Reading Time: 2 minutes

देशाच्या पायाभूत सुविधा भक्कम आणि मजबूत असणं आवश्यक असतं. पायाभूत सुविधा आणि देशाचा सर्वांगीण विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालत असतात असंच म्हणावं लागेल. 

पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, रेल्वे, व्यवसाय, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, चलन व्यवस्था आणि एकूणच प्रादेशिक व्यवस्था यांचा समावेश असतो. देशामधल्या नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घेऊन स्वतःची आणि आपल्या परिसराची, समाजाची प्रगती करत राहिल्याने सहाजिकच पर्यायाने देशाची उन्नती होणं स्वाभाविक आहे. 

  1. पायाभूत सुविधांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो?

शिक्षण:

  • शिक्षण हे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद देतं. माहितीसंग्रह वाढल्याने आणि विचारांची देवाण-घेवाण वाढल्याने, एकाच वर्तुळात गोल-गोल फिरत राहण्यापेक्षा वर्तुळाच्या बाहेर जाऊन नवीन शिकण्याची संधी शिक्षणामुळे मिळते.
  • शिक्षण म्हणजे रोजगारनिर्मितीसाठीची मूलभूत गरज आहे.

रोजगार निर्मिती: 

  • देशाची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर देशामध्ये रोजगार निर्मिती होत राहणं गरजेचं आहे . कारण त्यातून नागरिकांची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. 
  • पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर रोजगार निर्मिती शक्य होत नाही. यामुळे पायाभूत सुविधांना चालना मिळत राहणं आणि त्यामुळे रोजगार निर्मिती होत राहणं आवश्यक आहे.
  • याच्या दुसऱ्या बाजूचा विचार केला तर पायाभूत सुविधांसाठीसुद्धा रोजगारांची आवश्यकता आहेच !
  • रोजगार निर्मितीमुळे वैयक्तिक आर्थिक परिस्थिती सुधारते, ज्यामुळे लोकांचे राहणीमान-जीवनमान  बदलतं, विचार बदलतात, अधिक चांगल्या स्तरावर काम करण्याची प्रेरणा मिळते.

माहितीपर : एनपीएस वात्सल्य योजना 

उद्योग – व्यवसायात वाढ:

  • देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक म्हणजेच उद्योग-व्यवसाय आहे. 
  • देशामधे विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय जेवढ्या जास्त प्रमाणात निर्माण होतील आणि वाढतील, तेवढ्या जास्त प्रमाणात उत्पादनशिलता वाढते.
  • शेती आणि उत्पादनशिलता हे समीकरण म्हणजे पायाभूत सुविधांचे मुख्य स्त्रोत आहे.
  • एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि दुसऱ्या शहरातून इतर राज्यात असे करत विविध उद्योग- व्यवसाय आणि शेतीमाल राज्यात आणि अर्थातच देशाच्या बाहेर नेण्याचे काम पायाभूत सुविधांमुळे पूर्णत्वाला पोहोचू शकते. ज्यामुळे उद्योग-व्यवसायांची वाढ होत राहून देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागण्याचे महत्त्वाचे काम होऊ शकते.

रस्ते-रेल्वे-वाहतूक मार्ग: 

  • देशाच्या अर्थव्यवस्थेवर अजून एक महत्त्वाचा घटक परिणामकारक ठरतो तो म्हणजे रस्ते आणि वाहतूक मार्ग. 
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं जितकं सोप्प आणि सहज शक्य असेल, तितकाच वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल. उद्योग-व्यवसायांचे जाळे एका शहरातून दुसऱ्या शहरात पसरताना, वाहतूक मार्ग अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मालाची ने-आण करणं किंवा प्रवासी वाहतूक असो, व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून रस्ते रेल्वे वाहतूक मार्ग यामधे सुधारणा होणं, खूप आवशक्य आहे. 
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय वाढल्यामुळे परकीय चलनाची देवाण-घेवाण ही वाढते.

वाचावे असे : बचतीचे महत्व 

 चलनवाढीस चालना:

  •  सुधारित वाहतूक मार्ग, नवीन वाहतूक मार्ग निर्माण करणं आणि पर्यायानं शहरातील, राज्यातील अंतर कमी करणं याचा थेट संबंध चलनवाढीला चालना देण्यासाठी होतो. 
  • एका राज्यातील व्यावसायिक माल किंवा शेतीसंबंधी माल दुसऱ्या राज्यात ने-आण करण्यासाठी जेव्हा रस्ते रेल्वे वाहतूक मार्गाचा उपयोग केला जातो तेव्हा साहजिकच चलन वाढीला आणि सोबतच महामार्ग विकासाला चालना मिळते.
  • पर्यटन हा चलन वाढीसाठी उत्तम स्त्रोत मानला गेलाय. पर्यटन विकासामुळे शहर आणि देशाच्या विकासाचे अनेक दरवाजे उघडले जातात. दोन देशांमधली संस्कृती, खाण-पाण, राहणीमान, कपडे , विविध कला यांच्यामधली विविधता ही नेहमीच आकर्षणाची गोष्ट असते. लोकांना एकमेकांना जाणून घेण्याची आणि एकूणच संस्कृती माहीत करून घेण्याची इच्छा असते. यामुळे पर्यटन वाढते. आणि याच गोष्टीमुळे चलन वाढीला दिशा मिळत असते.

भारत सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून अनेक बदल घडवून आणले त्यामुळे पायाभूत सुविधांचे क्षेत्र जलद गतीने वाढत आहे. रस्ते, महामार्ग विकासकामं, शहरतल्या मेट्रो, नवीन एनर्जी प्लांट, रिन्यूएबल एनर्जी प्लांट यामुळे या पायाभूत सुविधांच्या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांची गुंतवणुकीकडे ओढा वाढत आहे. 

इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामधील काही कंपनी, त्यांचे मार्केटमधील भांडवल तसेच त्यांनी पाच वर्षांत दिलेला परतावा खाली तक्त्यात दिला आहे. 

(सदर माहिती इंटरनेटवरून घेण्यात आलेली आहे, तसेच खालील कंपन्यांमधे कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला वेबसाईटद्वारे देण्यात आलेला नाही.)

Stock Name NSE/BSE Market Cap (Rs. Lakh Cr) P/E Ratio 5 Years Returns (%)
Larsen & Toubro 5.1 42.56 180
GMR Airports Inf 0.48 423.92
IRB Infra.Devl. 0.37 74.52 326.21
Ircon Intl. 0.23 26.08 538.23

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesआरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutesआजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutesआजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.