Arthasakshar aआरोग्य सेतू Aarogya Setu
Reading Time: 3 minutes

आरोग्य सेतू (Aarogya Setu )

भारत सरकारने कोरोना महामारीविषयी भारतीयांना अधिकृत माहिती देणारे ‘आरोग्य सेतू’ (Aarogya Setu) नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. कोरोना महामारीबद्दल जनसामान्यांत निर्माण झालेल्या भीती, शंका, तणाव आणि गैरसमज निर्माण होणं अगदी साहजिक आहे. याच समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने  तयार करण्यात आलेल्या या ॲपला आत्तापर्यत साडेसात लाखांपेक्षा जास्त भारतीयांनी डाउनलोड केले आहे. 

कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम

सर्वसामान्यांना समजेल, सोपे वाटेल आणि आचरणात आणता  येईल अशी माहिती दिलेली आहे. शिवाय ही माहिती भारतातील ११ प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे ज्यात मराठी, हिंदी, पंजाबी, तामिळ, गुजराती, बंगाली इत्यादीचा समावेश आहे. 

  • आरोग्य सेतू या प्लिकेशनमध्ये आवश्यक ती सर्व माहिती, सूचना याव्यतिरिक्त तर तुमच्या विभागामध्ये एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीने प्रवेश जरी केला तरी त्यासंदर्भातील सूचना आपल्याला याद्वारे त्वरित मिळतात. हे ॲप्लिकेशन iOS आणि ॲड्रॉइड या दोन्हीमधील ॲप स्टोअर वरून डाउनलोड करण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
  • आरोग्य सेतू ॲप्लिकेशनचे अनेक फायदे आहेत. म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या परिसरात COVID -19 तपासणी पॉझिटिव्ह आलेल्या कोणीही व्यक्तीने प्रवेश केल्यास तशी सूचना आपल्याला दिली जाते. 
  • ही सर्व माहिती आपल्या विभागातील स्थानिक माहितीनुसार आपल्याला पुरवली जाते, ज्याप्रमाणे ट्राफिक बद्दलची माहिती गुगल मॅप आपल्याला देते, अगदी तशाच पद्धतीने. या सोबतच या ॲप्लिकेशन मध्ये संपूर्ण भारतातील  सर्व आवश्यक टेलीफोन क्रमांक उपलब्ध आहेत. 
  • याशिवाय आरोग्य मंत्रालयाकडून केले जाणारे सर्व ट्विट्स आपल्याला या ॲप्लिकेशन मध्ये सतत येत राहतात. 
  • हे प्लिकेशन डाउनलोड करताना मध्ये कोणतीही जागा न सोडता सलग ‘AarogyaSetu’ असे लिहून शोधल्यास हे ॲप्लिकेशन त्वरित सापडेल. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

  • भारत सरकारच्या इतर प्लिकेशन्सच्या तुलनेत हे ॲप्लिकेशन वापरण्यास सहज व सोपे आहे.
  • सुरुवातीला या ॲप्लिकेशनच्या वापराची तपासणी सुरु असताना याला ‘कोरोना कवच’ असे नाव दिले गेले. नंतर हे अँप्लिकेशन वापरायोग्य असल्याची खात्री पटल्यावर सरकारकडून वारंवार हे डाउनलोड करण्याबद्दल सूचना देण्यात आल्या. त्यावेळी फक्त गुगल प्ले स्टोअरचा आकडा जरी विचारात घ्यायचे म्हणले तरी हे ॲप्लिकेशन केवळ तीन दिवसांमध्ये जवळपास ५० लाख लोकांनी डाउनलोड केले.

कोरोना व्हायरसविषयीचे ८ गैरसमज

Aarogya Setu  – ‘आरोग्यसेतू’ डाउनलोड कसे करायचे?

१. तुमच्या फोनमधील प्ले स्टोअर किंवा प स्टोअर मध्ये जा.

२. त्यानंतर कोणतीही जागा न सोडता सलग ‘AarogyaSetu‘ असे लिहून ‘शोध.’ (सर्च करा.)

Arthasakshar Aarogya Setu app download Marathi

३. यानंतर NIC eGov Mobile Apps Health & Fitness‘ असे लिहिलेल्या ॲप वर क्लिक करा. हे करताना तुमच्या फोनमधील वायफाय सेटिंग चालू असल्याची खात्री करा.

अशा प्रकारे तुमच्या फोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ ॲप्लिकेशन प्रस्थापित होईल.

आपलं काम इथेच संपत नाही, तर पुढे या प्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमचं खातं उघडावं लागतं ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल सातत्याने योग्य ती माहिती पुरवली जाते. असे खाते उघडण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे.

कोरोना आणि कायदा

Aarogya Setu   -‘आरोग्य सेतू’ ॲप मध्ये खाते उघडण्याची पद्धत:

१. आपल्या फोनवर घेतलेले ‘आरोग्य सेतू’ प्लिकेशन उघडा म्हणजे त्यावर क्लिक करा.

२. हे प्लिकेशन आपल्याला आपल्या सोयीची भाषा निवडण्याबद्दल विचारेल त्यानुसार तुमची सोयीस्कर भाषा निवडा व ‘next’ वर क्लिक करा.

३. यानंतर आपल्याला ह्या प्लिकेशनचा उद्देश, हे कसे काम करते आणि तुम्हांला ‘COVID-१९’ म्हणजेच कोरोना होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यायची आहे याबद्दल सविस्तर माहिती दिसेल.

४. यानंतर ‘Register Now’ वर क्लिक करा.

५. यानंतर आपल्याला हे प्लिकेशन आपल्या फोनमधील ब्लूटूथ सुरु करण्याबद्दल व आपले लोकेशन शेअर करण्याबद्दल सांगते ज्यामुळे आपल्याला आपल्या सद्धयाच्या परिसरातील यासंबंधीची सुयोग्य माहिती पुरवली जाते

६. वरील सर्व गोष्टींसाठी परवानगी दिल्यावर तुम्हांला तुमचा OTP पाठवण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक विचारला जाईल.

७. योग्य OTP टाकून आपण या ॲप्लिकेशन वापर करण्यास सुरुवात करू शकाल.

हे ॲप्लिकेशन वापराची सुरुवात करताना आधी आपण यावर स्वतःची चाचणी करून करावी असे सुचवण्यात येते जेणेकरून आपण कोरोना बाधितअसण्याची शक्यता आहे की नाही हे समजू शकेल.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !