Arthasakshar Reliance Industry Debt free in marathi
https://bit.ly/3g1vRfl
Reading Time: 3 minutes

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन महिन्यात दुप्पट कसे झाले? 

भविष्यातील संधी शोधत रिलायन्स इंडस्ट्री ही आज भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. बाजारमूल्याच्या विचार करता ११ लाख कोटी रुपयांचा टप्पा तर पार केला आहेच, पण गुंतवणूकदारांना तीन महिन्यात दुप्पट परतावा दिला आहे!

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १…

  • पैसा कोठे फिरतो आहे आणि कसा फिरविला जाऊ शकतो, हे रिलायन्स इंडस्ट्रीने गेल्या काही महिन्यांत दाखवून दिले आहे. 
  • कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व जगात आर्थिक चिंता व्यक्त केल्या जात असताना मुकेश अंबानी या आशियातील सर्वात श्रीमंत आणि त्यातही भारतीय उद्योजकाने पैशांची लयलूट केली आहे. 
  • मुकेश अंबानींनी गेल्या काही वर्षात केलेल्या गुंतवणूकीचे महत्व ज्या हुशार गुंतवणूकदारांना लक्षात आले, त्याची या इंडस्ट्रीतील गुंतवणूक गेल्या तीन महिन्यांत दुप्पट झाली आहे. 
  • कोरोनामुळे बाजार पडला त्यादिवशी म्हणजे २३ मार्च रोजी रिलायन्सचा भाव ८६७ रुपये होता आणि शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा तो होता १७५९ रुपये!
  • रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे बाजारमूल्य गेल्या शुक्रवारी ११ लाख ९३ हजार कोटी रुपये (१५० अब्ज डॉलर) झाले आहे. 
  • भारतीय कंपनीचे बाजारमूल्य ११ लाख कोटी रुपये होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये-२…

  • ३१ मार्च २०२० रोजी रिलायन्सवर एक लाख ६१ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते, त्यामुळे रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार घाबरत होते. 
  • गेल्या ५८ दिवसांत या उद्योगाने अशी काही जादू केली की इतके कर्ज असलेली कंपनी आज कर्जमुक्त झाली आहे. त्याचे सर्व श्रेय अर्थातच रिलायन्स कंपनीने पैसा कशात आहे, याचे भाकीत करून त्यात केलेल्या गुंतवणुकीला आहे.
  • आधी या कंपनीची सर्वाधिक उलाढाल पेट्रोलियम म्हणजे इंधनात होती. पण जगात इंधनाची गणिते बदलत चालली, हे पाहिल्यावर तिने रिटेल क्षेत्रात प्रवेश केला. 
  • आज रिलायन्स रिटेलची संख्या सर्वात जास्त आहे. जेव्हा ऑईलपेक्षा डेटा महत्वाचा ठरतो आहे, असे जग म्हणत होते, तेव्हा हा डेटा जीओच्या मार्फत रिलायन्सने ताब्यात घेतला. त्यासाठी मोठे कर्ज अंगावर घेतले. 
  • जीओ सेवा इतक्या आक्रमकरित्या ग्राहकांपर्यंत पोहचवली की त्या क्षेत्रात उशिरा प्रवेश करून जिओ वापरणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक झाली. 
  • या स्पर्धेत भारतीय नागरिकांना डेटा सर्वात स्वस्त वापरायला मिळाला आणि त्यामुळे डिजिटल व्यवहार करू शकणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली. 

राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…

  • आपण जिओसोबत असावे, असे फेसबुकसह अनेक विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांना वाटले आणि गेल्या दोन महिन्यात त्यांनी जीओमध्ये गुंतवणूक केली. तिचा आकडा गेल्या आठवड्यात एक लाख ७५ हजार कोटी रुपयांवर गेला. 
  • अर्थातच रिलायन्स कंपनी कर्जमुक्त झाली. याच काळात तिने राईट इश्यू आणला. त्यावरही गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्यातून रिलायन्स कंपनीने ५३ हजार १२४ कोटी रुपये उभे केले.
  • गुंतवणूकदार कोरोना संकटामुळे या इश्यूची पूर्ण किंमत भरू शकणार नाहीत, असे गृहीत धरून १२०० रुपयांच्या इश्यूसाठी पहिल्या हप्त्यात ३५० रुपये भरण्याची मुभा दिली गेली. 
  • शेअर बाजारात पैसा कसा फिरतो पहा. हा ३५० रुपयांचा राईट इश्यू बाजारात लिस्ट दुप्पट किंमतीला झाला. तो गेल्या शुक्रवारी ८१२ रुपये झाला आहे! म्हणजे ज्यांनी तो घेतला, त्यांचे पैसे केवळ महिनाभरात दुप्पट झाले.
  • आता पुढे काय होणार ते पहा. जीओ आणि रिलायन्स रिटेलचा आयपीओ येणार. त्यावरही गुंतवणूकदाराच्या उड्या पडणार आणि त्यामुळे रिलायन्स कंपनीचे मूल्य आणखी वाढणार. 
  • शेअर बाजारात गुंतवणूक करायची की नाही, हा ज्याच्या त्याच्या निवडीचा विषय आहे. कारण त्यात तेवढीच जोखीमही आहे. त्यामुळे त्यात अनुभव नसताना पडू नये, म्हणतात ते खरेच आहे.
  • अर्थात या बाजारात इतका पैसा खेळतो आहे की ज्याला गुंतवणूक करावयाची आहे, तो त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग १…

आपली अर्थव्यवस्था आणि सर्व व्यापार उदीम संघटीत होते आहे, याचा अर्थ मोठ्या कंपन्यांचे जाळे इतके वाढत चालले आहे की त्यापुढे छोट्या कंपन्या टिकूच शकत नाही. हे केवळ भारतात होते आहे, असे मात्र मानण्याचे कारण नाही. सर्व जगभरात सध्या हेच वारे आहे. या वाऱ्याच्या दिशेने जायचे म्हणजे पुरेशी काळजी घेऊन गुंतवणुकीचे नवे मार्ग चोखाळायचे.

काही महत्वाची आकडेवारी

जिओचे ग्राहक – ३८.८ कोटी

रिलायन्स स्टोअर्सची संख्या – १० हजार ९०१

रिलायन्सचा वार्षिक नफा – ३९ हजार ५८८ कोटी रुपये (२०१९)

आकडे बोलतात

  • ११ लाख ९३ हजार कोटी रुपये – भारतातील सर्वात मोठी कंपनी – रिलायंस इंडस्ट्रीचे सध्याचे बाजारमूल्य (भारतात सर्वाधिक)
  •  एक लाख २५ हजार – भारतीय १२५ कंपन्यांनी अमेरिकेत अमेरिकन नागरिकांना दिलेला एकूण रोजगार – (या कंपन्यांची अमेरिकेतील गुंतवणूक – २२ अब्ज डॉलर्स)
  • ६ लाख १२ हजार – म्युच्युअल फंड फोलीओंची मे २०२० महिन्यात वाढलेली संख्या (एप्रिल २०२० मधील वाढ – ६ लाख ८२ लाख, एकूण फ़ोलिओ ९.१ कोटी)
  • २४.५५ लाख कोटी रुपये – ४४ म्युच्युअल फंड कंपन्या मे २०२० अखेर व्यवस्थापन करत असलेली एकूण रक्कम (एप्रिल २०२० अखेरची रक्कम २३.९३ लाख कोटी) 

शेअर बाजाराबद्दल सर्वकाही – भाग २…

– यमाजी मालकर

[email protected]

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

web search: Reliance Industries in Marathi, Success Story of Reliance Industries, Interesting Fact about reliance Industries in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…