करिअरचे १५ आधुनिक पर्याय
भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ७ पर्यायांची माहिती घेतली. (वाचा: भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग १). या भागात उर्वरित ८ पर्यायांची माहिती घेऊया.
प्रत्येकाला आयुष्यात आता पुढे काय करायच? या प्रश्नाला सामोरे जावे लागतो. करिअर मार्गदर्शन या नावाखाली होणारे अनेक कार्यक्रम संभ्रम अजुनच वाढतात. सध्या“पारंपरिक प्रसिद्ध” पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
करिअरचे १५ आधुनिक पर्याय
८. लेखन –
- जर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे लेखन करण्याची कला अवगत असेल, तर कविता, लघुकथा, ब्लॉगिंग, लेख-लेखन हे क्षेत्र करिअर म्हणून निवडून पूर्ण वेळ काम करू शकता.
- लिहीणे हे संवादाचे अविभाज्य माध्यम आहे. कारण या डिजिटल युगात अनेक क्षेत्रातील माहिती लोकांपर्यंत ऑनलाइन पोचवण्यासाठी लेख किंवा ब्लॉग्सचा आधार घेतला जातो. सॉफ्टवेअर क्षेत्र , शैक्षणिक क्षेत्र किंवा दैनंदिन जीवनातील कोण्त्याही क्षेत्रात ब्लॉग्स लिहीण्याचे पर्याय उपलब्ध असतात.
९. पशुवैद्यक –
- पशुवैद्यक म्हणजे सर्व पाळीव प्राणी, प्रयोगशाळेत असणारे प्राणी यांच्यावर उपचार करणारे प्रशिक्षित प्राण्याचे डॉक्टर्स.
- आजकाल प्रत्येक जिल्ह्यांमध्ये विशेष पशुवैद्यकीय विभाग नेमलेले असतात. यांच महत्त्व व तेवढंच आहे कारण असंख्य नि:शब्द आणि निष्पाप जीवांवर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं, प्रसंगी शस्त्रक्रिया ही करावी लागते.
- प्राण्याच्या प्रत्येक प्रजातीचं निरोगी आरोग्य राखणं व संवर्धन करणं ही कामे पशुवैद्यकीय विभागात न थकता केली जातात. सार्वजनिक आरोग्य, अन्न व सुरक्षा विभाग, पर्यावरण संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात हे पशुवैद्यकीय तज्ञ लोक जबाबदारीने काम पाहतात.
या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे
१०. केबिन क्यू –
- हॉस्पिटॅलिटी या क्षेत्राचे ग्लॅमर पाहून प्रत्येकालाच याचे आकर्षण वाटते. अर्थात हे क्षेत्र आकर्षक आहेच.
- प्रवासाची आवड व उत्साह असणाऱ्या व्यक्ती या पर्यायाचा विचार करिअर म्हणून करू शकतात. विशेषतः विमान प्रवासाची उत्सुकता आणि आवड असणाऱ्या व्यक्ती. अशा व्यक्तींनी ‘केबिन क्रू’ची सदस्य होऊन एअरलाइन्स मध्ये सामील व्हावे. यासाठी बराच वेळ काम करण्याची क्षमता, संवाद कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व या गोष्टी असणे आवश्यक आहे.
- १० वी व १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेत प्रविण असायला हवे. या नंतर एअर हॉस्टेसचा कोर्स करता येतो. यासाठी मात्र वयाची अट आहे. वय वर्षे १७ ते वय वर्षे २८ पर्यंत या क्षेत्रात उडी घेता येते.
११. पॅरामेडिक / ईएमटी –
- सर्वोत्तम करिअरच्या यादीतील महत्वपूर्ण पर्याय म्हणजे पॅरामेडिक्स. पूर, महापूर, भुकंप अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये तात्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम पॅरामेडिक्स किंवा ईएमटी विभागाची लोक पाहतात. एखाद्या अनपेक्षित घटनेमध्ये ही तातडीची वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम यांच्यामार्फत केलं जातं.
