Yearly bonus
Yearly bonus
Reading Time: 3 minutes

How to use Yearly Bonus

आपल्याकडे एप्रिल महिन्यात नोकरदारांना आर्थिक फायदा होत असतो. काहींना या महिन्यात वार्षिक पगारवाढ मिळत असते, तर काहींना परफॉर्मन्स बोनस मिळत असतो. करदाते असतील तर त्यांना कराचा परतावा देखील एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याचदा मिळतो. एप्रिल महिन्यात भारतीयांना अशा रकमांच्या बाबतीत फायदा होत असला तरी जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी सर्वांनीच काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व पैशांचं आर्थिक नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. यासंदर्भात काही गोष्टी आहेत ज्या सर्वांनी एकदा नीट वाचून, त्यांना अंमलात आणायला हवे. 

 

हेही वाचा – Mutual fund asset management  : म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापनासंदर्भात ‘हे’ घ्या महत्वाचे निर्णय

 

इमर्जन्सी फंड सुरू करा.

  • अचानक उद्भवलेल्या अडचणींमध्ये आपल्याला काही वेळेस आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागते.
  • आपत्कालीन परिस्थितीसाठी आपल्याकडे एक विशेष रक्कम राखीव असणे गरजेचे आहे. यासाठी आपण बोनस मधून किंवा अतिरिक्त पैशांमधून साठवणूक करून एक विशेष रक्कम बाजूला काढू शकतो. यालाच आपण इमर्जन्सी फंड असं देखील म्हणू शकतो. सध्याच्या काळात इमर्जन्सी फंड असणे हे अत्यंत गरजेचे आहे.

नियमित कर्ज फेडा – 

  • यामध्ये नियोजन करत असताना आपल्याला कर्ज फेडण्याच्या बाबतीत जागरूक असणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्याकडे रोख रक्कम पडून असते तेव्हा सहसा बरेच जण गुंतवणूक करणे टाळत असतात. 
  • व्याजदर जेव्हा ७ ते ८ टक्क्यांच्या वर असतो तेव्हा क्रमाक्रमाने कर्जाची परतफेड करणे सुरू करावे. क्रेडिट कार्ड पेमेंट, कार लोन, वैयक्तिक कर्ज हे वेळेच्या वेळी जमा करणे गरजेचे आहे. गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज यामध्ये तुम्हाला करामध्ये नक्कीच सवलत मिळू शकते. 
  • समजा आपण ७.५ टक्के व्याजाने ७५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. आपल्याला या कर्जासाठी महिन्याला ५,००० हजार रुपयांचा हप्ता भरायचा आहे. आणि कर्ज फेडण्याची मुदत २५ वर्ष आहे. 
  • आपण बोनस स्वरूपात किंवा इतर काही गोष्टींमधून आलेल्या पैशांमधून जर १ लाख रुपयांचे प्रीपेमेंट केले, तर आपल्याला मोठा फायदा मिळतो. २५ वर्षांची मुदत असणारे कर्ज आपल्याला फक्त १५ वर्षांमध्ये फेडता येते. ९२ लाख रुपये असणारी व्याजाची रक्कम कमी होऊन आपल्याला फक्त ५१ लाख रुपये इतकी भरावी लागते. आर्थिक नियोजनामुळे आपले तब्ब्ल ४१ लाख रुपये वाचतात. यावरून आर्थिक नियोजन किती गरजेचे आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते. 

 

हेही वाचा – Need of Insurance Agent : तुम्हाला आरोग्य विमा सल्लागाराची गरज का असते? 

 

 शेअर बाजारात गुंतवणूक चालू ठेवा – 

  • गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स घसरला आहे. कोरोनाची महामारी, युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारावर चांगलाच परिणाम झालेला दिसत होता. 
  • जर आपण दोन ते तीन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर सध्या उत्तम संधी आहे. काही स्वस्त असणारे स्टॉक्स योग्य रेंजमध्ये आपण खरेदी करू शकतो. 
  • शेअर बाजार हा कधी वर तर कधी थेट खाली जात असतो, त्यामुळे अनेक जण शेअर बाजारात गुंतवूणक करण्यास तयार होत नाहीत. 

गुंतवणुकीसाठी एसआयपीचा पर्याय निवडा –

  • ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास अडचण असेल अशांनी म्युचुअल फंड म्हणजेच एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी. 
  • बचत खात्यात पैसे ठेवणे हा गुंतवणुकीचा पर्याय नक्कीच नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. 
  • एसआयपीची रक्कम आपण मालमत्ता खरेदीसाठी डाउन पेमेंट करण्यासाठी किंवा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापरू शकतो. 

मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करा – 

  • मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास सुकन्या समृद्धी हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. 
  • मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सुकन्या समृद्धी योजना एक चांगला पर्याय आहे. या  योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला आर्थिक फायदा मिळवू शकता. 
  • यात कलम ८० C अंतर्गत कर लाभ मिळतो. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत चालू वर्षात तुम्ही जास्तीत जास्त दीड लाखांच्या आसपास गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये गुंतवणूक करताना आपण काही गोष्टींपासून सावधता बाळगली पाहिजे. सुकन्या योजनेत गुंतवणूक सुरु केल्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी आहे. 

 

हेही वाचा –  Health Insurance : जाणून घ्या, आरोग्य विमामधील प्रतीक्षा कालावधी 

 

विमा पोर्टफोलिओमध्ये आरोग्य विम्याचा समावेश करा.

  • विमा हा सध्या अत्यंत गरजेचा झालेला आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेकांना लाखांमध्ये खर्च आला आणि संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याच्या घटना आपण आपल्या आसपासही घडलेल्या बघितल्या असतील. 
  • आर्थिक गुंतवणुकीसोबतच विमा संरक्षण काढणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. आरोग्य विम्यासाठी आपल्याकडे असणारा अतिरिक्त निधी वापरणे हा अत्यंत चांगला पर्याय आहे. यामुळे आपले कुटुंब निश्चित आर्थिक सुरक्षेत राहू शकते.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…