शेअर बाजार – रिलायन्स जीओ

http://bit.ly/2LLoDRp
0 625

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

गेल्या आठवड्यांत ‘Yes Bank’ बाबत विष्लेषण करताना  –

“प्रवर्तकांच्या मालकीचे सर्व शेअर्स आता विकून झाले” हे येस बॅकेचा “साडेसातीचा फेरा संपला”, याचे द्योतक मानावे का??

“Was it the last straw??”असा प्रश्न मी विचारला होता.

माझ्या अनेक वाचकांनी त्यावर योग्य तो विचार करुन निर्णय घेतले आणि फायदाही मिळवला..

 • काल ‘रिलायन्स कंपनीने’ त्यांच्या जिओ नेटवर्क संदर्भांत आपल्या एक्श्चेंजेसकडे दाखल केलेले पत्रही वाचनीय आहे.

 • ते वाचल्यावर, “भलेही टेलीफोनचा शोध अमेरिकेच्या ग्रॅहम बेलने आणि मोबाईलचा शोध कोण्या मार्टिन कुपरने लावला असेल, पण ‘मिस कॉल’ या संकल्पनेचा शोध पुणेकरांनीच लावला आहे, या प्रसाद भागवतांनी केलेल्या विधानाची सत्यता आज पटेल.

 • रिलायन्स आपल्या पत्रात म्हणते, “आम्ही आमच्या ग्राहकांना मोफत पुरवित असलेली सेवा व त्याचवेळी याच सेवेकरिता स्पर्धक कंपन्या आकारत असलेला महागडा दर….”

 • याची परिणती म्हणून Aitel वा Vodaphone-Idea यांच्या ग्राहकांकडून रोज तब्ब्ल २५ ते ३० मिसकॉल्स जीओ नेटवर्कच्या ग्राहकांना येतात आणि यामुळे उलट जीओ नेटवर्कला आऊट्गोईंग कॉल्सच्या ईंटर्कनेक्ट वापरापोटी –

  • स्पर्धक कंपन्यांनाच तीन वर्षांत १३,५०० कोटी रुपये भरपाई द्यावी लागली.

  • याचमुळे आता येथून कोणत्याही स्पर्धक कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर करण्यात येणारे कॉल्स हे मोफत न ठेवता, त्यासाठी जीओ नेटवर्क शुल्क आकारणार आहे.

 • बाजारांतील एक सामान्य गुंतवणुकदार म्हणून याचा माझ्या दृष्टिने अर्थ हा की, रिलायन्स कंपनीच्या सगळेच ‘चकट फू’ देण्याच्या धोरणात झालेला हा बदल, ही मी तशी महत्वाची घटना मानतो.

 • रिलायन्सला झालेली ही उपरती,  ‘देर से आये…’ प्रकाराची आहे.

 • टेलीकॉम क्षेत्रांतील रिलायन्स जीओच्या प्रवेशाने सुरु झालेली गळेकापू स्पर्धा थांबण्याचे हे संकेत आहेत.

 • एकूणच दुरसंचार क्षेत्राला आणि त्यातही भारती सारख्या कंपनीला, याचा फायदा होऊ शकतो..

महत्वाची सुचना- ही पोस्ट केवळ माहिती म्हणूनच दिली आहे. कोणत्याही खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणून नाही.

– प्रसाद भागवत

9850503503

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.