‘हॅरी पॉटर‘ जगभरात फक्त तरुण वर्गातच नाही तर सर्वच वयोगटात लोकप्रिय आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण त्याची पुस्तके आवडीने वाचतात. हॅरी पॉटरवर आलेल्या चित्रपट मालिकेने रग्गड पैसे कमावले आहेत. हॅरी पॉटर‘ (Harry Potter) या जगप्रसिद्ध फ्रँचायझीची निर्माती जे. के. रोलिंग (J.K. Rowling) नामक ब्रिटिश महिलेने केली आहे. तिची संपत्ती १ अब्ज डॉलर($1 billion) असून ती जगभरात लोकप्रिय लेखक आहे.
- ‘हॅरी पॉटर‘ म्हणजे जगाला वाचवण्याची ताकद असणारा एक जादूगार तरुण ! यामध्ये फक्त जादुई कथा किंवा काल्पनिक पात्रचं नाही तर आर्थिक बाबींबद्दल देखील काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
- ‘हॅरी पॉटर‘ वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर तुम्हाला मनोरंजन आणि आर्थिक गोष्टी एकमेकांशी कशा जुळलेल्या आहेत हे उत्तम रित्या समजेल.
- तरुण वर्गाला मनोरंजनासोबतच आर्थिक व्यवस्थापनाची सुयोग्य पद्धत ‘हॅरी पॉटर‘ कसा शिकवतो ते आपण या लेखामधून बघूया –
१. कोणत्याही परिस्थिमध्ये(अनुकूल किंवा प्रतिकूल) स्वतःवर विश्वास ठेवा –
- ‘हॅरी पॉटर‘ प्रकाशकांना सादर करण्यात आले, तेव्हा जे.के. रोलिंगला अनेक नकात्मक फीडबॅक मिळाले होते. मात्र स्वतःवर विश्वास ठेऊन त्यांनी हार मानली नाही. लोकांचे ऐकूनं जर जे.के. रोलिंग यांनी ‘हॅरी पॉटर‘चं काम करणे बंद केले असते तर आज त्या जगातील श्रीमंत लेखकांपैकी एक नसत्या.
- सांगायचं तात्पर्य इतकंच की अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण शांत राहून स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपला स्वतःवरील विश्वास ढासळला किंवा शंका निर्माण झाली तर आपण यशापासून दूर जातो.
२. सर्वच गोष्टी पैशाने विकत घेणं शक्य आहे, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका –
- ‘हॅरी पॉटर‘ मध्ये श्रीमंत मालफॉय (Malfoy) कुटुंब आहे जे अत्यंत लोभी, स्वार्थी आणि घातकी आहे. हे कुटूंब आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाटेल त्या थराला जाते. मात्र नंतर त्यांचे कारनामे उघडकीस येतात. यातून बोध घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी चुकीच्या गोष्टी करणं हे तुम्हाला नक्कीच नुकसान देणारं ठरू शकते.
- पैसा हा अनेक गोष्टी विकत घेण्याची ताकद ठेवतो, पण कधीही निष्ठा, प्रेम, आदर आणि खरेपणा विकत घेऊ शकत नाही. कुत्रा हा निष्ठेमुळे माणसाचा सर्वात जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो.
हे ही वाचा – Financial Planning For couples : सुखी संसारासाठी आर्थिक नियोजनाचे ‘हे’ १० नियम
३. भविष्यामध्ये गुंतवणूक करा –
- हॅरी पॉटरचे आई-वडील हे तो लहान असतानाच मृत पावले होते. मात्र त्यांनी आपल्या पुत्रासाठी पुरेशी संपत्ती राखून ठेवलेली असते. यावरून कुटुंबाच्या किंवा स्वतःच्या भविष्याबद्दल केलेला विचार दिसून येतो.
- स्वतःच्या मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी नेहमीच विचार करायलाचं हवा. सर्वांचे भविष्य सुखरूप राहील यासाठी विचार करून नीट गुंतवणूक करायला हवी. फक्त वर्तमानाचा विचार करून आर्थिक नियोजनाचे पाऊल टाकणे घातक ठरू शकते.
४. कमी पैसे असतील तरी सुयोग्य आर्थिक नियोजन करा –
- ‘हॅरी पॉटर‘ मध्ये वेस्ली (Weasley) कुटुंबीय हे अत्यंत गरीब दाखवले आहे. मात्र आर्थिक बाबींचा विचार केल्यास या कुटुंबाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
- वेस्ली कुटुंबाचे प्रमुख हे कपडे, आभूषणे यावर कमी खर्च करतात. ते वापरलेले कपडे आपल्या कुटुंबासाठी विकत घेतात आणि जेवण बनवताना कोणीही भुकेलं राहणार नाही यासाठी जादूचे प्रयोग करतात.
- चैनीच्या गोष्टी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचं सुख देऊन आर्थिक संकटात टाकतात. या कारणास्तव गरजेच्या गोष्टींचा विचार पहिले करायला हवा.
५. कर्ज नियमितपणे फेडा –
- लुडो (Ludo) हे ‘हॅरी पॉटर‘ मधलं पात्र कर्ज आणि कर्ज न फेडण्याचे तोटे याबद्दल खूप काही सांगण्याचा प्रयत्न करते. जर कर्जाचे हप्ते नियमितपणे फेडले नाही तर कर्ज कुटुंबाच्या आर्थिक ऱ्हासाचं कारण ठरू शकतं.
- कर्ज नियमितपणे न फेडल्यास एक तर सी-बील क्रेडिट स्कोअर खराब होतो. दुसरं म्हणजे व्याजावर व्याज सुरु होतं. जर कर्ज फेडताचं आलं नाही तर थेट मालमत्तेवर जप्ती येण्याची नामुष्की ओढवते. यामुळं कुटुंब पूर्णतः उध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं कर्जाच्या बाबतीत सर्वांनीच नेहमीच सावध भूमिका घ्यायला हवी.
आर्थिक नियोजनामध्ये कुठलीही जादू नसते. तुम्ही मनावर घेतले तर ती खूप सोपी गोष्ट आहे. शिस्तबद्ध आर्थिक नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा !
हे ही वाचा – Stock Market movies: स्टॉक मार्केटवर आधारित ९ रंजक चित्रपट