६० वर्षीय श्री. शांताराम एका कापड मिलचे कामगार होते. गेली ४० वर्ष एकाच ठिकाणी ते काम करत होते. तंत्रज्ञानाच्या वापरातील हुशारी आणि अद्ययावत कौशल्याच्या जोरावर ५ हजारापासून सुरु झालेला त्यांचा पगार ५५ हजारापर्यंत पोहोचला. दरम्यान कालावधीत छोटंसं घर, दोनचाकी गाडी, दोन मुलींची शिक्षणं आणि लग्न असं सगळ्या केल्या मुळे त्यांना बचत करायची फारशी संधी मिळाली नाही.
आयुष्यातला शेवटचा मोठा खर्च म्हणून पाच वर्षांपूर्वी गावाबाहेर रम्य ठिकाणी त्यांनी एक घर विकत घेतलं. निवृत्ती नंतरच उरलेलं आयुष्य या घरात काढूया असा त्यांनी ठरवलं आणि इथून खरी कथा सुरु झाली.
- श्री. शांताराम यांचे एक जावई बँकेत असल्यामुळे यासाठी त्यांनी गृहकर्ज घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांची गृहकर्जासाठी ४० लाख रुपये घेतले. आणि काही सेवानिवृत्ती निधी आणि काही बचत अशी वृद्धापकाळाची सोय करून ठेवली.
- आतापर्यंत ते सर्व हप्त्यांची वेळच्या वेळी परतफेड करत होते. काही कारणांनी एक जास्तीची खोली बांधण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. आणि यासाठी त्यांना वाढीव निधीची गरज भासली.
- आता अजून ५ लाखाचा खर्च त्यांची बचतीमधील रक्कम संपवणार होता. तर बँकेकडून अजून एखादे कर्ज त्यांच्यावर महिन्याचा आर्थिक ताण वाढवणार होता. शिवाय ते उतरत्या वयात असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा चिंतेचा विषय होता.
- ४-५ वर्षात सेवा निवृत्त झाल्यावर कर्जाचे हप्ते फेडणार कसे? महिन्याचा खर्च भागवणार कसा? आर्थिक अडचणी मध्ये कुठून खर्च करावा? अशा सगळ्या विचारात ते असताना त्यांच्या जावयाने त्यांना एक सुवर्णमध्य सुचवला.
- नवीन वैयक्तिक कर्जा एवजी ” आपण टॉप-अप कर्जासाठी का अर्ज करत नाही? ”असे विचारले. हे कर्ज तुमच्यावर अजून एका कर्जाचा भर न बनता कमी व्याजदरात तुम्हाला जास्त लाभदायक आहे आणि या मुळे तुमचे आर्थिक नियोजनही बिघडणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
- बँकेचे जे ग्राहक नियमित आणि पद्धतशीर कर्जाची परतफेड करतात, ज्यांचा सर्व आर्थिक व्यवहारांचा इतिहास स्पष्ट आहे, त्यांच्यासाठी खास फायदा म्हणून हे कर्ज घेण्याची मुभा त्यांना देण्यात येते. आणि विशेष बाब म्हणजे तुम्ही कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकता शिवाय तुम्ही कशासाठी हे कर्ज घेत आहात हेही बँकेला सांगयची गरज नाही.
- गृहकार्जासाठी तुम्ही आधीच तारण ठेवल्याने अजून काही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही.
- तुम्ही बँकेचे विश्वासू ग्राहक म्हणून तुम्हाला बँक मोबदला म्हणून फारशी प्रक्रिया न करता टॉप-अप कर्ज देऊ शकते. पण या बद्दल फारशी जागरूकता नसल्यामुळे याचा कडे दुर्लक्ष झाले आहे.
- बरेचदा घर बांधताना वाढीव निधीची गरज भासते. मग ती एखादी जास्तीची खोली बांधायची असो, घरात फर्निचर करायचे असेल किंवा पीओपी वा तत्सम घरासंबधीचा खर्च शेपटासारखा लांबतच जातो. एवढंच काय तर, गृहकर्ज डोक्यावर असताना शिक्षण, आरोग्य, किंवा काहीही भलत्या कारणाने अचनक मोठ्या रकमेची गरज भासू शकते.
- या वाढीव खर्चामुळे येणाऱ्या आर्थिक ताणामुळे तुमच्या रोजच्या नियोजनाला धक्का लाऊ नये म्हणून तुम्ही कर्ज घेणे योग्य असते. पण आपले नेहमीचे कर्ज अशा वेळी फायद्याचं ठरणार नाही. याउलट टॉप-अप कर्ज हा एक उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहे, हे विसरू नका.
- पण श्री. शांताराम यांच्यासाठी हे नवीन असल्याने याचे उदाहरण देऊन समजून सांगण्याची विनंती केली. तेव्हा पुढील तक्त्याच्या आधारे टॉप-अप कर्ज तुम्हाला नेहमीच्या कर्जापेक्षा जास्त फायदेशीर कसे ठरेल? हे पटवून दिले.
टॉप-अप कर्ज | वैयक्तिक कर्ज | |
कर्जाऊ रक्कम | ५ लाख | ५ लाख |
व्याजदर | कमाल ९.२५% | किमान ११.२५% |
कालावधी | ५ वर्ष | ५ वर्ष |
ईयमआय | १०,४४० | १०,९३४ |
भरावे लागणारे एकूण व्याज | १,२६,३९६ | १,५६,०२० |
- वरील तक्त्यानुसार श्री शांताराम टॉप-अप कर्जामुळे २०,००० रुपये वाचवू शकतील. पण वैयक्तिक कर्जाचा व्याजदर याहीपेक्षा जास्त असू शकतो. तेव्हा जास्त रक्कम पाकिटातून जाण्याची शक्य आहे.
- याशिवाय तुम्ही बँकेचे आधीचे ग्राहक असल्याने कर्जाची प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागत नाही. अगदीच थोड्या कागदपत्रांची आधारे तुमचे कर्ज मंजूर होते. श्री शांताराम नियमित कर्जाची परतफेड करत असल्याने, हे कर्ज मंजूर व्हायला काहीही हरकत नव्हती.
श्री शांताराम यांना ही योजना पटली. या हिशोबाने त्यांनी ५ लाखा ऐवजी २० लाख रुपये रक्कम कर्जाऊ घेण्याचा निर्णय घेतला आणि एका खोली बरोबरच दुकानाचा गाळा ही बांधून तिथे छोटंसं उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला.
एका प्रकारे उद्योगाच्या भांडवलासाठी देखील त्यांना गृहकर्जाचा फायदा घेता आला आणि उद्योगातून मिळणाऱ्या नफ्याच्या जोरावर त्यांनी गृहकर्ज आणि वाढीव कर्ज दोन्हीची भरपाई केली. त्याच बरोबर त्यांच्या बचतीच्या रकमेला किंवा सेवानिवृत्तीसाठी राखीव ठेवलेल्या निधीला धक्का न लावता त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या. अशाप्रकारे त्यांना टॉप-अप कर्ज फायदेशीर ठरले.
कर्जमुक्त कसे व्हावे – भाग १
कर्जमुक्त कसे व्हावे – भाग २
कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे
पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १
Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.