Reading Time: 3 minutes

शेअर मार्केटच्या चक्रव्यूहमधे अडकणारा इंट्राडे ट्रेडर फ्यूचर्स आणि ऑप्शनमधे फायदा होईल या आशेवर व्यवहार करत असतो. पण शिकावू आणि अभ्यास न करता व्यवहार करणारे, मार्केटच्या चढ उतारात आणखीन अडकत जाऊन भरपूर नुकसान करून घेत आहे. 

सेबीच्या एका केस स्टडीनुसार दहापैकी सात इंट्राडे टेडरला इक्विटी कॅश सेगमेंटमधे तोटा सहन करावा लागलाय. यासाठी सेबी काही ठोस पाऊल उचलण्याचा विचारात आहे. SEBI चा हा प्रस्ताव नेमका कशासाठी आहे ? हा प्रस्ताव कोणासाठी उपयुक्त ठरेल? इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्ज बाजारातील खेळ बदलणार का? आजच्या लेखामधून सविस्तर जाणून घेऊया. 

आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत 2022-23 मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 300 टक्क्यांनी वाढली आहे, असे सेबीच्या केस स्टडीमधे  दिसून आले आहे. या तीनशे टक्क्यांनी वाढलेल्या ट्रेडर्सच्या व्यवहारांचा सेबीने वर्ष 2018 ते 2023 या दरम्यान अभ्यास केला. 

माहितीपर : लार्ज कॅप म्युच्युअल फंड पासूनच गुंतवणुकीची सुरुवात का करावी?

या अहवालानुसार काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले जसे की,

  • शेअर मार्केटमध्ये 3:1 या रेशोप्रमाणे इंट्राडे ट्रेडिंग केली जाते. 
  • या तीनशे टक्क्यांनी वाढलेल्या ट्रेडर्सच्या आकडेवारीमधे  तीस वर्षाखालील तरुण पिढीचे प्रमाण अधिक आहे.
  •  या ट्रेडर्स कडून वर्ष 2022-23 मधे जवळपास जो काही तोटा झाला आहे, हा इतर वयोमार्यादा असणाऱ्या लोकांपेक्षा 76% नी जास्त आहे. म्हणजेच आजची तरुण पिढी इन्स्टंट मनी मिळवण्याच्या प्रयत्नात तुलेनेने त्यापेक्षा अधिक पैसे गमवत आहे.
  • आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत 2022-23  मधे इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या तरुणांचे प्रमाण 18 % वरून  48 % वर गेले आहे.
  • इंट्राडे करणाऱ्या या 300% नी वाढलेल्या ट्रेडर्सचे नुकसान होण्याचे प्रमाण 80 % नी वाढले आहे .
  • अर्थातच या सर्व व्यवहार करणाऱ्यांचा फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त आहे. 

यामुळे शेअर मार्केटमधे व्यवहार करणाऱ्या लोकांमधे जागरूकता येणे फार आवश्यक आहे. शेअरबाजारामधे किंवा म्यूचुअल फंडमधे जोखीम असते हे फक्त जाहिरातींमधे दाखवण्यापुरता मर्यादित न राहता त्याचा अर्थ समजणे गरजेचे आहे आणि जोखीम घेतल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे भरून येण्यासारखे नसते.

महत्वाचे : सोलार क्षेत्रातील गुंतवणूक 

 याच्यावर उपाय म्हणून आता सेबीकडून काही महत्वाचे पर्याय समोर ठेवण्यात आले आहे, ते असे

  1. इंडेक्सच्या एक्सपायरीची संख्या कमी करणे
  • सध्या एक महिन्यात इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्जच्या साप्ताहिक एक्सपायरीमुळे निर्देशांक/एक्स्चेंजमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवशी एक एक्सपायरी झाली आहे. 
  • मात्र आता प्रति एक्सचेंज 1 बेंचमार्क निर्देशांकासाठी साप्ताहिक समाप्ती असावी असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे
  1. एक्सपायरीच्या दिवशी करण्यात येणारे कॅलेंडर स्प्रेड रद्द करण्यात यावे .
  • सध्या कॅलेंडर स्प्रेड मार्जिन हे फ्यूचर्स आणि ऑप्शनच्या वेगवेगळ्या एक्सपायरी असलेल्या दोन पोझिशन्ससाठी असून फ्यूचर्स आणि ऑप्शनच्या पोझिशन्ससाठी एक्सपायरीच्या दिवशी लागू होते.
  •  मात्र आता एक्सपायरीच्या दिवशी करण्यात येणारे कॅलेंडर स्प्रेड रद्द करण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  1. अपफ्रंट ऑप्शन प्रीमियम घेणे
  • सध्या केवळ फ्यूचर्समधील पोझिशनसाठी मार्जिन घेतले जाते .
  • मात्र आता ऑप्शनमधे घेतल्या जाणाऱ्या पोझिशनसाठी मार्जिन घेतले जावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  1. करार आकार
  • करार आकार हा 2015 मध्ये 5 ते 10 लाख रुपयासाठी निश्चित केल गेला होता. 
  • मात्र आता कराराचे मूल्य 2 टप्प्यामधे करावे यात टप्पा 1 मधे किमान मूल्य रु 15 – 20 लाख दरम्यान असावे. टप्पा 2 मधे म्हणजे साधारण 6 महिन्यांनंतर , कराराचे मूल्य 20 ते 30 लाख रुपयांचे करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 
  1. एक्सपायरीच्या जवळचे दोन दिवस मार्जिनमध्ये वाढ –
  • एक्सपायरीच्या दिवशी जास्त प्रमाणात व्यवहार केले जातात. वॉल्यूम वाढलेला असतो.
  • यासाठी अतिरिक्त 3 % एक्स्ट्रीम लॉस मार्जिन (ELM) कॉन्ट्रॅक्ट एक्स्पायरीच्या शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीला गोळा करावे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी ELM 5 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​जावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  1. पोझिशन आणि लिमिटवर परीक्षण –
  • स्टॉक एक्स्चेंगेस कडून पोझिशनसाठी आणि लिमिटस् या गोष्टींवर एक्सपायरीच्या दिवशी लक्ष ठेवले जात असे तसेच परीक्षण केले जाता असे. 
  • मात्र आता हे आता इंट्राडे बेसिसवर केले जावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
  1. पर्यायांसाठी स्ट्राइक किमतीचे तर्कसंगतीकरण करणे –
  • म्हणजे सध्याच्या ऑप्शनच्या किमती या चालू मार्केटच्या किमतीच्या जवळपासच्या असतात. नंतर ही रेंज वाढत जाते. सध्या निफ्टीला एकूण 70 ऑप्शन स्ट्राइक आहेत, तर बँक निफ्टीला जवळपास 90 ऑप्शन स्ट्राइक आहेत. 
  • मात्र आता कॉन्ट्रॅक्ट लॉन्च करताना 50 पेक्षा जास्त स्ट्राइक असणार नाहीत असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

यातील कुठले प्रस्ताव मान्य केले जातात हे लवकर सेबी प्रकाशित करेल. सेबीने सुचवलेल्या या मुद्दयापैकी कुठले उपाय मान्य केले जातील आणि याचा ट्रेडर्सवर आणि व्यवहारांवर कसा परिणाम होईल हे कळेल.

 

#इंडेक्स

#कॅलेंडर स्प्रेड मार्जिन

#अपफ्रंट ऑप्शन मार्जिन

#इंट्राडे ट्रेडिंग

#फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग 

#position in f & o

#इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्ज

#SEBI’s proposal & index derivatives market

 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.