आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कोणता ITR दाखल करावा ? – जाणून घ्या ITR चे प्रकार

Reading Time: 3 minutes
 • इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे हे प्रत्येक भारतीयाचे जरी कर्तव्य असले, तरी हे अनेकांना डोक्यावरचे मोठे ओझे विनाकारणच वाटत असते. ज्यांना इन्कम टॅक्स रिटर्न बद्दलची काहीच माहिती नसते त्यांच्यासाठी तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी कंटाळवाणी व तेवढीच त्रासदायक ठरू शकते. 
 • कोणता ITR फॉर्म भरावा यामधे तुम्ही गोंधळून जाऊ नका. या लेखातून आपण ITR म्हणजे काय, त्याचे प्रकार, तो दाखल कसा करावा, कोणत्या वर्षासाठी कोणता फॉर्म भरावा या सर्वांची माहिती जाणून घेणार आहोत. 

ITR म्हणजे काय ?

 • इन्कम टॅक्स रिटर्न हे कर कपातीचा दावा करण्यासाठी, एकूण करपात्र उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी व एकूण कर दायित्व घोषित करण्यासाठी तयार केले जाते. सदर रिटर्न आयकर खात्याच्या साईटवर ऑनलाईन पद्धतीने दाखल केले जाते. 
 • आजपर्यंत सरकारी विभागाने सात वेगवेगळे प्रकार करदात्यांच्या समोर प्रस्थापित केले आहेत. 
 • आयटीआर १, ITR 2, ITR 3, ITR 4, ITR 5, ITR 6 आणि ITR 7 हे सर्व आयटीआर फॉर्म चे प्रकार आहेत. करदात्याच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर आधारित हे सर्व फॉर्म लागू केले जातात. 
 • तसेच, सरकारने हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि कंपन्या किंवा फर्म यांना आयकर विभागाकडे आयकर विवरणपत्र भरणे आता अनिवार्य केले आहे.

 

हे ही वाचा – Save your income tax money : अशा पध्दतीने वाचवा कर

ITR फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/तपशील –

 • पॅन
 • फॉर्म 16A, 16B
 • फॉर्म 26AS
 • पगार स्लिप
 • बँक स्टेटमेंट
 • व्याज प्रमाणपत्रे
 • कर बचत गुंतवणुकीचा पुरावा

ITR फॉर्मचे प्रकार –

आयटीआर फॉर्मचे सात प्रकार आहेत. करदात्यांनी त्यांच्या श्रेणी (वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब, कंपनी, इ.), रक्कम आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत यावर अवलंबून, त्यांचे IT रिटर्न भरण्यासाठी यापैकी एक फॉर्म वापरणे आवश्यक आहे.

 

ITR 1
 • हा ITR फॉर्म SAHAJ म्हणूनही ओळखला जातो. 
 • हा फॉर्म पगार/पेन्शन, एक घर मालमत्ता आणि इतर स्त्रोतांमधून मिळविलेले वार्षिक उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे 
ITR 2
 • 50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी, 
 • पगार/पेन्शन, इतर स्त्रोत, परदेशी उत्पन्न, एकापेक्षा जास्त घर मालमत्ता, भांडवली नफा यातून मिळालेले उत्पन्न जाहीर करण्यासाठी ITR 2 वापरावा.  
ITR 3
 • ज्या व्यक्ती एखाद्या फर्ममध्ये भागीदार आहेत आणि 
 • फर्मकडून त्यांना मिळालेले व्याज, पगार, बोनस, कमिशन, मोबदला या स्वरूपात उत्पन्न कमावतात त्या व्यक्तींनी ITR 3  वापरावा. 
 • पगारदार व्यक्ती ज्यांना शेअर्सच्या इंट्राडे ट्रेडिंगमधून उत्पन्न आहे किंवा फ्युचर्स आणि इतर पर्यायांमधून उत्पन्न आहे त्या व्यक्तींनी ITR 3  वापरावा. 
ITR 4
 • सुगम म्हणूनही ITR 4 ओळखला जातो. 
 • हा फॉर्म ज्या व्यक्तींचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त नाही अशा व्यक्तींसाठी आहे
 • यात 44AD, 44ADA किंवा 44AE, पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. पेन्शन, एक घर मालमत्ता, कृषी उत्पन्न (5,000 रुपयांपर्यंत), आणि इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न जाहीर करण्यासाठी ITR 4 वापरावा. 

