Aadhaar – PAN Linking
“पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी (Aadhaar – PAN Linking)” साठी देण्यात आलेली मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपणार होती, परंतु कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने ट्वीट करून माहिती दिली असून यासाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या साईटवर अनेकांनी गर्दी केली आणि त्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली. ही अडचण पुढच्या वेळी येऊ नये म्हणून त्वरित पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी करून घ्या.
- आधार – पॅन लिंकिंग ही केंद्रसरकारच्या काही महत्वपूर्ण उद्दीष्टांपैकी एक आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकवेळा मुदतवाढ देऊनही अनेकांनी आधार -पॅन लिंक केलेले नाही.
- आयकर कायद्यानुसार निर्धारित मुदतीमध्ये आधार -पॅन लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द करण्यात येईल. तसेच, एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल व रद्द झालेल्या पॅन क्रमाकांच्या सहाय्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.
- आधार-पॅन लिंक न केल्यास सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना २०% अतिरिक्त कर द्यावा लागेल.
Aadhaar – PAN Linking: कशी कराल आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी ?
- तुमच्या रजिस्टर मोबाईल वरून तुम्ही आधार कार्ड -पॅन कार्ड जोडणी करू शकता. यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 56161 या नंबरला एसएमएस करा.
- ऑनलाईन वेबसाईट आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील पॅन आणि आधार क्रमांक लिंक करता येईल. यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून https://www1.incometaxindiaefiling.gov.in/ त्यावरील माहिती भरून कॅप्चा टाईप करा अथवा ओटीपी मागवून तो भरावा लागेल. त्यांनतर ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचे आधार -पॅन लिंक करू शकता.
नागरिकांनी आधार-पॅन लिंक करताना नाव व जन्मतारीख बरोबर असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. नाव अथवा जन्मतारीख यामध्ये चूक असल्यास,आधी ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल. आधारमध्ये चूक असेल, तर यूआयडीएआय आणि पॅनमध्ये बदल करायचा असेल, तर इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधून त्यामध्ये दुरुस्ती करता येईल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies