Reading Time: < 1 minute
- भारतीय स्टेट बँकेची अमृत कलश स्पेशल फिक्सड डीपॉजीट (एफडी) योजना आहे, जिच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर अधिक व्याजदर मिळतो. या योजनेत भाग घेण्याची मुदत नुकतीच संपली होती, पण आता बँकेने ती येत्या 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविली आहे. म्हणजे अजून पाच महिने या योजनेचा गुंतवणूकदारांना लाभ घेता येणार आहे.
- अमृत कलश स्पेशल फिक्सड डीपॉजीट योजनेत 12 एप्रिल 2023 पासून 7.10 टक्के व्याजदर दिला जातो. योजनेत 400 दिवस गुंतवणूक करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत 7.60 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत मुदतीपूर्वी रक्कम काढता येते, पण तसे केल्यास 0.50 ते 1.00 टक्का कमी व्याजदर मिळतो.
- स्टेट बंकेंच्या इतर योजनाचे व्याजदर बदलले असून ते पुढीलप्रमाणे झाले आहेत.
मुदत | सर्वसामान्य नागरिक
(सुधारित दर 27/12/2023 पासून) |
ज्येष्ठ नागरिक
(सुधारित दर 27/12/2023 पासून) |
7 दिवस ते 45 दिवस | 3.5 | 4 |
46 दिवस ते 179 दिवस | 4.75 | 5.25 |
180 दिवस 210 दिवस | 5.75 | 6.25 |
211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी | 6 | 6.5 |
एक वर्ष ते दोन वर्षापेक्षा कमी | 6.8 | 7.3 |
दोन वर्षे ते तीन वर्षापेक्षा कमी | 7 | 7.5 |
तीन वर्ष ते पाच वर्षापेक्षा कमी | 6.75 | 7.25 |
पाच वर्षे ते 10 वर्षे | 6.5 | 7.50 |
- स्टेट बंकेशिवाय इतर काही बँकाही सर्वसामान्य नागरिकांना सध्या (एप्रिल 2024) पाच वर्षाच्या एफडी वर चांगला व्याजदर देत आहेत. त्या अशा
- डीसीबी बँक – 7.40 टक्के
- इंडसंड बँक – 7.25 टक्के
- एस बँक – 7.25 टक्के
- आरबीएल बँक – 7.10 टक्के
नक्की वाचा – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवा
– यमाजी मालकर,
लेखक
Share this article on :