मोबाईल हरवल्यास काय कराल?
आज मोबाईल सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार तरुणांमध्ये मोबाईल हरवण्याची भीती सर्वात जास्त असते. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या घटनेचा अनुभव घेतलेला असतोच. त्यामुळे आता तुमचा स्मार्टफोन हरवलाच तर त्वरित हे करा:
१. दुसऱ्या कोणत्यातरी स्मार्टफोनवर किंवा कॉम्पुटरवर ‘Find my phone’ असे टाईप करा.
२. तुमचा मोबाईलवर ज्या जीमेल अकाउंटने लॉगिन केलं आहे त्याच जीमेल अकाउंटने इथे लॉगिन करा.
३. गुगलवर त्वरित तुमच्या फोनचे शेवटचे लोकेशन दिसेल
४. एकदा तुमच्या फोनचे लोकेशन दिसले की त्वरित तुमच्या फोनवर रिंग करू शकता. त्यासाठी ‘Play Sound’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा फोन सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर असला तरीही फुल्ल साऊंडने ५ मिनिटे सलग वाजेल.
सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना
जर तुमचा फोन चोरीला गेला असेल, तर मात्र फोनवर रिंग करूनही काही उपयोग नाही. त्यापेक्षा फोन लॉक करणेचं योग्य, त्यासाठी हे करा:
- अँड्रॉइड फोन असल्यास android.com/find वर जाऊन तुमच्या गुगल अकाउंट वर लॉगिन करा
- एकापेक्षा जास्त अँड्रॉइड फोन्स असतील तर हरवलेला फोन सिलेक्ट करा.
- फोन नाही सापडला तर शेवटचं ठिकाण दाखवलं जाईल
- त्यानंतर “Enable lock & erase” वर क्लिक करा म्हणजे तुमचा फोन लॉक होईल आणि तुमचा पिन, पॅटर्न किंवा पासवर्ड टाकल्याशिवाय सुरु होणार नाही. ज्याच्याकडे तुमचा फोन असेल त्याने तुम्हाला तो परत करावा म्हणून तुमच्या लॉक स्क्रीनवर तुम्ही एखादा मेसेज पण सेट करू शकता
- तुम्ही जर “Erase” वर क्लिक केलं तर फोनमधील सर्व माहिती कायमची डिलीट होईल पण SD कार्ड वरील माहिती डिलीट होईलच असे नाही. परंतु हे लक्षात घ्या की एकदा सर्व माहिती “Erase” केल्यावर पुन्हा फोनचे लोकेशन मात्र पाहता येणार नाही.
तुम्ही मोबाईल ॲडिक्ट आहात का?…
“Find my phone” हे इंटरनेट सुरु असतानाच काम करू शकेल आणि त्यासाठी फोन सुरु असणेही अनिवार्य आहे. त्यामुळे “Find my phone” ने तुमची मदत करावि असे वाटत असेल तर त्यासाठी:
- नेहमी गुगल अकाउंट वर साइन इन रहा
- मोबाईलचे इंटरनेट सुरु असले पाहिजे
- गुगल प्ले वर व्हिजिबल असले पाहिजे
- तुमच्या फोनचे “Location” सुरु असले पाहिजे
- “Find my phone” नेहमी सुरु असायला हवे
हे झाले फोन शोधण्यासाठीचे मार्ग परंतु तरीही नाही सापडला तर पुढील गोष्टी तातडीने करणे अत्यावश्यक असेल.
१. तुमच्या फोनचा IMEI नंबर शोधा:
- प्रत्येक फोनचा एकमेव टेम्परप्रूफ नंबर असतो ज्याला IMEI (International Mobile Equipment Identity) म्हणतात.
- हा नंबर बऱ्याच फोन्सवर त्याच्या मागच्या बाजूला बॅटरीच्या खाली असतो. मोबाईल खरेदी केल्याच्या पावतीवर देखील लिहिलेला असतो.
- तुमच्या मोबाईल वर *#06# डायल करूनही हा नंबर पाहता येतो.
- हा नंबर कुठेतरी नक्की लिहून ठेवा.
मोबाईल, आर्थिक नियोजन आणि कमी होणारी कार्यक्षमता…
२. सिम कार्ड ब्लॉक करा:
- तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमच्या मोबाईल हरवल्याबद्दल NCR (Non-Cognizable Report) दाखल करावे.
- पोलीस त्यांच्या डायरी मध्ये याची नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची शिक्का मारलेली कॉपी त्यावर DDR नंबर लिहून देतील.
- ही कॉपी पोलीस स्टेशनमधील कम्पुटर हाताळणाऱ्या व्यक्तीला दाखवला की ते तुम्हाला तुमच्या NCR ची प्रत देतील.
- ही प्रत तुम्ही तुमच्या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे आयडिया, एअरटेल, व्होडाफोन ना देऊन तुमचे सिम कार्ड बंद करा व नवीन सिम कार्ड मिळण्यासाठी अर्ज करा.
- तुमचे सिमकार्ड बंद करण्यासाठी FIR ची आवश्यकता पडत नाही, Non-Cognizable Report, NCR चालते.
३. FIR दाखल करणे:
- ५ फेब्रु. २०१४ ला काढलेल्या ऍडव्हायजरीनुसार क्रिमिनल प्रोसिजरच्या कलम १५४ अन्वये हरवलेल्या मोबाईलची तक्रार दाखल करणे अनिवार्य आहे.
- FIR दाखल करायला जाताना तुमच्यासोबत मोबाईल खरेदी केल्याची पावती सोबत घेऊन जावी.
४. फोन शोधण्याची प्रक्रिया:
घटना १ –
जर फोन हरवला असेल आणि तो कोणी परत आणून दिला तर तुम्हाला फोन तुमचाच असल्याचा पुरावा उदा. फोन खरेदी केल्याची पावती दाखवल्यावर तुमची FIR रद्द करून फोन तुम्हाला तुमचा फोन देण्यात येईल.
घटना २ –
फोन जर चोरीला गेला असेल तर तुमचा फोन ZIPNET (Zonal Integrated Police Network) सोबत रजिस्टर केला जातो ज्यामुळे तुमच्या फोनच्या IMEI नंबर च्या मदतीने सर्व टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स च्या मदतीने तुमच्या फोनचा घेता येतो.
तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?…
जर तुमचा फोन सापडला तर तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ च्या कलाम ४५१ अन्वये Ld. Metropolitan Magistrate समोर अर्ज दाखल करावा लागेल. त्यानंतर तुमचा फोन तुमच्या ताब्यात मिळण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया करावी.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies