१९४२ च्या दुसऱ्या महायुद्धात भारतात पेन्ट्सची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी विदेशी पेंट्स कंपन्यांची चलती होती. भारतीय कंपन्या बोटावर मोजण्याइतक्या होत्या, त्यामध्ये शालिमार पेंट्स नावाची एक देशी कंपनी होती.
या काळात नवीन कंपन्यांची निर्मिती करून बाजारात स्वतःचे स्थान निर्माण करणे अवघड होते. त्यावेळी २६ वर्षाच्या चंपकलाल चोक्सी यांनी पेन्ट्सच्या बाजारात व्यवसायाची पायाभरणी करायला सुरुवात केली. त्यांनी चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील यांच्यासोबत उद्योगाला सुरुवात केली.
मुंबईतील छोट्या गॅरेजमध्ये एशियन पेंट्सची सुरुवात झाली. एशियन पेन्ट्सचा १९५२ मध्ये वार्षिक टर्नओव्हर २३ कोटी होता. त्यानंतर १९६७ साली हीच कंपनी भारतातील आघाडीची कंपनी झाली.
एशियन पेंट्स हा आघाडीचा ब्रँड असून त्याने सर्व भारतीयांना जोडून ठेवलेले आहे. भारतातील पेन्ट्स क्षेत्रातील सर्वात मोठी आणि आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची आघाडीची पेंट्स कंपनी एशियन आहे.
एशियन पेंट्स – मोठे व्यावसायिक साम्राज्य –
- एशियन पेंट्स कंपनीची स्थापना गॅरेजपासून करणे सोपे नव्हतेच, त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष होता.
- एशियन पेन्ट्सने सुरुवातीला मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे लक्ष न देता ग्रामीण भागात व्यवसाय वाढवण्यास प्राधान्य दिले.
- त्यांनी त्यांच्या उद्योगाची पहिली डिलरशिप सांगली आणि सातारा येथे दिली.
- त्यानंतर एशियन पेन्ट्सने ग्रामीण भागातील पेन्ट्सचे मार्केट व्यापून टाकले. मुंबईतील वितरकांनीही एशियन पेन्ट्सशी संपर्क करून साठा करायला सुरुवात केली.
- सध्याच्या घडीला पेंट्सचे मार्केट ६०,००० कोटी रुपयांचे आहे. त्यामध्ये संघटित कंपन्यांचा वाटा सुमारे ७०% आहे.
- एशियन पेंट्स या एकट्या कंपनीचेच ५०% पेक्षा मोठे मार्केट आहे. एकझो नोबल, बर्जर पेंट्स, कंसाई आणि नेरोलॅक या कंपन्यांचे मिळूनही एवढे मार्केट नाही.
- एशियन पेंट्स ही जगातील एकमेव अशी कंपनी आहे की, जीची वृद्धी सहा दशकांपासून २०% पेक्षा जास्त झालेली आहे.
- कंपनीने स्वतःचा ब्रँड मजबूत केला आहे. मार्केटिंग, अपडेटेड टेक्नॉलॉजी आणि मोठी सप्लाय चेन या कंपनीच्या यशामागील गोष्टी आहेत.
- एशियन पेंट्स हा ब्रँड ७५ वर्षांपासून भारतीय मार्केटमध्ये स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. त्यांनी पेंट्स क्षेत्रात स्वतःचे एकमेवाद्वितीय स्थान निर्माण केले.
- एशियन पेंट्स कंपनीच्या उत्पादनांसाठी ५ ते १०% प्रीमियम आकारला जातो. .
नक्की वाचा : एशियन पेंट्स – ८० वर्षांची यशोगाथा
एशियन पेंट्स आणि आंतरराष्ट्रीय व्यापार –
- एशियन पेंट्स हा उद्योग समूह जगभरातील १५ देशांमध्ये कार्यरत आहे. तो विभागानुसार आशिया, मध्य पूर्व, दक्षिण पॅसिफिक आणि आफ्रिका या चार ठिकाणी काम करतो.
- कंपनीचे देशभरात आठ ठिकाणी पेन्ट्सचे उत्पादन कारखाने आहेत. त्या सर्व कारखान्यांमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान आहे.
- एशियन पेंट्स कंपनीची वाढ स्थिर पद्धतीने झाली, त्याच कंपनोंला आता पेंट्स क्षेत्रातील प्रीमियम ब्रँड म्हणूनही ओळखले जाते.
- एशियन पेंट्स कंपनी संशोधनावर जास्त भर देते. कंपनीने नवीन उत्पादने बाजारात आणल्यावर त्यांच्या यशात भर पडत जाते.
- एशियन पेंट्स कंपनीचा जागतिक विस्तार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
आजचे एशियन पेंट्स –
- जगभरात २६ ठिकाणी एशियन पेंटचे कंपनीची कारखाने असून ६५ पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीतर्फे सेवा पुरवली जाते.
- सध्याच्या घडीला १६ देशांमध्ये कंपनी कार्यरत असून त्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इतर देशांचा समावेश होतो.
- भारतामध्ये १,५०,००० पेक्षा जास्त रिटेलर सोबत कंपनी जोडलेली आहे.
- जगातील ९ व्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी एशियन पेंट्स आहे.
- आशियन पेन्ट्सची पुरवठा साखळी आणि मजबूत ब्रँड या गोष्टीमुळे त्यांनी मार्केट मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
एशियन पेन्ट्सची बिझनेस पद्धत आणि वाढ –
- एशियन पेन्ट्सच्या यशस्वी उद्योगाची पद्धत बदलत्या काळानुसार ट्रेंड ओळखून उत्पादनाची रणनीती तयार करणे.
- कंपनी योग्य ग्राहकांना लक्ष करून उत्पादनाची निर्मिती करत असते. त्यांचे मार्केट मधील मूल्यांकन 2,54,125.07 कोटी रुपये आहे.
- एशियन पेंट्स कंपनीची जाहिरातीची पद्धत वेगळ्या वेगळी आहे. १९५४ मध्ये कंपनीने जाहिरात केली तेव्हा हातात पेंटब्रश धरलेला मुलगा त्यात होता आणि त्या जाहिरातीने मध्यमवर्गीय ग्राहकांना प्रमुख लक्ष्य केले होते.
- १९७० चे दशक कंपनीसाठी एक टर्निंग पॉईंट ठरले होते. एशियन पेंट्स कंपनीने तेव्हा ८ कोटी रुपयांचे कॉम्प्युटर खरेदी केले होते.
- एशियन पेंट्स कंपनीने कॉम्प्युटरचा उत्पादनाच्या मागणीचा विस्तार आणि सेवा स्तर वाढवण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर केला.
- एशियन पेंट्स कंपनी व्यवसायात कायमच आघाडीवर होती. सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि उत्पादनाच्या पुरवठा साखळीत सुधारणा करण्याच्या पद्धतीमुळे कंपनीला मोठा फायदा झाला.
- १९८२ मध्ये कंपनीने उत्पादनाच्या विक्री व्यवसायात स्वतःची साखळी पद्धत तयार केली.
- एशियन पेंट्स कंपनी ग्राहकांचा कायमच विचार करत असल्यामुळे त्यांचा ब्रँड मोठा झाला.
नक्की वाचा : जाणून घ्या लोकप्रिय शो शार्क टॅंक इंडिया बद्दल
निष्कर्ष –
एशियन पेंट्स या उद्योगाच्या मागील यशस्वी गोष्टी –
- एशियन पेंट्स कंपनीने पहिल्यापासूनच नवीन पद्धती कामाच्या बाबतीत वापरायला सुरुवात केल्या होत्या. कंपनीने पहिली डिलरशिप सांगली, महाराष्ट्र येथे देऊन ग्राहकांशी छोट्या शहरापासून जोडायला सुरुवात केली होती.
- कंपनीने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १९७० सालापासून गुंतवणुकीला सुरुवात केली होती. त्यांना या पद्धतीचा मोठा फायदा मिळाला.