Reading Time: 3 minutes
क्रेडिट स्कोअर आणि वैयक्तिक कर्ज
एखाद्या बँकेतून कर्ज घेताना, बँक आपली पत जाणून घेण्याचा प्रयत्न करते. यात आपला क्रेडिट स्कोअर सर्वात आधी तपासला जातो. बऱ्याचदा वैयक्तिक कर्ज घेताना कर्जाचा व्याजदर सुद्धा या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. कर्जदाराच्या बँक प्रोफाईलमध्ये असलेल्या माहितीच्या आधारे हा व्याजदर ठरवण्यात येतो.
सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया
कमी क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
- क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, जो कर्ज मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ही तीन अंकी संख्या ३०० ते ९०० दरम्यान असते. सामान्यपणे ७५० किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला मानला जातो, अथवा पेक्षा कमी असणारा अंकाला खराब क्रेडिट स्कोअर असं म्हटलं जातं.
- क्रेडिट स्कोअर कमी असल्यास कर्ज मंजूर होण्यात अडथळे येतात किंवा मंजूर होत नाही, तर उच्च क्रेडिट स्कोअर असणारी व्यक्ती कोणतेही कर्ज सुलभरित्या मिळवू शकते.
क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा
क्रेडिट स्कोअर कमी असण्याची कारणे :
- क्रेडिट कार्डची बिले वेळेवर न भरणे : आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डचं बिल वेळेत न भरल्यास ती रक्कम थकबाकी म्हणून दर्शवण्यात येते व याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो.
- क्रेडिट कार्डच्या स्कोअर ची सतत चौकशी करणे : क्रेडिट स्कोअर जाणून घेण्यासाठी सतत अर्ज केल्यास क्रेडिट स्कोअर खाली जावू शकतो. दोन अर्जामध्ये कमीत कमी ६ महिन्यांचे अंतर असावे.
- क्रेडिट युटिलायझेशन रेशिओ : तुमच्या कार्डसाठी नियुक्त केलेल्या एकूण क्रेडिट मर्यादेपर्यंतच तुमच्या खर्चाचे प्रमाण आहे. क्रेडिट मर्यादेपेक्षा ३०℅ जास्त वापर केल्यास क्रेडिट स्कोअर कमी होतो.
क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!
क्रेडिट मिक्स :
- यामध्ये आपल्या नावावर असणाऱ्या सर्व वैयक्तिक कर्ज, कार लोन, गृह कर्ज यानुसार सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज या पर्यायांमध्ये कर्जाचे योग्य व्यवस्थापन करावे लागते.
- क्रेडिट कार्डच्या खात्यात सर्व कर्जांची माहिती दिली गेली असेल तर क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी मदत होते.
कर्ज प्रकार – वैयक्तिक कर्ज कर्जाची रक्कम – रु. ५ लाख परतफेडीसाठी मुदत (वर्षे) ५
बँकेचे नाव | क्रेडिट स्कोअर (Cut Off ) | व्याज दर |
बजाज फिनसर्व्ह | ७८० | १४.८५ ते १५.% |
आयसीआयसीआय बँक | ७२०+ | १५.६०% |
एचडीएफसी | ७२०+ | १६% |
ऍक्सिस बँक | ७२०+ | १३. ५०% |
तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?
क्रेडिट स्कोअर आणि वैयक्तिक कर्जाची मंजुरी:
- वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट स्कोअर यांचा थेट संबंध आहे. क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितकं लवकर वैयक्तिक कर्ज मंजूर केलं जातं.
- वैयक्तिक कर्ज हे सहसा असुरक्षित कर्ज असते म्हणून हे कर्ज देताना बँकांना धोका जास्त असतो. काही प्रसंगात कर्जदारांकडून रक्कम वसूल करण्यासाठी बँकांना त्यांचा विरोधात दावा दाखल करण्याशिवाय पर्याय नसतो.
- सामान्यतः सर्व बँकांकडून कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर ७५० एवढा असावा लागतो. वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर वाढवणे आवश्यक असते.
- क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी, क्रेडिट कार्डची बिले वेळेत भरा , क्रेडिट कार्डचा अहवाल तपासून पहा तसेच शक्य असल्यास क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा वाढवा.
वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा हे ११ नियम
कमी क्रेडिट स्कोअर असल्यास वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल.?
- तुम्ही तुमच्या उत्पन्नातून कर्जाचे ईएमआय (हप्ते) वेळेत भरू शकता याची खात्री देणे : जर तुमचे स्थिर मासिक उत्पन्न आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत असेल तर कोणताही सावकार सुद्धा तुम्हाला वैयक्तिक कर्ज देऊ शकेल. पैसे परत करण्याची आर्थिक पात्रता असल्यास वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज क्रेडिट कार्ड स्कोअर विचारात न घेता ही मिळू शकते.
- कर्ज घेण्यासाठी छोट्या बँकांमध्ये अर्ज करा : ब-याच छोट्या बँका कर्ज देताना क्रेडिट स्कोअर पाहत नाहीत, अशा बँकामध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा.
- कर्जासाठी जामीन जोडा (Add Guarantor) : कर्ज मिळवणे सहज होण्यासाठी आर्थिक पत चांगला असलेला मित्र किंवा कुटुंबातील एखादा व्यक्ती यांची जामीनदार जामीन होण्यासाठी मदत घ्या.
- एनबीएफसीकडून (NBFC)कर्ज देणे : नॉन बँकिंग वित्तीय संस्था कर्जदारांना बँकेकडून धोकादायक समजून कर्जासाठी नकार दिल्यानंतरही कर्ज देऊ करतात, मात्र यांचा व्याजदर जास्त म्हणजे १९℅ असू शकतो.
- वैयक्तिक कर्ज घेताना कमी रक्कम घ्या: कमी पत किंवा क्रेडिट स्कोअर असताना जास्त कर्जाची मागणी करणे खाजगी संस्था किंवा सावकाराच्या दृष्टीने धोकादायक होऊ शकते. परतफेडीवर जाचक नियम लागू होऊ शकतात, म्हणून कर्ज घेताना कमी रक्कम घ्या जेणेकरून समोरच्या संस्थेला किंवा व्यक्तीला ती रक्कम देणे सोयीस्कर वाटेल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :