Reading Time: 4 minutes

सध्याचं धावतं जग पाहता,गेल्या काही दशकात बरेच बदल झालेले दिसतात, तंत्रज्ञानामध्ये झालेली वेगवान प्रगती आणि इंटरनेटच्या माध्यमातून अनेक संभाव्य पर्याय उपलब्ध झाले आहेत, औपचारिक शिक्षणाची तेवढी गरज राहिली नाही. तरीही या पर्यायांमधून बरीच कमाई होऊ शकते. पण त्यासाठी लागणारं विशेष कौशल्य असणं आवश्यक आहे. 

सामान्यतः प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक वेळ येते जेव्हा आता पुढे काय करायच? असा प्रश्न स्वत:ला विचारावा लागतो. हल्ली करिअर मार्गदर्शन या नावाखाली अनेक कार्यक्रम होतात. १० वी १२ वी करून बाहेर पडलेली मुले अशा कार्यक्रमांना भरपूर फी भरून हजेरी लावतात. तिथे अनेक पर्याय सांगितले जातात, तेव्हा त्यांचा संभ्रम अजुनच वाढतो. 

साधारण दशकापूर्वी परिस्थिती वेगळी होती, संधी कमी असल्या तरी पात्र असणा-यांची संख्याही जेमतेमच असायची. मग कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा सरकारी नोकरी पत्करणे असे पर्याय निवडून अगदी यशस्वी आयुष्य जगू शकत असे. पण “पारंपरिक प्रसिद्ध”  पर्यायांशिवाय अनेक ऊत्तम करियर पर्याय सध्या उपलब्ध आहेत.  

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

१. मोबाइल ॲप्लिकेशन डेव्हलपर

  • नवनवीन येणा-या स्मार्टफोन्स सोबतच नवीन मोबाइल ॲप्लिकेशनची मागणी सुद्धा अधिक प्रमाणात वाढलेली दिसून येते. 
  • माहिती तंत्रज्ञान किंवा करमणकरमणुकीसाठी मोबाइल ॲप्लिकेशन बनवता येते. यासाठी नवीन कल्पना, प्रोग्रामिंगचं आवश्यक ज्ञान, डिझाइन, संवाद कौशल्य या गोष्टी अवगत असणे गरजेचं आहे. 
  • सन २०२२ पर्यंत मोबाइल एप्लिकेशन डेव्हलपर्सची मागणी ३२℅ पर्यंत वाढणार आहे म्हणून हा करिअरसाठी चांगला पर्याय आहे.

२. एथिकल हॅकर :-

  • ‘हॅकिंग’ हा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर डेटा किंवा माहितीची चोरी, घुसखोरी असे शब्द उभे राहतात. पण हॅकिंगचा उपयोग काही विधायक किंवा योग्य कामातही होतो. आणि तिथे हॅकर्स लोकांची मागणी वाढत आहे. 
  • आयटी क्षेत्रात अनेक गोष्टी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगवरच चालतात. यात अनेक त्रुटी असू शकतात, ज्यामुळे हवा तो रिझल्ट त्या प्रोग्रामरला मिळत नाही, या त्रुटी दूर करण्यासाठी ‘एथिकल हॅकिंग’ हा योग्य पर्याय आहे. 
  • मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांचा संवेदनशील डेटा किंवा माहिती बाहेरील हॅकर्सद्वारे अवैधरित्या चोरी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते, या ठिकाणी कायदेशीर परवानगीने नेटवर्क सिस्टममधील त्रुटी शोधण्यासाठी हॅकर्सची नेमणूक करण्यात येते. 
  • हॅकिंग शिकण्यासाठी UNIX बाबत विशिष्ट कौशल्य असणं तसेच ‘जावा’ (JAVA) किंवा ‘सी ++’ (C++) यांच ज्ञान असणं आवश्यक आहे. 
  • इंटरनेटचा वाढता वापर, सायबर क्राईम, डेटा चोरी, या सारख्या गोष्टी लक्षात घेता, आयटी विभागात विशेष सुरक्षिततेसाठी ‘सिक्युरिटी डोमेन’ मध्ये हॅकर्सचं काम महत्वाचं ठरतं. हॅकर्सची भारतात असलेली मागणी लक्षात घेता, हा करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

३. क्लिनिकल थेरपिस्ट/मानसशास्त्रज्ञ : 

  • धावपळीची जीवनशैली हे तणावाचं मूळ कारण आहे. मानसिक तणावमुक्तीसाठी ‘क्लिनिकल थेरपि’’ हा योग्य उपाय आहे, जो मानसिक स्वास्थ्य परत मिळवण्यासाठी आपली मदत करतो.
  • याच्याकडे करिअर म्हणून पहायचे असल्यास काही फार कठीण नाही. दैनंदिन आयुष्याचं योग्य निरीक्षण, एकामागून एक मुलाखती ही जणू चाचण्यांची शृंखलाच असते. 
  • यामध्ये बऱ्याच वैविध्यपूर्ण शाखा आहेत. विवाह चिकित्सा, व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन, मानसिक आरोग्यासाठी योग्य सल्ला या गोष्टी यामध्ये येतात. 
  • एखादी समस्या सोडविण्यासाठी असलेली वृत्ती, समुपदेशनाची कला, समोरच्याशी व्यवस्थित संवाद साधणे  या गोष्टी जमल्या, तर आपण क्लिनिकल थेरपिस्ट म्हणून यशस्वी होऊ शकतो. 

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

४. शेफ (आचारी) : –

  • करिअरच्या सर्वोत्कृष्ट संधींमध्ये सर्वात पुढे असणारा व्यवसाय म्हणजे शेफ किंवा आचारी! रोजच्या स्वयंपाकाला कंटाळलेल्या गृहिणी आणि रोज रोज जेवणात मिळणारी खिचडी, हे समीकरण आता बदलत चाललं आहे. कारण गृहीणींच्या हातच्या चवीची ही योग्य दखल घेतली जात आहे. 
  • अनेक वाहिन्यांवरून या सुगरणी टिव्हीवर झळकल्या. तसेच ‘टॉप शेफ’, ‘टर्बन तडका’, ‘मास्टरशेफ’ सारख्या टीव्ही कार्यक्रमांमुळे या क्षेत्राबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. 
  • स्वयंपाक हे कंटाळवाणं काम नसून, ती एक आकर्षक कला बनली आहे, जी शिकून घेण्यासाठी तरूण आणि तरणी दोघांमध्ये स्पर्धा आहे. याचं शिक्षण घेण्यासाठी विविध कोर्सेस आणि पदवी अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध झाले आहेत. 
  • शिकण्याची आवड, नवनवीन पदार्थाच्या चवी घेणं, ते पदार्थ बनवून पाहणं, त्यातील पौष्टिक घटक, स्वच्छता व आरोग्य या सर्व गोष्टी त्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. विशेष शिक्षण घेणं अनिवार्य नसलं तरीही ज्यांना यामध्ये पुढे जायचं आहे त्यांनी घ्यायला हवं. शेफ हा करिअर म्हणून अतिशय उत्तम पर्याय आहे. 

५. फूड फ्लेवरिस्ट : – 

  • सुरूवातीला ‘फूड फ्लेवरिस्ट’ म्हणजे काय ते जाणून घेऊ.  विविध ठिकाणी लागणारे खाद्यपदार्थ, शीतपेये, औषधे, सौंदर्यप्रसाधने, पौष्टिक पदार्थ यांसारख्या गोष्टींमध्ये लागणारे फ्लेवर्स किंवा स्वाद नावीन्यपूर्ण आणि नामांकित पद्धतीने पुरवण्याचे काम ‘फूड फ्लेवरिस्ट’ करतो. 
  • या क्षेत्राचा करिअर म्हणून किंवा जॉब म्हणून विचार करायचा असेल, तर विविध पदार्थांच्या चवी, संप्रेरक कौशल्य असणे आवश्यक आहे. 
  • पदार्थ बनवताना वापरली जाणारे तेले यांच विशेष परिक्षण करता आलं पाहिजे. सतत व्यापक संशोधनाची वृत्ती ठेवावी. 
  • संपूर्ण जगात या क्षेत्रात होणारी उलाढाल अब्जावधी डॉलर्स एवढी मोठी आहे. भारतातच या उद्योगाची कमाई  ७० अब्ज डॉलर आहे.जवळपास १३ लाख लोकांना या उद्योगाद्वारे थेट रोजगार मिळतो. 

नोकरी जाईल याची सारखी भीती वाटते? मग हे वाचा…

६. गिर्यारोहक :-

  • काहींना ऑफिसमध्ये बसून तेच तेच रटाळ काम नको वाटतं. अनेकजण विशिष्ट चौकटीत न राहता मित्रांसोबत फिरायला म्हणून बाहेर पडतात. दूर डोंगरावर कॅम्पिंग साठी जाणे, डोंगरावर ट्रेकिंगसाठी जाणे, तंबूत राहणे अशा गोष्टी या लोकांना आनंद देतात. 
  • उंच डोंगरावरची ती ताजी हवा तो स्वच्छ लिए मोकळा श्वास अनुभवणं यासारखं मोठं सुख नाही. असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी पर्वतारोहण ही फक्त फिरणे व मजा घेण्यासाठीच नाही, तर करिअरसाठी उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकते व उत्पन्नाचं साधन ही होऊ शकते.
  • आपल्यापैकी ज्यांना खरोखरच याची आवड आहे त्यांच्यासाठी व्यावसायिक माऊंटेन ट्रेकचे आयोजन करणे, गिर्यारोह मार्गदर्शक म्हणून काम पाहणे, व्यावसायिक गिर्यारोहकांना मदत करणे, स्वत:ची मैदानी खेळाची एजन्सी सुरु करणे असे भरपूर उत्पन्न मिळवून देणारे काही पर्याय उपलब्ध आहेत. 
  • या क्षेत्रात मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळवून देणा-या काही संस्था जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये कार्यरत आहेत. 

७. डेटा सायंटिस्ट:- 

  • हार्वर्ड स्कूल ऑफ बिझनेस च्या अहवालानुसार ‘डेटा सायंटिस्ट’ हा करिअर चा सर्वोत्तम पर्याय म्हणून जाहीर झाला आहे. यामध्ये विशिष्ट टेक्निकल क्षेत्रातील लोक एकत्र येऊन लपविलेल्या माहितीचा शोध घेऊन ती नाहीशी करतात. 
  • त्यासाठी प्रोग्रामिंग च कौशल्य असणं आवश्यक आहे. पायथन कोडिंग, एसक्युएल डेटाबेस, हॅडॉप प्लॅटफॉर्म सारख्या गोष्टींचं विस्तृत ज्ञान असणे आवश्यक असते. 

भारतीय युवकांसाठी उपलब्ध असणारे करिअरचे १५ आधुनिक पर्याय – भाग २

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –