Reading Time: 3 minutes

मागील भागापासून पुढे चालू……

घरगुती बिले:

33. सर्व बिले वेळच्या वेळी भरून दंडाची रक्कम वाचवा.

34. आपली बिले ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न करा. अनेक कंपन्या ऑनलाईन बिलांसाठी काही कॅशबॅक देतात.

35.आपल्या इलेक्टीसिटी वापरावर नियंत्रण ठेवा. शक्य असेल तिथे LED चा वापर करा.

36. शक्य असल्यास सोलर पॅनल बसवून घ्या. यामुळे गॅस, इलेक्ट्रिसिटी इत्यादींचा खर्च कमी होण्यास मदत होईल.

37. जी मॅगझिन्स (मासिके) तुम्ही वाचत नाही अशा मॅगझीनसाठी असणारी वर्गणी रद्द करा.

38. क्लब, जिम किंवा तत्सम जागी असणारी परंतु तुम्ही वापरत नसणाऱ्या जागांची मेम्बरशीप रद्द (कॅन्सल) करा.

39. आपण नियमितपणे व्हेकेशन ट्रिप करत असल्यास आपल्या पुढील ‘व्हेकेशन  ट्रीपची तयारी व नियोजन आत्तापासूनच करा. त्यासाठी अनेक ट्रॅव्हल वेबसाईटकरून मिळणाऱ्या ऑफर्स व फ्री मेम्बरशिपचा लाभ घ्या.  

प्रवास

40. वाहन खरेदी करताना किंवा वापरताना इंधन बचत करणाऱ्या (fuel-efficient) वाहनांचा आग्रह धरा. यामुळे इंधन आणि पैसे दोन्हीही वाचतील.

41.ऑफिसमध्ये जाताना शक्य असल्यास ‘कार पुलिंग’चा किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पर्याय निवडा. यामुळे वाढत्या ट्रॅफिकलाही आळा बसेल व ऑफिसच्या ठिकाणी बहुतांश वेळा भेडसावणाऱ्या ‘पार्किंग’ समस्याही काही प्रमाणात आटोक्यात येईल.

42. वाहने सावकाश चालावा. यामुळे इंधन बचत होऊन वाहनांचा मेंटेनन्सचा खर्चही कमी होईल.

43. वाहनांचा मेंटेनन्स, सर्व्हिसिंग, इत्यादी गोष्टी वेळच्या वेळी केल्यास वाहनाचे आयुष्य वाढेल.

44. प्रवासामध्ये शक्य झाल्यास खाद्यपदार्थ व पाणी घरूनच न्या. यामुळे बाहेरच्या खाण्यावर होणार खर्च तर वाचलाच शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही घरचं खाणं केव्हाही उत्तमच.

45. वाहनांचे वॉशिंग घरी करता येणे शक्य असते. ते घराच्या घरी करून त्यासाठी विनाकारण खर्च होणार पैसे वाचावा.

आरोग्य आणि आर्थिक नियोजन:

46. आरोग्यम् धनसंपदा ! आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कारण आरोग्यावर होणारा खर्च बरेचदा आपलं आर्थिक गणित बिघडवतो.

47. व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा. यावर सर्वात जास्त पैसे खर्च होतात व आरोग्याचीही हानी होते.

48. घरच्या घरीच नियमित व्यायामाची व चालण्याची सवय लावून घ्या. यामुळे जिम किंवा जिम साधनांवर होणार खर्च वाचेल व आरोग्यही चांगले राहील. परंतु जिम, योग शिबीर, स्पोर्ट्स यांसाठी ‘योग्यप्रकारे’ खर्च होणारा पैसा हा तुमची आरोग्यासाठीची गुंतवणूकच आहे.

49. शक्यतो बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा कारण त्यावर खर्चही जास्त होतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नसतात.

50. बाहेर जाऊन पाण्याची बाटली विकत घेण्यापेक्षा बाहेर पडताना पाण्याची बाटली घरून घेऊन जा. कोणाचा विश्वास बसणार नाही पण बाहेर पडल्यावर पाण्यावर खूप पैसे खर्च होतात आणि हे नक्कीच टाळता येण्यासारखे आहे.  

