दिवाळीचा पहिला दिवस म्हणून धनत्रयोदशी सण म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मातील धर्मशाश्रनुसार सोन्याची खरेदी करणे चांगले समजले जाते.
सोन्याचे महत्व धनत्रयोदशी सणाच्या दिवशी असते. भारतीय रितीरिवाजांमध्ये साडेतीन मुहूर्त असणाऱ्या सणांना सोन्याची खरेदी केली जाते.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला हमखास सोन्याची खरेदी होते. सोन्याचा भाव १० ग्रॅम म्हणजेच १ तोळ्याचा ५२,०१५ रुपये चालू आहे.
सोने खरेदी आणि भारत देश
- भारत देश सोने खरेदीमध्ये जगामध्ये आघाडीवर आहे. संपूर्ण जगाच्या एक तृतीयांश सोने भारतात आयात केले जाते.
- सणवारापासून तर लग्न समारंभापर्यंत सोन्याची खरेदी हमखास केली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेत सोने खरेदीमुळे पैशांची भर पडत असते.
- देशाच्या जीडीपी मध्ये सोने खरेदीचा मोठा वाटा आहे. अनेक लोक सोने खरेदीला गुंतवणूक म्हणून पाहतात.
- सन २०१७ मध्ये आलेल्या नोटबंदीचा सोने खरेदीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता.
नक्की वाचा : भारतात सोने गुंतवणुकीचे ५ मार्ग
सोने खरेदीमधील गुंतवणूक
- सणावाराला सोने खरेदी करणे म्हणजे एक गुंतवणूकच समजली जाते. लग्न समारंभात दागिने करणे म्हणजे माहेरच्यांनी मुलीसाठी केलेली गुंतवणूकच असते.
- सोन्यात गुंतवणूक करण्याचे नवीन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्याकडेही ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
सोने खरेदीचे पारंपरिक पर्याय
१. गोल्ड कॉईन्स आणि दागिने
- गोल्ड बार आणि गोल्ड कॉईन्स मध्ये सोन्याची खरेदी गुंतवणुकीच्या हेतूने केली जाते. सोन्याचे दागिने बनवायला जास्त खर्च लागतो आणि त्याप्रमाणात गोल्ड बार आणि गोल्ड कॉईन्स मधील गुंतवणूक कमी पैशांमध्ये होते. त्यामुळे कॉईन्स आणि बार मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली जाते.
- गोल्ड बार आणि कॉईन्सची खरेदी बँका, मुथूट ग्रुप, एचएमटीसी, स्टॉक होल्डिंग कॉऑर्परेशन ऑफ इंडिया आणि स्थानिक पिढीतून केली जाते. ०.५ ग्रॅम पासून पुढे गोल्ड बार आणि कॉइनची खरेदी केली जाते.
- गोल्ड कॉइन आणि गोल्ड बार खरेदी करताना महत्वाचे घटक सोन्याचे चिन्ह असलेले बीआयएएस लोगो आणि हॉलमार्किंगचा लोगो या गोष्टी पाहून खरेदी केली जाते.
नक्की वाचा : सोने खरेदी करताय, आधी हे वाचा
२. दागिने
- दागिने खरेदी करताना हॉलमार्क चिन्ह तपासून पाहायला हवे. हॉलमार्क चिन्ह दागिन्यांच्या विश्वासार्हतेचे चिन्ह समजले जाते. सोने खरेदी केल्यानंतर त्याच्या शुद्धतेबद्दल तपास करून खरेदी करावी आणि सोन्याच्या बिलाची पावती अवश्य घ्यावी.
- दागिने खरेदी करताना फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दागिने विश्वासू दुकानातूनच खरेदी करावेत.
सोन्याची खरेदी करत असताना बीआयएएस आणि हॉलमार्क लोगो पाहूनच खरेदी करावी. धनत्रयोदशी सणाला सोन्याची गुंतवणूक करताना इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार अवश्य करून गुंतवणुकीचा श्रीगणेशा करा.