ITR 4 फॉर्म कोण वापरू शकत नाही? 

 • तुमचे एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास
 • एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून उत्पन्न असणे
 • कोणत्याही विदेशी मालमत्तेचे मालक असणे
 • भारताबाहेरील कोणत्याही क्षेत्रातून उत्पन्न असणे
 • तुम्ही कंपनीत संचालक असाल तर
 • जर तुम्ही आर्थिक वर्षात कधीही असूचीबद्ध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल
 • रहिवासी नसणे सामान्यतः निवासी (RNOR) आणि अनिवासी नसणे
 • परदेशी मालमत्ता किंवा परदेशी उत्पन्न असणे
ITR 5
 • भागीदारी संस्था, 
 • LLP, AOP आणि BOI सारख्या संस्था

यांचे व्यवसायातील उत्पन्न जाहीर करण्यासाठी कंपन्या, एलएलपी, एओपी आणि बीओआय या व्यक्तींनी ITR 5 वापरावा.  

ITR 6
 • कलम ११ अंतर्गत सूट मिळण्याचा दावा करत नसलेल्या कोणत्याही कंपन्यांसाठी ITR 6 आहे. 
ITR 7
 • आयकर सवलतीचा दावा करणार्‍या विना नफा काम करणाऱ्या कंपन्या, आणि चॅरिटेबल ट्रस्टसाठी म्हणजे कलम 139 (4A), 139 (4B), 139 (4C), 139 (4D) अंतर्गत येणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्या यांनी ITR 7 वापरावा. 

 

हे ही वाचा – Passive income: पर्यायी उत्पन्नाचे हे ७ मार्ग बनू शकतील तुमच्या उत्पन्नाचे मुख्य साधन

 

 ITR कसा दाखल करायचा ?

 • तुम्ही आर्थिक वर्ष २०२१-२२ शी संबंधित आर्थिक वर्ष २०१९-२० साठी तुमचा ITR  ई-फाइल करू शकता. 
 • इन्कम टॅक्स विभागाने उत्पन्नाचा परतावा करण्यासाठी ई-फायलिंगसाठी स्वतंत्र पोर्टल स्थापन केले आहे. 
 • उत्पन्नाचा रिटर्न ई-फायलिंगसाठी करदाते www.incometaxindiaefiling.gov.in वर लॉग-इन करू शकतात. 
 • तुमचा युझर आयडी आणि पासवर्डद्वारे ई-फाइलिंग पोर्टलमध्ये लॉग-इन करा. 
 • जर युजर-आयडी नसेल तर प्रथामिक माहिती भरून तुम्ही युझर-आयडी तयार करू शकता. 
 • ऑनलाईन रिटर्नचा पर्याय निवडून, स्टार्ट न्यू फिलिंग केल्यानंतर, वैयक्तिक यूझरवर क्लिक करून ITR-1 / अन्य फॉर्म चे पर्याय निवडा. 
 • त्यामधे तुमची माहिती संपूर्ण माहिती व त्यानंतर बँकेची आणि वैयक्तिक माहिती भरा.

आरटीआर न भरल्यास / उशिरा भरल्यास –

आयकर विवरण पत्रक (ITR) दाखल करण्याच्या अंतिम दिनांक – 

 • व्यक्तिगत करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब, / AOP/ BOI (ज्यांना टॅक्स ऑडिट लागू नाही असे करदाते) – 31 जुलै 2022
 • व्यापारी व व्यवसायीक (ज्यांना टॅक्स ऑडिट लागू आहे असे करदाते) – 31 ऑक्टोबर 2022
 • शिवाय, आयटीआर उशिरा भरला गेला तर, करदात्यांना लॉस सेट ऑफ पुढच्या वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. 
 • नवीन सवलतीच्या कर प्रणालीची निवड करण्यास पात्र होण्यासाठी, ३१ जुलै २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचा ITR फाइल करणे आवश्यक आहे.
 • आर्थिक वर्ष २०२२ साठी आयटीआर दाखल करण्यापूर्वी वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) मध्ये कर अधिकाऱ्यांनी मिळवलेली माहिती देखील तुम्ही तपास आणि मगच तुमचा आयटीआर दाखल करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!