51. तुमच्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करून जेनेरिक औषधांचा पर्याय निवडा. कारण ही औषधे स्वस्त असतात. परंतु ही औषधे स्वस्त असल्याची खात्री करा कारण क्वचित प्रसंगी जेनेरिक औषधे महाग  असल्याचे निदर्शनास आले आहे.

52. स्वच्छता खूप महत्वची असते. यामुळे अनेक रोगांना आळा बसून मेडिकल खर्च कमी होतो. असे असले तरी ‘हायजिन साधनांचा’ अतिरेक टाळा. यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसेल.

नवीन बचत खाते (Saving a/c ) उघडा

53. आत्तापासूनच बचत सुरु करा. बचतीचा संकल्प उद्या नाही आत्तापासूनच सुरु करा.

54. नवीन बचत खाते उघडून त्यामध्ये ठराविक रक्कम प्रति महिना जमा करत जा.

55. आपल्या मासिक उत्पन्नापैकी काही भाग अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांसाठी आपत्कालीन निधीच्या स्वरूपात बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

56. त्या इमर्जन्सी फ़ंडासाठी वेगळे खाते उघडून ठराविक रक्कम बाजूला ठेवल्यास, अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या वेळी ही बचत उपयोगी पडेल व कोणाकडे हात पसरायची वेळ येणार नाही.   

57. लक्षात ठेवा बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग आहे.

बँक खात्याची नियमित तपासणी

58. तुमची सर्व बँक खाती नियमित तपासा त्यावरून आपलं आर्थिक नियोजन यशस्वी होतंय का नाही ते लक्षात येईल.

59. यातून बँकेकडून कापून घेण्यात येणारे येणारे वेगवेगळे चार्जेसही लक्षात येतील.

60. विविध बँकांचे बचत खात्याचे तसेच आरडी, एफडीचे व्याजदर, सुविधा इत्यादी तपासून त्यानुसार बँकेतील पैशाचे नियोजन करता येईल.

61. विविध बँकांचे व्याजदर तपासताना कम्पेअर वेबसाईटचा वापर करा. यावरून आपल्या बँकेकडून मिळणारा लाभ अथवा सुविधा कमी असल्यास जास्त व्याज व सुविधा देणाऱ्या खात्रीशीर बँकेत बचत खाते उघडावे.  

गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय:

62. पारंपरिक गुंतवणूक जसं आरडी, एफडी, सुवर्ण गुंतवणूक, रिअल इस्टेट, इत्यादी यापैकी कुठली ना कुठली  गुंतवणूक प्रत्येकजण करत असेलच. गुंतवणूक करताना नेहमी चांगला परतावा मिळवून देणारा पर्याय व सुरक्षितता निवडावा.

63. स्टॉक मार्केट आणि शेअर्सबद्दल पुरेशी माहिती घेऊन त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची ते शिकून घ्या.

64. शक्यतो गुंतवणूक करताना ती गुंतवणूक करसवलत मिळण्यास पात्र आहे का? असल्यास किती रकमेपर्यंतइत्यादी गोष्टी तपासून बघाव्यात.

65. याचबरोबर गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांची माहिती घेऊन त्यामधून उत्तम पर्याय निवडून नवीन गुंतवणूक सुरु करा. (उदा. म्युच्युअल फंड, शेअर्स इत्यादी.) ही गुंतवणूक करताना शक्यतो संपूर्ण माहिती घेऊन तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच करावी.

66. महिला व तरुणांनी स्वतः गुंतवणूकींबद्दल माहिती घ्यावी.

क्रमश:..

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2TwrOMN )

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९संकल्प – भाग १

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…,    नवीन वर्षात कर्जमुक्त होण्याचे ५ सोपे मार्ग,

बचत आणि आर्थिक शिस्तीचे ७ सोपे मार्ग,     मासिक बजेट कसे तयार करावे यासाठी ११ पावले,

बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग,    पगारच पुरत नाही…बचत कशी करू?,

आपत्कालीन निधी – आणीबाणी निधी (Emergency Fund)

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.