- पॅरामेडिक हे एक उच्च प्रशिक्षित वैद्यकीय तंत्रज्ञ आहेत. आपत्कालीन भागात असलेल्या नामांकित असलेल्या रुग्णालयातील उपकरणे आणि औषधे यांच्या मदतीने डॉक्टरांची सर्व कर्तव्ये ते पार पाडतात.तात्काळ फोन ला प्रतिसाद देऊन ते गंभीर रूग्णांना वेळेवर रूग्णालयात दा़खल करतात, व त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदत करतात.
तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…
१२. फोटोग्राफी (छायाचित्रण) –
- फोटोग्राफर किंवा छायाचित्रकार म्हणून काम करण्यासाठी करिअरच्या ब-याच संधी उपलब्ध आहेत.
- यामध्ये लँडस्केप फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी फोटोग्राफी, आर्किटेक्चरल फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, कॅन्डिड फोटोग्राफी, वाइल्डलाइफ फोटोग्राफी असे काही प्रकार येतात.
- निश्चितच हे क्षेत्र नाविन्यपूर्ण आणि विशाल आहे. काही उत्कृष्ट ऑफर्समुळे तुम्ही इथे पूर्ण वेळ काम करू शकता. तसेच छायाचित्रकार म्हणून स्वतंत्र व्यवसाय देखील करू शकतात. शेवटी ‘एक चित्र हजार शब्द रंगवते ‘ हे लक्षात घ्यायला हवं.
१३. साऊंड इंजिनिअरिंग (ध्वनी तंत्रज्ञान) –
- जर आपल्याला संगीत ऐकण्यात आनंद वाटत असेल तर या क्षेत्राचाही करिअर म्हणून विचार केला जाऊ शकतो.
- ध्वनी तंत्रज्ञ, ऑडिओ इंजिनिअर, संगीत मिक्श्चर अशा काही पदांसाठी या विभागात संधी मिळू शकते.
- संगीत वाजवण्यासाठी वापरण्यात येणारी काही किचकट उपकरणे ही हाताळायला यायला हवी. संगीत अधिक प्रभावी स्वरूपात ऐकण्यासाठी ध्वनी प्रभाव निर्माण करणे गरजेचे असते.
या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य
१४ क्रीडा क्षेत्र –
- पारंपारिक उच्चशिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर. ते दिवस आता राहिले नाहीत. हल्लीचा पालकवर्ग आपल्या पाल्याच्या कला-गुणांविषयी सजग असतो.
- पाल्य जर उत्तम खेळाडू असेल तर निश्चितच क्रीडा क्षेत्राचे विचार करिअर म्हणून करायला हवा. उच्च शिक्षणातील ॲथलेटिक्सचा दर १५℅ पर्यंत उंचावला आहे
- या मूळ खेळ या विषयाकडे सकारात्मक पाहण्याचे प्रमाण पालक वर्गामध्ये वाढलेले आहे. या क्षेत्रात उत्तम खेळाडू, प्रशिक्षक किंवा शिक्षक म्हणून काम मिळू शकते. सरकारी क्षेत्रात ही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
१५. पर्यावरणवादी (पर्यावरण प्रिय व्यक्ती) –
- खरंतर पर्यावरण हा व्यवसाय नसून सुरूवातीला तो विषय एक भारतीय नागरिक म्हणून पाहता आला पाहिजे. मोदी सरकारने राबवलेली ‘स्वच्छ भारत’ योजना असो किंवा गंगाशुद्धीकरण प्रकल्प या सगळ्या गोष्टी पर्यावरणवादी लोकांनी लक्षात घ्यायला हव्या.
- सध्या पर्यावरणाच्या होत असलेल्या -हासामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’ आणि हवामानात होणारा अनिश्चित बदल यागोष्टींचा सामना आपल्या सर्वांना च करावा लागत आहे. हे विषय संपूर्ण जगाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
- या व्यवसायात उतरणारे लोक पर्यावरण प्रिय असून ते पर्यावरणाचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करतात. पुढील दोन वर्षांत पर्यावरणवादी व्यावसायिकांची मागणी ११℅ ने वाढण्याची शक्यता आहे.
विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २
थोडक्यात सांगायचं तर पारंपरिक पर्याय करिअर म्हणून निवडण्यापेक्षा वर दिलेल्या पर्यायांचा विचार करून आपण आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर व यशस्वी बनवू शकतो.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies