाला. स्टेट्स पेक्षा गरज महत्वाची असते.त्यामुळे गरजेपुरतंच खरेदी करा.
- शॉपिंगला जाण्यापूर्वी लिस्ट बनवा. व त्यानुसारच खरेदी करा. गरज नसताना निव्वळ ऑफर आहे किंवा हौस म्हणून अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा.
- शक्य असल्यास शॉपिंग लिस्टच्या ऍपचा वापर करा किंवा गरजेनुसार ऑनलाईन शॉपिंग करा.
- घराबाहेर पडताना शक्यतो खाऊन व पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडा. बाहेर पडल्यावर बहुतांश वेळा बाहेरच्या खाण्या -पिण्यावर अनावश्यक खर्च केला जातो.
- ज्या वस्तूंची नेहमी गरज भासते अशा वस्तूंची खरेदी होलसेल मार्केटमधून करावी.
- शॉपिंग डील्स पाठवणाऱ्या वेबसाईट्सचे ईमेल सब्स्क्रिप्शन रद्द करा. यामुळे ‘सेल’च्या मोहजालात अडकून अनेकदा अनावश्यक खरेदी केली जाते.
- मोठी खरेदी करताना प्राईस मॅचिंग, प्राईस कम्पेअर करणाऱ्या वेबसाईटचा वापर करा.
- पुस्तके, डीव्हीडी इत्यादी खरेदी करण्यापेक्षा लायब्ररीच्या पर्यायाची निवड करा.
- महागडे फ्रोझन फूड (फ्रोझन कॉर्न, मटार, इत्यादी) खरेदी करण्यापेक्षा अशा वस्तू स्वस्त असताना खूप कमी दराने खरेदी करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून घरच्या घरी डीप फ्रिज करू शकता.
- ब्युटी पार्लर, कॉस्मॅटिक यांवर होणाऱ्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
- गरज नसल्यास लँडलाईन कनेक्शन तसेच ब्रॉडबँड कनेक्शन बंद करा.
- घरच्या घरी कपडे क्लीन व प्रेस करून लॉंड्रीचा खर्च वाचवता येणं सहज शक्य आहे.
- घरातील अनावश्यक वस्तू विकून टाका
- टीव्ही नावाचा घरात असणारा इडियट बॉक्स बंद करा यामुळे वेळ, पैसा आणि इलेक्ट्रिसिटी या साऱ्याची बचत होईल.
- ‘टाकाऊतून टिकाऊ’ बनविण्याची कला शिकून घ्या. गिफ्ट पेपर, पॅकिंग बॉक्स, जुन्या वह्या इत्यादी गोष्टी जपून ठेवल्यास त्यावर अनावश्यक खर्च होणार नाही. अनावश्यक वस्तू रिसेल मार्केट किंवा रिसेल वेबसाईटवर विकून टाका. थोडीशी क्रिएटिव्हिटी वापरून गिफ्ट्स घरीच तयार करा.
- ‘आउटिंग’ करण्यापेक्षा मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांना घरीच आमंत्रण द्या. अशा प्रकारची ‘बजेट मीट’ तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल.
- नेहमी ‘एनर्जी एफिशिएंट’ उत्पादने खरेदी करा. यामुळे इलेस्ट्रीसिटीची बचत होते.
- मॉलमध्ये फिरायला जाण्यापेक्षा जवळच्या एखाद्या बागेमध्ये फिरायला जा. कारण मॉलमध्ये गेल्यानंतर अनावश्यक वस्तू खरेदीच्या मोहजालात आपण नकळतपणे अडकत जातो.
क्रमश:…..
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2F8feix )
२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…, नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग,
बचत आणि आर्थिक शिस्तीचे ७ सोपे मार्ग, मासिक बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले,
बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग, पगारच पुरत नाही…बचत कशी करू?,
आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)
(Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ )
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :