Reading Time: 3 minutes

गेल्या दोन तीन दशकांमध्ये, वॉरेन बफेट हे नाव समाजाच्या सर्व थरांमध्ये सुपरिचित झालं आहे. आर्थिक क्षेत्राचा गंध नसलेल्यांसाठी, ते भलीमोठी रक्कम चॅरिटीसाठी दान करणारे, एक नव्वदीच्या आसपासचे अब्जाधीश आहेत, तर, आर्थिक जगात वावरणाऱ्यांमध्ये, त्यातही, गुंतवणूकदारांसाठी, ते “विझर्ड ऑफ ओमाहा” आहेत. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि अनुभूत सचोटी या दोन निकषांवर, त्यांनी अक्षरशः शून्यातून अब्जावधी उभारले आहेत. त्यांना या गुंतवणुकीतील यशाचे रहस्य विचारल्यास, क्षणाचाही विलंब ना लावता, ते आपले गुरु बेंजामिन ग्रॅहम यांनी शोध लावलेल्या “व्हॅल्यू इन्वेस्टींग” चा उल्लेख करतात. कोणत्याही प्रकारचा गुंतवणूकदार असो, कोणत्याही कंपनीच्या समभागामध्ये आपला पैसा गुंतवण्याआधी त्या कंपनीचा- त्याच्या मूल्याचा अभ्यास करणे गरजेचं असतं. याच अभ्यासाचा एक महत्वाचा निकष म्हणजे प्राईज-अर्निंग रेश्यो, ज्याला थोडक्यात “किंमत-उत्पन्न प्रमाण” म्हणतात. 

शेअर मार्केट- लिस्टेड (सुचिबद्ध) कंपनी म्हणजे काय?

बेंजामिन ग्रॅहम यांच्या मते, हा किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे एखादा समभाग निव्वळ गुंतवणूकीवर आधारित आहे की सट्टेबाजीच्या आधारावर व्यापार करीत आहे, हे निर्धारित करण्याचा अतिशय वेगवान आणि सोपा मार्ग आहे.

इथे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे, की, महत्वाचा निकष असला, तरी, प्रत्येक बाबीवर समभागांचे मूल्य ठरवताना, केवळ किंमत-उत्पन्न प्रमाण च आधारभूत मानणे संयुक्तिक ठरणार नाही. 

मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) कसा लागू होतो?

  • या  किंमत-उत्पन्न प्रमाणबद्दल थोडक्यात सांगायचं तर, किंमत-उत्पन्न प्रमाण म्हणजे ती किंमत आहे जो गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या रु.१ च्या उत्पन्न किंवा नफ्यासाठी चुकती करतो. म्हणजेच, जर एखादी कंपनी, प्रति समभाग मूलभूत किंवा अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या रूपात रु. २ जाहीर करत असेल आणि समभागांची विक्री किंमत रु. २० प्रति समभाग असेल, तर त्याचा किंमत-उत्पन्न प्रमाण झाला १० (प्रति समभाग रु. २० छेद प्रति समभाग रु. २  चे मिळकत = १० p/e). 
  • किंमत-उत्पन्न प्रमाण दोन कारणांसाठी वापरले जातात. एक म्हणजे, एकसारख्या दिसणाऱ्या समभागांची तुलना करणे, उदाहरणार्थ एकाच किंवा एकसारख्या उद्योगातील दोन समभाग. अशावेळी तुलनेने कमी किंमत-उत्पन्न प्रमाण असलेला स्टॉक स्वस्त असेल आणि दोघांमध्ये तो चांगली गुंतवणूक असू शकतो. 
  • दुसरे म्हणजे, वेळेनुरुप समभाग किंवा निर्देशांकाची त्याच्याच भूतकाळाशी तुलना करणे. जर किंमत-उत्पन्न प्रमाण त्याच्या भूतकाळातील मूल्याच्या तुलनेत कमी असेल, तर ते संभाव्य खरेदीचे द्योतक ठरू शकेल.
  • असे असले तरी, निव्वळ किंमत-उत्पन्न प्रमाण वापरुन निर्णय घेताना, जर एखादा कमी किंमत-उत्पन्न प्रमाण असलेला समभाग  दिसला, तर तो तास असण्याची करणे शोधायला हवीत. जर कंपनीची भविष्यातील अपेक्षित वाटचाल किंवा उत्पन्न याचे ते प्रतिबिंब असेल, तर, तो समभाग टाळायला हवा.
  • त्याचबरोबर, किंमत-उत्पन्न प्रमाण कमी असण्याची काही करणे अशीही असू शकतात बाजारात अचानक मंदी आली आहे आणि त्याचा परिणाम समभागांच्या मूल्यावर झाला आहे. 

शेअर्स खरेदीचं सूत्र

किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio)कसे मोजायचे?

किंमत-उत्पन्न प्रमाण मोजताना प्रति समभागाच्या उत्पन्नाद्वारे शेअर्सच्या बाजारभावाचे विभाजन करुन त्याची गणना केली जाते. समजा एबीसी लि. च्या स्टॉकची सध्याची बाजारभाव किंमत १०० रुपये आहे आणि ती प्रति शेअर कमाई १० रुपये आहे. एबीसी लि.च्या किंमत-उत्पन्न प्रमाणची गणना खालीलप्रमाणे केली जाईल.

p/e = १००/१० = १०

आता हे पाहिले जाऊ शकते की एबीसी लिमिटेडचा किंमत-उत्पन्न प्रमाण दहा पट आहे, म्हणजेच गुंतवणूकदार कमाईच्या प्रत्येक रुपयासाठी दहा रुपये देण्यास तयार आहेत.

गुंतवणूक विशेष – शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

किंमत-उत्पन्न प्रमाण आपल्याला समभागांबद्दल काय सांगतो?

  • आत्तापर्यंत आपल्या लक्षात आलेच असेल की किंमत-उत्पन्न प्रमाण प्रत्येक क्षेत्रागणिक बदलत जातो. त्यामुळे, त्याची तुलना करताना एकतर ती त्याच्या जवळपास आकाराच्या आणि प्रकारच्या व्यापारविषयक क्रियाकल्पासोबत करावी, नाहीतर खुद्द त्याच्याच भूतकाळातील वाटचालीसोबत करावी, जेणेकरून आपल्याला हे समजेल की तुलनेने तो समभाग गुणवत्तेपेक्षा कमी किमतीचा आहे की गुणवत्तेपेक्षा जास्त किमतीचा  आहे. 
  • सर्वसाधारणपणे हिरे, खते,वगैरे क्षेत्रात किंमत-उत्पन्न प्रमाण कमी असतो. त्याचवेळी एफएमसीजी, फार्मा, आणि आयटी क्षेत्रात P/E सर्वसाधारणपणे जास्त आढळतो. किंमत-उत्पन्न प्रमाण जास्त असलेल्या कंपनि , ग्रोथ स्टॉक्स  म्हणून ओळखल्या जातात. 
  • गुंतवणूकदारांना भविष्यातील उत्पन्नाबद्दल जास्त अपेक्षा असते आणि त्यासाठी ते काहीशी चढी किंमतही मोजायला तयार असतात. पण P/E जास्त असलेले हे ग्रोथ स्टॉक्स बऱ्याचदा अप्रत्याशित असतात आणि त्यामुळे कंपन्यावरही त्यांच्या चढ्या बाजारमूल्याचे समर्थन करण्यासाठी बराच दबाव असतो. त्यामुळे हे ग्रोथ स्टॉक्स बऱ्याचदा जोखमीची गुंतवणूक ठरू शकतात. 
  • अशावेळी रास्त किंमत-उत्पन्न प्रमाण गुंतवणूकदाराच्या कामी येतो.हे प्रमाण निर्धारित P/E वर अवलंबून नसते. म्हणजेच या दोन्हीच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. जर प्रत्यक्ष P/E हा रास्त किंमत-उत्पन्न प्रमाण पेक्षा कमी असेल,याचा अर्थ कंपनी गुणवत्तेपेक्षा कमी किमतीची आहे आणि तिचा समभाग खरेदी करण्यातून भविष्यात नफा होऊ शकतो.

शेअर्सची ओपन-क्लोज पोझिशन आणि अल्गोरिदमीक ट्रेडिंग

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…