Franchise Business – फ्रेंचाइजी व्यवसाय
आजच्या लेखात आपण फ्रेंचाइजी व्यवसाय (Franchise Business) म्हणजे काय त्याची सुरुवात कशी करायची, त्यासाठी लागणारी कागदपत्रे अशा महत्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत.
Franchise Business – फ्रेंचाइजी व्यवसायाचा परिचय (प्रस्तावना) :
- कुठलाही व्यवसाय सुरू करताना सर्वात आधी, “तुम्हाला कशाची आवड आहे”, हे लक्षात घ्या. कोणते काम तुम्ही न थकता करू शकता याचा विचार करा. अर्थात सगळं काही तुम्हाला करावं लागत नाही.
- एखादे दुकान किंवा तो व्यवसाय चालवताना आपण त्या व्यवसायाचे स्वतः: मालक असतो. तेव्हा आपण वस्तूंची सेवा देण्यासाठी कामगारांची नेमणूक करू शकतो.
- फ्रेंचाइजी व्यवसाय चालविणे किंवा सुरु करणे सुरूवातीला सोपे वाटू शकते, पण ते यशस्वी होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात.
- फ्रेंचाइजी व्यवसायाच्या मुख्य प्रक्रियेमध्ये व्यवसाय मालक किंवा फ्रेंचाइजीचा अधिकृत परवानाधारक व्यक्ती आणि फ्रेंचाइजी घेऊ इच्छिणारी व्यक्ती म्हणजे तृतीय पक्ष यांचा समावेश असतो.
- फ्रेंचाइजी घेताना कायदेशीर करारासोबत काही पैसे ‘शुल्क’ म्हणून द्यावे लागतात. शुल्क दिल्यानंतर त्या बदल्यात फ्रेंचाइजी संबंधित ब्रँडचा वापर करून, वस्तू किंवा सेवा पुढे वितरीत करण्याची परवानगी ठराविक कालावधीपर्यंत मिळते.
- फ्रेंचाइजी व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रकिया या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग १
Franchise Business – फ्रेंचाइजी व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रे :
- फ्रेंचाइजी देणाऱ्या कंपनीच्या वेबसाइटवर असणारा अर्ज (ॲप्लिकेशन फॉर्म) पूर्णपणे भरा. जर फॉर्म उपलब्ध नसेल, तर कंपनीशी संपर्क करा.
- लेटर ऑफ इ़ंटेंट ( एलओआय), ज्यात फ्रेंचाइजीसाठी अर्ज करण्याची कारणे दिली आहेत.
- व्यवसायासाठी निवडलेल्या जागेचा नकाशा, जो तुम्ही ‘मॅप्स’ च्या मदतीने तयार करू शकता. यासोबतच तुम्ही जागेचे चित्र किंवा फोटो फॉर्मशी संलग्न करा.
- तुमचा रेझ्युमे/प्रोफाईल फॉर्मशी जोडा.
- किमान दोन ओळख दर्शवणारे सरकारी पुरावे (आयडी प्रुफ).
- जर व्यवसायासाठी लागणारी जागा भाड्याने घेत असाल, तर भाडेपट्टी करार किंवा लेखीकरार देखील प्रदान करणे आवश्यक आहे.
- बँक स्टेटमेंट -साधारणतः मागील तीन महिन्यांचे.
- करदात्याचा ओळख क्रमांक (TIN ).
भारतात उपलब्ध असणारे स्टार्टअप फंडीगचे ६ पर्याय – भाग २
फ्रेंचाइजी व्यवसाय सुरू करण्याच्या पायऱ्या (Franchise Business – Steps) :
१. पहिली पायरी- निवडलेल्या फ्रेंचायझरपर्यंत पोहोचणे:
- प्रत्येक फ्रेंचायझरकडे लागणारी कागदपत्रे, फी या प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टीने वेगवेगळ्या असतात.
- फ्रेंचाइजीची माहिती काही वेळा त्यांच्या वेबसाइटवरील माहितीपेक्षा वेगळीही असू शकते.
- सर्व फ्रेंचायझर एकसारखे नसतात. त्या कंपनीचा व्यवसाय किती काळ चालू आहे, सरासरी किती उत्पन्न आहे, कंपनी किती यशस्वी आहे या गोष्टींचा माहिती करून घेणे आवश्यक आहे.
- फ्रेंचायझरची प्रत्यक्षात भेट घेणे नेहमीच फायदेशीर असते. फ्रेंचायझर नवीन असला तरी त्याच्याविषयी जितकी जास्त माहिती मिळेल तितकं चांगले.
२. दुसरी पायरी – आवश्यक वस्तूंची व्यवस्था:
- ही खूप महत्त्वाची पायरी आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणा-या आवश्यक गोष्टी वेळेत पुरवल्या गेल्या तरच फ्रेंचायझर किंवा त्या ब्रँडचा मालक तुमचा अर्ज मंजूर करतो, अन्यथा मंजूर केला जात नाही, म्हणून याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
३. तिसरी पायरी- फ्रेंचायझरला भेटणे:
- यावेळी आपण भरलेल्या अर्जातील बाबींचे मूल्यांकन केले जाते. सर्व बाबी तपासल्या जातात, व पुढे जाण्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री केली जाते.
- आपण व्यवसाय भागीदार म्हणून योग्य आहात का याची चाचणी घेण्यात येते.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था
४. चौथी पायरी – अर्जावर मंजूरी:
- ही शेवटची पायरी आहे. याचा अर्थ आपण फ्रेंचाइजी घेण्याच्या मार्गावर आहात. खूप उत्साहाच्या भरात काही गोष्टी राहून जातात, पण असे होऊ देऊ नका. आपल्या अर्जाचे पुनरावलोकन करा. करारावर सही करण्यापूर्वी ब-याच महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्या काही गोष्टी खालीलप्रमाणे –
- फ्रेंचाइजी चालू करण्यापासून पुन्हा नुतनीकरणाच्या वेळी लागणारी किंमत,
- फ्रेंचाइजी फी किंवा रॉयल्टी फी,
- फ्रेंचाइजीचा करार बंद होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टी ज्या टाळल्या पाहिजेत,
- फ्रेंचाइजी पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी व अपवाद,
- फ्रेंचायझर मान्यताप्राप्त उत्पादने आणि त्यांचा पुरवठा याची संपूर्ण माहिती,
- आपण घेतलेली फ्रेंचाइजी जास्तीत जास्त फायद्यात कशी राहील, याचा विचार व त्यादृष्टीने योग्य नियोजन.
सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी (One Person Company)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Franchise Business Marathi Mahiti, Franchise Business in Marathi, Franchise Business Marathi, Franchise Business Mhanje kaay, Franchise Marathi Mahiti, Franchise in Marathi, What is Franchise Business? Marathi Mahiti
1 comment
खुप छान माहिती आहे..