Reading Time: 2 minutes

नियमितपणे सरकारकडे कर भरणे हे देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे नैतिक व सामाजिक कर्तव्य आहे. 

तुम्ही-आम्ही भरत असलेल्या करांमुळेच आपला देश आर्थिक दृष्ट्या सक्षम होतो. 

आपले वार्षिक उत्पन्न इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाही म्हणून मी इन्कम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Return) भरणे गरजेचे नाही असे अनेकांना वाटते. या लेखातून आपण आयकर विवरणपत्र दाखल करण्याचे फायदे समजून घेऊया. 

आयटीआर भरण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत (Benefits of Filing ITR) :

१. कोणतेही कर्ज सहज मंजूर होते – 

  • कोणतेही कर्ज घेताना सर्वप्रथम बँकेमध्ये तुमच्या उत्पन्नाचा पुरावा बघितला जातो.
  • विशेषतः जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा उत्पन्नाचा पुरावा म्हणून बँक तुम्हाला तीन वर्षांपासून भरलेली ITR मागते व ते दिल्यास तुमचे कर्ज लवकरात लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते.  
  • ITR तुमच्यासाठी भविष्यात कोणतेही कर्ज घेण्यापूर्वीचे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. 
  • घराचे किंवा गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयटीआर अशाप्रकारे तुम्हाला मदत करते.  

२. ITR हा सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा पुरावा –

  • आयकर रिटर्न भरल्यावर करदात्यांना त्याचे प्रमाणपत्र मिळते. व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दर्शवणारा आयटीआर हा सर्वात ग्राह्य धरला जाणारा सरकारी पुरावा असतो. 
  • तसेच, हा उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा, क्रेडीट कार्ड, कर्ज किंवा स्वतःचे क्रेडीट सिद्ध करण्यास फार उपयुक्त असतो.

 

हे ही वाचा – आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कोणता ITR दाखल करावा ? जाणून घ्या ITR चे प्रकार

 

३. व्हिसा प्रक्रिया आणखी सुलभ होते –

  • दुसऱ्या देशात जाण्यासाठी व्हिसा आवश्यक आहे व या व्हिसासाठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाते. 
  • जी व्यक्ती आपल्या देशात येऊ इच्छित आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे हे तपासण्यासाठी आयटीआर तपशील व्हिसा देणाऱ्या देशाकडून बघितला जातो, म्हणून आयटीआर भरणे आवश्यक आहे. 

४. कर परतावा हवा असल्यास –

  • अनेक वेळा पगारदार व्यक्तीचे उत्पन्न इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाही तरीदेखील काही कारणास्तव TDS कापला जातो. 
  • अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परतावा हवा असेल तर त्यासाठी आयटीआर रिटर्न भरणे अनिवार्य आहे. कर परताव्याचा दावा दाखल करण्यासाठी आयटीआर दाखल कराव लागतो.
  • आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्यांचे मुल्यांकन करते, त्यामध्ये जर तुमचा परतावा निघत  असेल तर विभाग त्यावर प्रक्रिया करते आणि तुमच्या नोंदणीकृत खात्यात जमा करते. 

५. जास्त विमा संरक्षण प्राप्त करण्यासाठी  –

  • विमा कंपन्या अधिक विमा संरक्षण देण्यासाठी तुमचे उत्पन्नाचा पुरावा म्हणून सर्वप्रथम आयटीआर तपासतात. 
  • तुमच्या पश्चात कुटुंबीयांची काळजी विमा कंपनी क्लेम देऊन घेते.म्हणजेच आयटीआर दाखल करणे म्हणजे एकप्रकारची आपल्या पश्चात कुटुंबीयांची घेतलेली काळजीच असते.   

६. आयटीआर – ॲड्रेस प्रूफ 

  • इन्कम टॅक्स रिटर्नची पावती नोंदणीकृत पत्त्याचा पुरावा म्हणूनही स्वीकारली जाते. 
  • इतर निवासी पुरावा कागदपत्रांमध्ये आयटीआर पावती हा अधिक ग्राह्य पुरावा समजला जातो. 

७. आयटीआर मुळे व्यवसायातील तोटा कॅरी फॉरवर्ड करणे सोपे –

  • जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि त्यामधे तुमचा तोटा झाला असेल तर, पुढील वर्षात तो तोटा त्या वर्षीच्या उत्पन्नातून वजा करण्यासाठी  निर्धारित वेळेच्या आत ITR भरणे आवश्यक आहे. 
  • तसेच इतर प्रकरचे तोटे म्हणजे व्यवसायातील तोटा, भांडवली तोटा पुढील वर्षात नेण्यासाठी ITR दाखल करणे आवश्यक असते. 

८. सरकारी टेंडर, कॉन्ट्रॅक्ट साठी ITR आवश्यक –

  • कोणत्याही सरकारी विभागाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, टेंडर दाखल करण्यासाठी,  करार करण्यासाठी गेल्या काही वर्षांचे आयटीआर अनिवार्य असतात. 
  • तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहात हे सरकारी खात्यांना तुमच्या ITR मुळे समजते. 

 

हे ही वाचा – Common ITR Filing Mistakes: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या ८ चुका नक्की टाळा..

 

९. रिटर्न भरणे सुधारित रिटर्नच्या बाबतीत उपयुक्त ठरू शकते –

  • जर करदात्याने मूळ रिटर्न भरले नसेल तर, त्याला आवश्यक असलेला सुधारित रिटर्न  (Updated Return) दाखल करता येत नाही.
  • त्यामुळे वेळच्या वेळी रिटर्न भरणे ही महत्वाचे काम आहे.   

वरील आयटीआर दाखल करण्याचे सर्व फायदे लक्षात घेऊन तुम्ही लवकरात लवकर तुमची आयटीआर दाखल करायची प्रक्रिया सुरु करा आणि निश्चिन्त व्हा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.