Brand
आजकाल ब्रँडचा (Brand) जमाना आहे. ब्रँडेड कपडे, वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले आहे. या वस्तू वापरणारे म्हणजे श्रीमंत, सुखवस्तू घरातले असे समजले जाते. पण आता या वस्तू सर्रास सगळीकडे बरेच जण वापरताना दिसतात.
Brand: ब्रँड म्हणजे काय?
- ब्रँड म्हणजे वस्तूचा उत्तम दर्जा, वस्तूची गुणवत्ता व त्याबद्दल ग्राहकांच्या मनात असणारा विश्वास. आणि हा विश्वास निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात त्या ब्रँडचा असणारा नावलौकिक!
- असे अनेक ब्रँड आहेत ज्यांनी ग्राहकांच्या मनात विश्वास, समाधान व गुणवत्ता याची प्रतिमा निर्माण केली आहे व एक ट्रेडमार्क निर्माण केला आहे.
- कपड्यांपासून ते कॉस्मेटिकपर्यंत आणि अगदी मोबाइलपासून कारपर्यंत प्रत्येक गोष्टीत ब्रँड बघितला जातो. ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याकडेच लोकांचा कल असतो.
- घरगुती वापराच्या गोष्टींमध्येही काल परवापर्यंत अप्लायन्सेस किंवा हॉल बेडरूमपर्यंत सीमित असणाऱ्या ब्रँडचा दबदबा किचनमधल्या तेल, मीठ, मसाले, साखर, इत्यादीपासून पार अगदी बाथरूम क्लिनरपर्यंत असणाऱ्या आवश्यक घटकांपर्यंत पोचला आहे.
- निव्वळ स्टेट्स किंवा विश्वासार्हता म्हणून नव्हे तर, वर्षानुवर्षे वापरत असलेल्या एखाद्या ब्रँडशी अनेकदा भावनिक नातेही तयार होते. उदा. आजी किंवा आई अमुक ब्रँडच्या तेलाला किंवा मिठाईला पसंती देत असतील तर, नकळतपणे पुढच्या पिढीचे त्या ब्रँडशी नाते तयार होते.
- प्रत्येक खरेदी ही गरज म्हणून केली जात नाही. अनेकदा आवड म्हणून आपण बऱ्याच गोष्टी खरेदी असतो. त्यावेळी ब्रँडचा सर्वात जास्त विचार केला जातो. कारण त्या वस्तू घेण्यामागे आपल्या भावना असतात, आपली गरज नाही.
- सगळेच ब्रँड हा दावा करतात की त्यांनी वस्तूची उच्च पातळीची तपासणी केली आहे. आपली बाजारातील पत किंवा नावलैकिक टिकविण्यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या ब्रँडच्या दर्जाकडे विशेष लक्ष देत असते. त्यामुळे ब्रँड म्हणजे संबंधित वस्तूंबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असणारी खात्री!
- पु.ना.गाडगीळ, वामन हरी पेठे ज्वेलर्स यासारख्या व्यक्तींनी उत्तम दर्जा व ग्राहक सेवा यामुळे दागिन्यांच्या व्यवसायातही चांगला जम बसविला आहे. आजच्या घडीला लोक यांच्या दागिन्यांकडे ब्रँड म्हणून बघतात.
- अगदी शालेय जीवनापासून ब्रँड या शब्दाने आपल्या मनावर कब्जा केलेला असतो. पूर्वी रेनॉल्ड, सेलो यासारखी पेन्स, नटराज, अप्सरा यासारख्या पेन्सिल, कॅमलचा कंपासबॉक्स आणि नवनीतच्या वह्या किंवा गाईड यासारख्या ब्रॅंड्सना विद्यार्थी जीवनात अनन्यसाधारण महत्व होते.
हे नक्की वाचा: तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?
लोक ब्रँडेड वस्तु का खरेदी करतात?
१. गुणवत्ता व समाधान
- लोक ब्रँड व त्याची गुणवत्ता या गोष्टींना प्राधान्य देतात. यासाठी ते पूर्वीच्या ग्राहकांचा अनुभव व त्यातून त्यांना मिळणारे समाधान बघतात.
- नामांकित प्रयोगशाळेतून केलेली चाचणी, सेलिब्रेटी व्यक्तींना घेऊन केलेल्या आकर्षक जाहिराती, सेल्स सर्व्हिस नेटवर्क, वस्तू खरेदी करताना मिळणारा तज्ञांचे (सेल्स पर्सन) मार्गदर्शन, खरेदी केल्यानंतर मिळणारी वॉरंटी आणि सर्व्हिस शिवाय सणासुदीला मिळणाऱ्या अनेक ऑफर्स अशा अनेक कारणांमुळे ग्राहक ब्रॅण्डकडे आकर्षित होतो.
- आपण एखादा ब्रँड वापरत असाल आणि त्याने आपल्याला आरामदायी, आनंदी आणि समाधानी असल्याचा अनुभव येत असेल, तर ती व्यक्ती तोच ब्रँड नेहमी वापरते व त्यावर विशास ठेवते.
२. सामाजिक प्रतिष्ठा:-
- आजकाल लोक समाजात तुम्ही कोणता फोन वापरता, कुठल्या ब्रँडचे कपडे घालता, कुठल्या ब्रँडचे शुज वापरता याकडे अधिक लक्ष देतात. कारण त्यामुळे सामाजिक पत म्हणजेच स्टेट्स वाढते.
- काही वस्तूंचा विचार जरी केला तरी चटकन नामवंत ब्रँड्सची नावे नजरेसमोर येतात. उदा. अंडरगारमेंट्स म्हटले की जॉकी; जीन्स म्हटलं की लेविस, न्यूपोर्ट; कॉस्मॅटिक म्हणजे लोटस, गार्निअर, रेवलॉन, लॅक्मे, मेंबेलीन; फोन म्हटलं की ॲपल, सॅमसंग; अप्लायन्सेस म्हटलं की सोनी, सॅमसंग, एलजी इत्यादी ब्रँड्सची नावं चटकन डोळ्यासमोर येतात.
3. सर्व्हिस:-
- नामवंत ब्रँडच्या वस्तू घेतल्यावर मिळणारी सर्व्हिस, प्रत्येक छोट्या मोठ्या शहरासाठी उपलब्ध असणारे कस्टमर केअर सेंटर, वॉरंटी यासारख्या अनेक कारणांमुळे ब्रँडेड वस्तुंना पसंती दिली जाते.
- “सस्ता लो बार बार, महेंगा लो एक बार!” आपण एखादी वस्तू खरेदी करताना त्याचे मूल्य बघतो, पण जर जास्त मूल्य देऊन ती वस्तू जास्त काळ टिकणारी असेल आणि खरेदीनंतर चांगली “पोस्ट सेल्स सर्व्हिस” मिळणार असेल, तर आपण किंमतीतला फरक न बघता उत्तम ब्रँडच निवडतो.
बिसलेरी, निर्लेप गिट्स काही ब्रँड्सची लोकप्रियता एवढी जास्त आहे की लोकं वस्तुंना या ब्रँड्सच्या नावाने ओळखतात. उदा. मिनरल वॉटर म्हटलं की बिसलरी, नॉनस्टिक कुकवेअर म्हणजे निर्लेप, वॉटर प्युरिफायर म्हटलं की ॲक्वागार्ड, इन्स्टंट मिक्स म्हणजे गुलाबजाम, दिवाळी म्हटलं की मोती साबण अशी अनेक उदाहरणे देता येतील.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Brand in Marathi, Brand mhanje kay, Brand Marathi Mahiti