Reading Time: 2 minutes

मागच्या भागात आपण भारतात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगाररचना (Salary Structure) त्यामधील करपात्र घटक व उपलब्ध करसवलती तसेच त्यासाठीच्या मर्यादा, करदायित्व  व कर वाचविण्याच्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात आपण आयकर कायद्यानुसार विविध प्रकारच्या गुंतवणूक अथवा कर्जाचे हप्ते  मिळणाऱ्या करवजावटींची माहिती घेऊया.

आयकर कायद्यामधील  कलम ८० व त्या अंतर्गत मिळणाऱ्या करवजावटीची  माहिती घेऊया. आयकर कायदा, १९६१ मध्ये कर वजावटीसाठी वेगवेगळ्या कलमांची तरतूद केलेली आहे.  तसेच कलम ८०मधील वेगवेगळ्या सबसेक्शन खाली यासंदर्भातील करण्यात आलेल्या करवजावटीच्या तरतूदी.

सेक्शन ८०सी, ८०सीसीसी, ८० सीसीडी (१)- रु. १,५०,०००/- पर्यंत:

  • ट्यूशन फी
  • विमा पॉलिसीचे हप्ते
  • पीपीएफ गुंतवणूक
  • पीएफ मधील कर्मचाऱ्याचा शेअर (योगदान)
  • गृहकर्जाची मुलभूत रक्कम (Principal payment of home loan)
  • सुकन्या ठेव योजनेतील गुंतवणूक
  • बॅंक व पोस्ट ऑफिसमधील एफडी (किमान ५ वर्षांसाठी असल्यास)
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना
  • पीपीएफ / ईपीएफ गुंतवणूक
  • नॅशनल पेंशन स्किम मधील गुंतवणूक
  • एनएसएस (NSS) / युलिप(ULIP)

सेक्शन ८० सीसीडी (२):

  • कंपनीकडून मिळणारे  पीएफ मधील  योगदान (१,५०,०००/- पर्यंत.)

सेक्शन ८० सीसीडी (१बी):

  • एनपीएस मधील रु. ५०,०००/- पर्यंतचे अधीकचे  योगदान. हे किमान मर्यादेपेक्षा (रु. १,५०,०००/- ) जास्त असल्यावरही मिळू शकते.

सेक्शन ८०(जी):

  • विविध प्रकारची डोनेशन्स. यासाठी सेक्शन ८०(जी) नुसार करवजावट मिळते. यासाठी ५०% पासून १००% पर्यंत वजावट मिळते.

सेक्शन ८० (ई):

  • शैक्षणिक कर्जावरील व्याजाच्या हप्त्यावर १००% करवजावट मिळते.

सेक्शन ८० (ईई):

  • गृहकर्जावरील व्याजासाठी रु. ५०,०००/- पर्यंत प्रतिवर्ष करवजावट मिळते.

सेक्शन ८० (डी):

  • आरोग्य विम्यासाठी स्वतःसाठी व कुटुंबासाठी घेतलेल्या विमा पॉलिसीवर करवजावट मिळते.
  • स्वतःसाठी, जोडीदार व मुले यांसाठी रु. २५,०००/- पर्यंत
  • व पालकांसाठी (वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यास ) रु. ३०,००००/- पर्यंत वजावट मिळते.

वरिल तपशिलावरुन कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत हे स्पष्ट होतय. यामधील योग्य पर्यायांचा विचार करुन करनियोजन करता येइल.

    यासाठी काही गुंतवणूकींचे प्रकार, त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा दर, कालावधी, त्यातील जोखीम(Risk) या साऱ्याची माहिती देणारा तक्ता इथे जोडत आहे. हा तक्ता  करनियोजन व पर्यायाने आर्थिक नियोजन करताना खूप मोलाचा ठरु शकेल.

गुंतवणूक जोखीम (Risk) कालावधी व्याजाचा दर(प्रतिवर्ष)
एफडी (FD) नाही ५ वर्षे ७.५०%
राष्ट्रीय बचत योजना (NSC) नाही ५ वर्षे ८.१०%
पीपीएफ(PPF) नाही १५ वर्षे ८.१०%
सुकन्या समृद्धी योजना (SSY) नाही २१ वर्षे ८.६०%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) नाही ५ वर्षे ८.६०%
नॅशनल पेंशन स्किम (NPS) इक्विटी(Equity) संदर्भातील जोखीम निवृत्तीपर्यंत ८% ते १०% अपेक्षित
युलिप (ULIP) इक्विटी(Equity) संदर्भातील जोखीम ५ वर्षे ८% ते १०% अपेक्षित
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (ELSS) इक्विटी(Equity) संदर्भातील जोखीम ३ वर्षे १२% ते १५% अपेक्षित

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2TVluyo)

राष्ट्रीय पेन्शन योजना ,  गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग १,

ELSS की ULIP?गुंतवणुकीचे विविध पर्याय – भाग २

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…