अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग – भाग १

अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग

“अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.” हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत. मोठमोठ्या व्यक्तींच्या जीवनरेखा पाहिल्यास त्यामध्ये हे प्रकर्षाने दिसते कीत्यांनी आयुष्यात खूप मोठ्या अपयशांना सामोरे जाणावे लागले. काहींनी तर इतकी मोठी अपयशे पाहिली की ती त्यांना आयुष्यभर स्मरणात राहतील. पण त्या अपयशांवर न थांबता त्यांनी झुंज देऊन त्या अपयशाचे रूपांतर यशामध्ये घडवून आणले. 

अपयशाची कारणे त्यांनी समजून घेतली आणि त्यामधून योग्य ते धडे घेतले आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली. आज या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी समजणार आहेत ज्यामुळे अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जाईल. 

या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे…

‘मी हरलो नाही, तर मला कोणते १०,००० मार्ग माझ्या कामाचे नाहीयेत ते समजले.” – थॉमस अल्वा एडिसन 

अपयशाला सामोरे गेल्यावर आपल्याला फक्त त्याचे तोटेच दिसतात पण या अपयशाचे होणारे फायदे जर विचारात घेतले तर मात्र आपल्याला यशाकडे जाण्याची गुरुकिल्लीदेखील सापडते. 

अपयशामुळे आपण जास्त हुशार, सावध आणि प्रगल्भ होत असतो त्यामुळॆ याचे रूपांतर संशयित करून पुढे गेले तर नक्कीच आपले भवितव्य उज्ज्वल होऊ शकते पण अपयशापुढे गुडघे टेकले, तर मात्र ते आपल्याला उध्वस्त करू शकते.

आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारल्या, तर यशस्वी होण्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो:

या ११ सवयी बदलतील तुमचे आयुष्य

१. स्वयंशिस्त: 

 • स्वयंशिस्त हा यश मिळवण्यासाठीचा आणि टिकवण्यासाठीचा केंद्रबिंदू आहे. 
 • शिस्तबद्धपणा असेल, तर रोज होणाऱ्या छोट्या छोट्या गैरसोयी बाजूला सारून पुढे चालत राहणे शक्य होते. 
 • स्वयंशिस्त आपल्याला आपल्या लक्ष्याच्या जवळ नेते. 
 • अनेकांना असे वाटत असते  की स्वयंशिस्त ही अगोदरपासूनच अंगात असावी लागते, परंतु हा फार मोठा गैरसमज आहे. 
 • खरंतर आळस आणि आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे ही स्वयंशिस्त न लावून घेण्यासाठीची निमित्त आहेत.

२. कारणे न शोधणे: 

 • कोणतेही उद्दिष्ट गाठायचे यंत्र असते तर ते अगदी सहज शक्य झाले असते. 
 • काही ना काही अडथळे आपल्या मार्गात येतच असतात. पण याचेच निमित्त करून ठरवलेल्या उद्दिष्टांपासून दूर जात राहिल्यास लक्ष्य कसे साधता येईल? 
 • यासाठी कारणे देण्याच्या स्वभावावर मात करून सतत पुढे जाण्याच्या बाबतीत प्रयत्नशील असले पाहिजे.

 ‘वर्क लाईफ बॅलन्स’ म्हणजे काय असतं रे भाऊ?

३. हरण्याचे  भय: 

 • “ज्याची हरण्याची तयारी असते, तोच मोठे यश मिळवू शकतो” – रॉबर्ट केनेडी. 
 • एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यावर ती लगेच मिळाली असे उदाहरण विरळच. त्यामुळे ‘आपण हारु’ या भयाने प्रयत्नच न करणे हा अत्यंत चुकीचा निर्णय ठरतो. त्यामुळे जिंकण्याच्या सर्व शक्यताच संपुष्टात येतात. 
 • हरण्यातूनही असे अनुभव मिळतात जे नंतर जिंकण्यासाठी फार गरजेचे असतात, जास्त फलदायी ठरतात.

४. नियोजन: 

 • कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी त्याचे योग्य नियोजन अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे येणारे अनेक धोके, अडचणी आधीच लक्षात आल्याने त्यावर मात करणे खूप सोयीस्कर होते शिवाय कृतीचा क्रम माहित असल्याने पुढचे पाऊल आत्मविश्वासाने आणि पूर्वतयारीच्या टाकता येते. 
 • खरंतर यामुळे यशापर्यंतचा प्रवास जास्त सुखकर आणि कमी वेळात साध्य होतो. 
 • प्रत्येकवेळी नियोजन योग्यच असायला हवे असे नाही किंवा जे जस ठरवलं होत तसेच होईल असंही नाही, परंतु योग्य नियोजन हे सर्व कृती एकाच दिशेने घेऊन जाणे जास्त योग्य ठरते त्यामुळे लक्ष्याच्या जवळ जाणे सोपे होते.

तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

५. सातत्य: 

 • तुमच्यामध्ये हुशारी आणि चतुरता हे गुण असतीलही पण यांची सांगड तुम्ही घालू शकला नाहीत, तर तुम्ही अपयशी होण्याची शक्यताच जास्त. 
 • सातत्याचा अभाव हा यशाच्या मार्गातील खूप मोठा अडथळा आहे. त्यामुळेच अनेक विद्वानांनाही अपयश चाखावं लागलं कारण ते पूर्णतः आपल्या विद्वत्तेवर अवलंबून राहिले. 
 • त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये सर्वोत्तम बनण्यापूर्वीच ते थांबले. 
 • जर तुम्हालाही असंच वाटत असेल की यशाच्या आड सातत्याचा अभाव हाच अवगुण येतोय, तर त्यावर लवकरात लवकर मार्ग शोधणे अत्यंत गरजेचे आहे. 
 • सर्वांत जास्त आव्हाने आणि अडथळे असतानाही सतत प्रयत्न करत रहा.

ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *