Arthasakshar Reliance Right Issue
Reading Time: 3 minutes

रिलायन्स हक्कभाग विक्री – कसा कराल अर्ज?

आजपासून चालू झालेली रिलायन्सची हक्कभाग विक्री (Reliance rights issue) विषयीची माहिती यापूर्वीच्या लेखात दिली आहेच. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हक्कभाग देकार पत्र व त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे हाताळणी करण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यासाठी वाढलेला खर्च यांचा विचार करून यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीत थोडा बदल केला असून पूर्वीप्रमाणे सर्वाना कागदी फॉर्म मिळणार नाहीत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची हक्कभाग विक्री

कसा कराल अर्ज ? (Reliance rights issue – how to Apply ?)-

  • १४ मे २०२०रोजी शेअरधारक असलेल्या धारकास प्रत्येक १५ शेअर्ससाठी १ शेअर दिला जाईल. अपूर्व हक्क विचारात धरला जाणार नाही. तथापि १५ पेक्षा कमी शेअर धारण करणाऱ्या धारकास ० शेअर हक्क असून वाटप करताना एक शेअरचे वाटप करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • सर्व डी मॅट धारकांच्या खात्यात हक्कभागांचे अधिकार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जमा केले असून धारक आपल्या मर्जीनुसार ते अंशतः/ पूर्णतः स्वीकारू शकतील/नाकारू शकतील/ दुसऱ्यास विकू शकतील /अधिक भागांची मागणी करू शकतील. यासाठी त्यांच्या मेलवर शेअर इ -हक्कभाग पात्रता पत्र पाठवण्यात आले आहे.
  • हक्कभाग विक्री २० मे ते ३ जून २०२० या कालावधीत केली जाईल. ज्यांना आपले हक्क विक्री करायचे आहेत ते त्याची विक्री २९ मे २०२० पर्यत शेअरबाजाराच्या मार्फत करू शकतील.
  • १० जून रोजी शेअर्स जारी केले जाऊन ११ जून रोजी डी मॅट खात्यात जमा होतील १२ जून २०२० पासून त्याचे बाजारातील खरेदी विक्री व्यवहार चालू होतील.

भांडवलबाजार : समभाग आणि रोखे

  • ₹ १०/- दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरवर ₹ १२४७/- चे अधिमूल्य आकारले जाईल. सध्या यातील २५% रक्कम भरायची असून बाकी रक्कम एक किंवा अधिक मागणी करून मिळवण्यात येईल.
  • पूर्ण भांडवल भरणा न झालेल्या शेअरचे खरेदीविक्री व्यवहार शेअरबाजारात होतील.
  • ASBA अथवा R-WAP पद्धतीने हक्कभागांची मागणी करावी लागेल.
  • शेअर्स वाटप, ज्यांच्याकडे कागदी स्वरूपात प्रमाणपत्रे आहेत त्यांच्यासह सर्वाना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच होईल त्यानी इशू बंद होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत आपल्या खात्याचा तपशील रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटकडे दिल्यास त्याचे हक्कभाग अधिकार त्यांनी दिलेल्या डी मॅट खात्यात वर्ग केले जातील. अन्यथा मंजूर  हक्कभाग एका वेगळ्या एस्क्रो खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा करण्यात येऊन धारकाने ६ महिन्यात आपल्या डी मॅट खात्याची माहिती देऊन व आपली वैयक्तिक ओळख (KYC) पटवून शेअर पाठवण्याची विनंती केल्यास सदर खात्यात शेअर वर्ग केले जातील.
  • ज्या धारकांच्या बँका ASBA सोय देऊ करतात ते धारक ऑनलाईन पद्धतीने मेलवरील अर्जाचा वापर करून किंवा साध्या कागदावर आवश्यक तपशिलासह अर्ज करून मागणी केलेल्या संख्येस ₹ ३१४.२५/- ने गुणून तेवढी रक्कम तात्पुरती गोठवू  ( Block) शकतात. जेवढे शेअर्स दिले जातील तेवढी रक्कम कापून शिल्लक रक्कम असल्यास ती पुन्हा मूळ खात्यात वर्ग होईल.
  • साध्या कागदावर अर्ज करणारे  ASBA सुविधा वावरणारे भागधारक त्याचे हक्क विकू शकणार नाहीत.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी

  • निवासी भागधारक त्यांना मेलवर पाठवलेल्या अर्जाचा वापर करून R- WAP सुविधेचा वापर करून त्यातील पेमेंट गेटवेचा वापर करून ऑनलाइन पेमेंट किंवा UPI द्वारे पेमेंट करता येईल. यासाठी http//rights.kfintech.com या वेबसाईटवर जावे. 
  • ही सुविधा शेअरहोल्डर्सना येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार करून अधिकची सुविधा असून ASBA ला पर्याय म्हणून नाही. कागदी स्वरूपात प्रमाणपत्र धारण करणारे निवासी शेअरहोल्डर्स R-WAP सुविधेचा वापर करू शकतील. साध्या पेपरवर हक्कभाग अर्ज केल्यास R-WAP सुविधा वापरता येणार नाही.
  • ज्यांचे मेल कंपनीकडे नाहीत असे  शेअरहोल्डर्स आपली इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील इ हक्कभाग पात्रता पत्रे रजिस्ट्रारना आपली सर्व माहिती देऊन मिळवू शकतात.
  • अनिवासीधारक, परकिय गुंतवणूकदार यांच्या संदर्भातील असलेल्या तरतुदींचे पालन करून त्यांना हक्कभाग देऊ केले आहेत.
  • एका फोलिओचा विचार करता दोनदा किंवा दोन भिन्न पद्धतीने मागणी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे दोन्ही अर्ज अपात्र ठरतील.
  • इशू बंद होण्यापूर्वी अर्जदाराची इच्छा असल्यास त्याला आपली हक्कभाग मागणी रद्द करता येईल.
  • हक्कभाग अर्ज मिळाल्याची तसेच ते मंजूर झाल्याची पोहोच मेलवर दिली जाईल.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

(अधिक माहितीसाठी वर्तमानपत्रात दिलेली सविस्तर जाहिरात, कंपनीचे आणि कंपनीच्या रजिस्ट्रार ट्रान्सफर एजंट यांच्या संकेतस्थळावरील माहिती पहावी. वरील तपशीलाबाबत शंका असल्यास मूळ इंग्रजी माहितीत दिलेला तपशील ग्राह्य धरवा.)

उदय पिंगळे

Web search: Reliance rights issue marathi, Reliance industries marathi, Reliance marathi, Reliance industries marathi

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…