Reading Time: 2 minutes

“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही पद्धत भारतामध्ये लोकप्रिय होत आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या ग्राहकांना या पद्धतीचा लाभ घेऊन खरेदी करण्याची संधी देत आहेत. आपण या लेखामध्ये याची माहिती करून घेणार आहोत. 

Buy Now Pay Later

  • ई कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्यांशी जोडलेल्या असतात. कॅपिटल फ्लोट नावाची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अमेझॉन पेची पार्टनर आहे. 
  • ग्राहक एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा बीएनपीएल पद्धतीची निवड करत असतो. वस्तू घेतल्यावर ठराविक आठवडे किंवा काही महिन्यांमध्ये ते पैसे ग्राहकाला भरावे लागतात. 
  • तुम्ही पहिल्याच वेळी BNPL द्वारे खरेदी करणार असाल तर केवायसी पूर्ण करावी लागते. बँक तुम्ही भरून दिलेला अर्ज मान्य किंवा अमान्य करू शकते. तुमचा अर्ज मान्य केला तर एक क्रेडिट लिमिट दिले जाते. तुम्ही त्या क्रेडिट लिमिट पर्यंतचीच खरेदी करू शकता. 
  • एखाद्या वस्तूची खरेदी केल्यावर परतफेड ईएमआय पद्धतीने करण्याचा पर्याय तुमच्या समोर असतो. परतफेडीच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार तुम्हाला कर्ज स्वरूपातील पैसे भरावे लागतात. 

 नक्की वाचा : आपला क्रेडिट स्कोअर कसा वाढवाल? 

तुम्ही व्याज भरले नाही तर बँक कोणत्या मार्गाने पैसे कमावते? –

  • बीएनपीएल पद्धत नो कॉस्ट ईएमआयसारखी आहे. बँक कंपनीकडून  ग्राहकाच्या खरेदीपेक्षा कमी किंमतीत वस्तूची खरेदी करते. समजा तुम्ही १०,००० रुपयांची फ्लिपकार्ट वरून खरेदी केली तर पैसे नंतर देण्याचा पर्याय निवडता येतो. . 
  • यावेळी बँक फ्लिपकार्टला ९८०० रुपये देते आणि २०० रुपये स्वतःकडेच जमा करून ठेवते. तुम्ही ईएमआय भरल्यास व्याजाची रक्कम बँक कमवत असते. 

बीएनपीएल पद्धतीपेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत योग्य – Credit Card System Is valuable than BNPL 

  • क्रेडिट कार्डवरून काढलेल्या पैशांचे मुदतीच्या दिवसापर्यंत व्याज आकारले जात नाही. तुम्हाला एकाच वेळी पैसे भरायचे नसतील तर ई कॉमर्स साईटवर नो कॉस्ट ईएमआय हा पर्याय दिलेला असतो. अशा वेळी तो पर्याय निवडून तुम्ही खरेदी करू शकता. 
  • बीएनपीएल पेक्षा  क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडला तर फायदेशीर ठरतो. क्रेडिट कार्ड वरून खरेदी करत असताना ३ महिने ते २४ महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज मिळू शकते. ते कुठेही स्वीकारले जाते. पण बीएनपीएल पद्धत मर्यादित ठिकाणीच स्वीकारली जाते. 
  • ई कॉमर्स माध्यमांवर बीएनपीएल पद्धतीवर कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय पर्याय दिले जातात. क्रेडिट कार्ड किंवा बीएनपीएल पद्धतींपैकी तुम्हाला योग्य वाटणाऱ्या पद्धतीची तुम्ही निवड करू शकता. 

बीएनपीएल आणि क्रेडिट कार्ड पद्धतीतील फरक- Difference between BNPL and Credit Card 

  • पहिल्या वेळेस क्रेडिट कार्ड मिळणे सोपे नसते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर क्रेडिट कार्ड दिले जात नाही. क्रेडिट कार्ड नाकारल्यानंतर  बीएनपीएल पद्धतीचा उपयोग केला जातो. 
  • तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड नसेल तर बीएनपीएल पद्धतीचा वापर करून खरेदी करता येते. या पद्धतीमुळे खरेदीची संधी झटपट उपलब्ध करून दिली जाते. 
  • तुम्हाला क्रेडिट कार्ड इतकेच लिमिट बीएनपीएल पद्धतीतही दिले जाते. वस्तू खरेदी केल्यानंतर तिचे रिपेमेंट वेळेवर केले तर बीएनपीएल पद्धतीतून पुढील काळात अधिक रकमेचे लिमिट मिळू शकते. 
  • क्रेडिट कार्डचा हप्ता वेळेवर भरला नाही तर तुम्हाला जास्त पैसे भरावे लागू शकतात. या पद्धतीमध्ये अडचणी खूप असतात. तुम्ही पूर्ण पैसे भरले नाही तर व्याजमुक्त क्रेडिट कालावधी काढून घेतला जातो आणि खरेदीच्या तारखेपासून व्याज आकारले जाते. 
  • बीएनपीएल पद्धत पारदर्शक आहे. तुम्ही वेळेवर ईएमआय भरले तर चिंतामुक्त होऊन गरजेच्या वेळेला परत ते कामाला येऊ शकते. पण तोच हप्ता उशिरा भरला तर पेनल्टी पडू शकते. 

नक्की वाचा : ईएमआय भरण्यास मुदतवाढ, तुम्ही काय कराल? 

तुम्ही कशाची निवड करू शकता? –

  • तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही योग्य पद्धतीने खर्च करत असाल तर बीएनपीएल पद्धतीपेक्षा क्रेडिट कार्डचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. क्रेडिट कार्डचे ईएमआय हे बीएनपीएलच्या प्रमाणात  जास्त स्वस्त असतात. 
  • तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल आणि तुम्हाला क्रेडिट वर खरेदी करायची असेल तर बीएनपीएल हा पर्याय योग्य ठरू शकतो. बीएनपीएल आणि क्रेडिट कार्ड दोन्हीही क्रेडिटचेच पर्याय आहेत. 
  • क्रेडिट मुळे खरेदी सोपी होत असते. तुम्ही कर्जाची लवकर परतफेड केली नाही तर त्यावर व्याज जास्त आकारले जाते. तुम्ही परतफेड करू शकणार नाही अशी खरेदी या दोन्ही पद्धतीमधून करू नका.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…

क्रेडीट कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी या ‘४’ गोष्टी करा.. नंतर पश्चाताप होणार नाही…!

Reading Time: 3 minutesक्रेडीट कार्ड ही आता केवळ मिरवण्याची गोष्ट नसून गरजेची वस्तू झालेली आहे.…