Reading Time: 2 minutes

लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या एका केस स्टडीनुसार असं म्हंटलं आहे, की भारतामधे असणाऱ्या लोकसंख्येच्या अर्धे (49.4 %) देखील लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाहीत ! यात तरुण पिढीचं प्रमाण अधिक आहे. 

हे प्रमाण अलीकडच्या काही वर्षात झपाट्यानं वाढलं आहे आणि वाढत आहे. यामुळे शारीरिक व्याधींना आयतं निमंत्रण मिळत आहे. काय आहे या केस स्टडीचे निष्कर्ष हे पाहू,

  • मागच्या फक्त 22 वर्षात शारीरिक निष्क्रियतेचं हे प्रमाण 20% वरून 49% वर गेले आहे !
  • निष्क्रियतेबद्दल महिला आणि पुरुष यांचा विचार केला, तर पुरूषांचे प्रमाण 42 % तर महिलांचे प्रमाण 57% आहे. हे तुलनेनं अधिक आहे

1. शारीरिक निष्क्रियतेमुळे येणाऱ्या समस्या : 

  • वरचे निष्कर्ष वाचले तर लक्षात येईल की माणसांचं शारीरिक हालचालीचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. “ Health is Wealth ” म्हणताना ही वेल्थ कमावण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्यात येत नाही असं दिसून येतं. 
  • आरोग्याच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या होऊ शकते; कारण यामुळे शारीरिक व्याधी वाढायला मदतच होणार आहे. लठ्ठपणा आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार, शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉईड असे मागे लागणारे इतर आजार वाढीस लागताहेत.

2.यामागची कारणं नक्की काय आहेत ?

  • नोकरीचा प्रकार किंवा पद्धत हे सगळ्यात मोठं कारण म्हणता येईल. बैठे काम , तासन् तास कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून राहणं  हे प्रकार वाढत आहे. यामुळे शारीरिक हालचाल कमी होणं, एकाच प्रकारचे काम असल्यामुळे एकाच विशिष्ट स्थितिमधे बसून राहिल्यामुळे मणक्याचे,पाठीचे त्रास वाढले आहेत. 
  • मात्र नोकरी हे दुय्यम कारण आहे असे म्हणता येईल का ? कारण व्यायामासाठी कष्ट न घेणे , व्यायामाचा कंटाळा येणं , व्यायामासाठी वेळ न काढता येणं किंवा वेळ असून आळशीपणा करणं हे काही प्राथमिक कारणं असू शकतात.
  • मेट्रो सिटीमधे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा वेळ अधिक असल्यामुळे बराच वेळ हा ट्रॅव्हलिंग करण्यात जातो यामुळे व्यायामाच्या गणिताच समीकरण जुळणं अवघड वाटत असावं. 
  • लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणं ही देखील आवश्यक गोष्ट आहे. 
  • व्यायाम आणि त्याचे फायदे हे आत्म-जागरूकतेमधे मोडल जाईल असे वाटते म्हणजे काही गोष्टी इतरांनी कितीही सांगितल्या तरी जोपर्यंत स्वत: उठून आपण ते करणार नाही तोपर्यंत बदल अशक्य असतो. (वाहतुकीचे नियम पाळणं हे देखील यातलं उत्तम उदाहरण असू शकतं. )

3.WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या संशोधनानुसार  काही आकडेवारी: 

  • वर म्हटल्याप्रमाणे भारतामधे निष्क्रियतेचे प्रमाण हे 49.4% आहे, तर पाकिस्तान या देशाची  निष्क्रियतेची आकडेवारी 45.7 %  इतकी आहे. 
  • सर्वात कमी निष्क्रियतेचे प्रमाण पाहिल्यास निष्क्रियतेचे प्रमाण भूतानमधे 9.9% आहे, तर त्याहीपेक्षा कमी म्हणजे नेपाळमध्ये निष्क्रियतेचे प्रमाण 8.2% इतके आहे. 
  • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने संशोधनामधे अंदाज व्यक्त केला आहे की ,हे असेच सुरू राहिल्यास वर्ष 2030 पर्यंत भारताचे निष्क्रियतेचे प्रमाण 59.9 % पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

4. यावर उपाय काय ?

  • भारताला अगदी प्राचीन काळापासून भारतीय व्यायाम, योग- साधना, युद्ध कला याची जोड आहे.
  • भारतामधे व्यायाम हा फक्त शारीरिक गोष्टींशी जोडला जात नसून तो मानसिक आणि अध्यात्मिक या गोष्टींशी देखील जोडला गेला आहे. 
  • भारतातील योगविद्येने तर जगाला देखील भुरळ पाडली आहे. सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, अष्टांग योग साधना, प्राणायाम, ध्यान या सर्व गोष्टी पुन्हा एकदा नव्याने आंगीकरणे ही प्रत्येकाची वैयक्तिक गरज आहे. 
  • आयुर्वेदाच्या या भारत भूमीमध्ये आहार, झोप , व्यायाम या गोष्टीना प्राचीन काळापासून महत्त्व होते आणि ते कायम राहील. 
  • बदलत्या जीवनशैलीसोबत भारताची संस्कृती आणि विचारसरणी  आत्मसात केल्यास  वर म्हटल्याप्रमाणे  येणाऱ्या समस्येला नक्कीच तोंड देणे सहज आणि सोपे होईल.

  #सूर्यनमस्कार

#चंद्र नमस्कार

#अष्टांग योग साधना, #प्राणायाम, #ध्यान ,#वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.